Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:27:34.727647 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / जलसंधारणासाठी पुनर्भरण चर, रिचार्ज पीट
शेअर करा

T3 2019/10/14 07:27:34.732597 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:27:34.758127 GMT+0530

जलसंधारणासाठी पुनर्भरण चर, रिचार्ज पीट

जमिनीत पाणी मुरविण्यासाठी रिचार्ज पीट, सोक पीट, विहीर पुनर्भरण, शेतातील खड्डा, शेतातील नाल्या यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे.

जमिनीत पाणी मुरविण्यासाठी रिचार्ज पीट, सोक पीट, विहीर पुनर्भरण, शेतातील खड्डा, शेतातील नाल्या यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे. येत्या काळात जल-मृद्‌संधारणाच्या दृष्टीने या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

पाणलोट क्षेत्र विकासात लोकांचा सहभाग असेल, तरच ती योजना यशस्वी होऊ शकते. कोणतेही पाणलोट क्षेत्र लहान किंवा मोठे त्यातील गावे तेथील लोकांच्या गरजा याकडे त्यांच्याशी चर्चा करून, त्यांचा विश्‍वासात घेऊन नियोजन केले, तरच फायदा होतो. जलसंधारणासाठी करण्यात येणाऱ्या कृषी अभियांत्रिकी उपयांमध्ये समपातळीवरील बांध, समपातळी रेषेवरील चरी, घळी नियंत्रण बांधकाम, नाला बांध, गॅबियन, सिमेंट बंधारे, नाला, सरळीकरण, शेततळे इ., तर वनस्पती शास्त्रात्मक उपायांमध्ये समपातळी मशागत पट्टा पेरणी भू-आच्छादित मशागत, वनशेती, फळबाग लागवड व कुरण विकास या कामांचा समावेश होतो.

पुनर्भण चर

पुनर्भरण चर हे पाणलोटात एक महत्त्वाचे काम आहे. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्रोत कायम होण्यासाठी मदत होते. पाणी जमिनीच्या आत साठवून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

  1. ज्या पाणलोटात नाला, विहीर आहे. त्या नाल्याच्या खाली पुनर्भरण चर खोदावयाचा असल्यामुळे नाल्याचा तळ 4 ते 5 सें.मी.पर्यंत कच्चा मुरमाचा असावा.
  2. पुनर्भरण चर भरण्यासाठी लहान-मोठ्या दगडांची आवश्‍यक असते. असे दगड कमीत कमी अंतरावर उपलब्ध असावेत.
  3. नाल्याची रुंदी 10 मी. एवढी असेल, तर नाल्यात 10 मी. रुंद आणि 4 ते 7 मी. खोलीचा खड्डा खोदावा. लांबी 20 ते 30 मीटर उपलब्धतेनुसार ठेवावी. शक्‍य तो गोल दगड वापरणे सोयीचे असते. दगड हे 20 ते 50 सें.मी. व्यासाच्या आकाराचे असावे. हे पुनर्भरण चर खोदत असताना कठीण खडक लागला, तर उंची तेथपर्यंतच ठेवावी. खोदकाम केल्यानंतर निघणारी माती नाल्याच्या दोन्ही काठांवर समान पसरावी.
  4. पुनर्भरण चर खोदल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण जवळ जवळ सहा महिने सतत होत राहते. जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण पावसाचे पाणी एकत्रित करून साठविणे आणि त्याचा कार्यक्षम वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
  5. जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरवून भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने गावपातळीवर शेतपातळीवर, तसेच आपल्या घराभोवतीदेखील पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे मुरवता येईल यासाठी आज विचार करून आवश्‍यक ती योजना कार्यान्वित करावी.

रिचार्ज पीट

ज्या भागात विहीर नसेल तेथे रिचार्ज पीट तयार करून छतावरील किंवा इतर ठिकाणचे पाणी जमिनीत मुरविता येते. हे पीट 2.5 ते 3 मीटर खोल, तसेच 1.5 ते 3 मीटर रुंदीचे असते. यात मोठे दगड, छोटे दगड तसेच वाळू / रेतीचा चाळा भरावा आणि त्याचा पृष्ठभाग कुठल्याही जाळीने झाकावा जेणेकरून पाण्यासोबत येणारा कचरा यात जाणार नाही.

शोष खड्डा

  1. सांडपाणी किंवा पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी सोक पीटचा वापर करावा.
  2. सोक पीट हे 1.5 ते 2 मीटर लांबी रुंदी तसेच 2 ते 2.5 मीटर खोल खड्डा तयार करून त्यात दगड विटा भरून तयार करावे.


संपर्क : प्रा. पेंडके : 9890433803 
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

स्त्रोत: अग्रोवन

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:27:35.207056 GMT+0530

T24 2019/10/14 07:27:35.214259 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:27:34.618641 GMT+0530

T612019/10/14 07:27:34.637335 GMT+0530

T622019/10/14 07:27:34.714192 GMT+0530

T632019/10/14 07:27:34.715139 GMT+0530