Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:27:8.551597 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / भूजलात विषारी अंश
शेअर करा

T3 2019/10/14 07:27:8.556998 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:27:8.586437 GMT+0530

भूजलात विषारी अंश

केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘केंद्रीय भूजल मंडळ’ या संस्थेकडून (The Central Ground Water Board) देशभरातील विविध जिल्ह्यांमधील भूजल नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले.

भारतातील निम्म्या भूजलात विषारी अंश

केंद्रीय भूजल मंडळा’च्या परीक्षण अहवालातील निष्कर्ष

केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘केंद्रीय भूजल मंडळ’ या संस्थेकडून (The Central Ground Water Board) देशभरातील विविध जिल्ह्यांमधील भूजल नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला. एकूण 276 जिल्ह्यांतील भूजलाच्या नमुन्यांमध्ये ‘फ्लोराईड’ या विषारी धातूचे अत्याधिक प्रमाण आढळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

  • 21 राज्यांतील 387 जिल्ह्यांमधील भूजल नमुन्यांमध्ये नायट्रेट आणि इतर 87 क्षेत्रांवरील भूजल नमुन्यांमध्ये
    अर्सेनिकचे अत्याधिक प्रमाण आढळून आले.
  • 15 राज्यांतील 113 जिल्ह्यांमधील भूजलाच्या नमुन्यांमध्ये धोकादायक अशा जडधातू आणि धातुकांचे अंश आढळले आहेत.
  • ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’नुसार प्रतिलिटर पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण 1.5 मिलीग्रॅम असले पाहिजे, मात्र या मर्यादेच्या कित्येक पटींनी अधिक प्रमाण आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल आदी राज्यांमधील भूजलात आढळले आहे.
  • महाराष्ट्रातील यवतमाळ, भंडारा, अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, बुलढाणा, अमरावती  या आठ जिल्ह्यांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळले आहे. या भागात पिण्यासाठी आणि इतर घरगुती वापरासाठी भूजलाचाच वापर केला जात असल्याने फ्लोरोसीससारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
  • अनेक तज्ज्ञांचे मत असे आहे की, भूजलात जड धातूंनी पाण्यामध्ये एकदा का प्रवेश मिळविला, की त्यानंतर त्यांना पाण्यातून वेगळे काढता येत नाही. काही प्रमाणात जड धातूचे अंश सौम्य करता येतील; पण ते पाण्यामध्ये पूर्णपणे अडकून राहतात.
  • या भूजल परीक्षणासाठी घेण्यात आलेले नमुने हे ठिकाणनिहाय (Point-based) आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामधील भूजलात अर्सेनिक, लोह, केडिमिअम, क्रोमिअम हे धातू आढळल्याचे जे निष्कर्ष जाहीर झाले आहेत, याचा अर्थ संपूर्ण जिल्हा प्रदूषित आहे, असा नाही, असे मत ‘केंद्रीय भूजल मंडळा’चे अध्यक्ष के. बी. बिस्वास यांनी व्यक्त केले.

 

स्रोत : केंद्रीय भूजल मंडळ

स्त्रोत: वनराई

3.04444444444
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:27:8.950819 GMT+0530

T24 2019/10/14 07:27:8.956959 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:27:8.439500 GMT+0530

T612019/10/14 07:27:8.465082 GMT+0530

T622019/10/14 07:27:8.539802 GMT+0530

T632019/10/14 07:27:8.540648 GMT+0530