Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 04:36:59.146447 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / अनघड दगडांचे बांध
शेअर करा

T3 2019/05/21 04:36:59.151050 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 04:36:59.177964 GMT+0530

अनघड दगडांचे बांध

पाणलोट क्षेत्रात वरच्या भागात ओघळ / घळीच्या पात्राची धुप थांबविण्यासाठी व घळशीर्ष सुरक्षीत करण्यासाठी अनगड दगडांचे बांध जास्त परिणामकारक आहेत.

पाणलोट क्षेत्रात वरच्या भागात ओघळ / घळीच्या पात्राची धुप थांबविण्यासाठी व घळशीर्ष सुरक्षीत करण्यासाठी अनगड दगडांचे बांध जास्त परिणामकारक आहेत. विशेषत: घळ प्रणालीत अखंड घळीच्या मुख्य प्रवाहात जेथे जलवाहन क्षेत्र 10 हे. पर्यंत असते त्या ठिकाणी असे बांध घालतात. या कामाकरीता जवळपास उपलब्ध असलेल्या अनगड दगडांचा उपयोग करुन कमीत कमी खर्चात दगडी बांध घातले जातात.

उद्देश :

  • ओघळीवर आडवे असे अनघड दगडाचे बांध घालून ओघळीमधून वेगाने वाहणा-या पावसाच्या पाण्याचा वेग कमी करणे.
  • जमिनीच्या होणा-या धुपीस प्रतिबंध करणे
  • पाणी थाबवून जमिनीत मुरविणे.
  • दोन बांधात गाळ साचल्यामुळे क्षेत्र समपातळीत होऊन अधिक क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते.
  • बांधाच्या खाली झाडे झुडपांची लागवड करुन झाडोरा तयार करणे.

बांधाचे प्रकार :

पाणलोट क्षेत्रानुसार खालीलप्रमाणे अनगड दगडी बांधाचे दोन प्रकार आहेत./p>

अ.क्र.

बांधाचा प्रकार

पाणलोट क्षेत्र

बांधाची सरासरी उंची

1

लहान अनगड दगडी बांध

5 हे. पर्यंत

0.75 मी.

2

मोठा अनगड दगडी बांध

5 ते 10 हे. पर्यंत

1.00 मी.

जागेची निवड :

  • ओघळीमधील अनघड दगडाचे लहान बांधासाठी पाणलोट क्षेत्र 5 हे. पर्यंत व मोठया बांधासाठी पाणलोट क्षेत्र 5-10 हे. पर्यंत असते.
  • पाणलोटातील ओघळी व नाल्याचे जे एल सेक्शन काढलेले आहेत, त्यावरुन प्रत्येक अनघड दगडाच्या बांधाच्या जागा निश्चित केल्या जातात. हया एल सेक्शन वरुन बांधाची जागा निश्चित करताना दोन्ही बांधातील उभे अंतर हे वरील बांधाची तळपातळी व खालील बांधाच्या माथ्याची पातळी यामधील फरक हा नाला तळाच्या शेकडा उताराच्या हिशोबाने व जमिनीच्या प्रकारानुसार 1 टक्के राहील असा हिशोब केला जातो किंवा दोन बांधामधील उभे अंतर 1 मी. पेक्षा जास्त ठेवले जाते.
  • नाला तळयात उघडया खडकावर बांधाची जागा निश्चित करु नये.
  • बांधाच्या जवळपास 1 कि. मी. त्रिज्येत दगड उपलब्ध असतील अशाच ठिकाणी बांध ातला जातो.

 

तांत्रिक मापदंड

उतारगट

तांत्रिकमापदंड

पायारूंदी मी.

बांधाचीउंची मी.

माथारूंदीमी.

बाजूउतार

बांधाचा काटछेद (चौ.मी.)

पाणलोटक्षेत्राचावरचाभाग (अप्पररिचेस)

2.00

0.75

0.50

1:1

0.94

पाणलोटक्षेत्राचामधलाभाग (मिडलरिचेस)

2.50

1.00

0. 50

1:1

1.50

 

स्त्रोत : http://www.krishi.maharashtra.gov.in/1208/Loose-Bolders

2.94117647059
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 04:36:59.529980 GMT+0530

T24 2019/05/21 04:36:59.537042 GMT+0530
Back to top

T12019/05/21 04:36:59.020325 GMT+0530

T612019/05/21 04:36:59.038828 GMT+0530

T622019/05/21 04:36:59.135204 GMT+0530

T632019/05/21 04:36:59.136065 GMT+0530