Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 10:55:8.358190 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / विहीर पुनर्भरण
शेअर करा

T3 2019/05/20 10:55:8.363020 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 10:55:8.387757 GMT+0530

विहीर पुनर्भरण

विहीर पुनर्भरणासाठी विहिरीपासून काही अंतरावर आठ फूट लांब, सहा फूट रुंद व सहा फूट खोलीचा खड्डा खणावा.

विहीर पुनर्भरणाची प्रक्रिया

विहीर पुनर्भरणासाठी विहिरीपासून काही अंतरावर आठ फूट लांब, सहा फूट रुंद व सहा फूट खोलीचा खड्डा खणावा. या खड्ड्याच्या उताराकडे विहिरीच्या दिशेस सुमारे दहा फूट अंतरावर दुसरा एक चार फूट लांब, चार फूट रुंद व सहा फूट खोल आकारमानाचा खड्डा खणावा आणि या खड्ड्यामध्ये दगड, खडी, वाळू व कोळसा यांचे थर भरावेत. पहिला व दुसरा खड्डा एक चर खोदून एकमेकांस जोडावेत. दुसऱ्या खड्ड्याच्या तळापासून 15 सें.मी. उंचीवरून एक पाइप विहिरीत सोडावा. खड्ड्याच्या आतल्या बाजूला कचरा विहिरीत जाऊ नये म्हणून या पाइपास जाळी बसवावी. उतारामुळे वाहत येणारे पाणी पहिल्या खड्ड्यात येऊन साठते. पाण्याबरोबर काही प्रमाणात गाळही येतो व तो खड्ड्यात खाली बसतो.

या खड्ड्यात पाणी भरल्यानंतर ते पाणी दुसऱ्या खड्ड्यात येते. हा दुसरा खड्डा शोषखड्ड्याच्या तत्त्वानुसार तयार केलेला असल्याने, त्यात येणारे पाणी पाइपद्वारे गाळून विहिरीत पडते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी विहिरीत आल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते; तसेच भूगर्भात पाणीसाठा वाढविण्यासही मदत होते.

विहीर पुनर्भरणासाठी कोणती विहीर निवडावी?

  1. ज्या विहिरीला रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते.
  2. विहिरीचे बांधकाम सिमेंटमध्ये अथवा पक्‍क्‍या दगडांत झालेले असावे.
  3. विहिरीचे ठिकाण हे साठणाऱ्या पाण्यापासून 50 मीटरच्या आसपास असावे.
  4. विहिरीच्या भोवतालची जागा चिबड किंवा पाणथळ होणारी नसावी.
  5. सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विहिरीची निवड करू नये.
  6. भुरकट व गडद पाणलोट क्षेत्रातील विहिरी पुनर्भरणासाठी उत्तम ठरतात, त्यातील जलस्तर साठवणुकीसाठी योग्य असतात.

 

- 02426 - 243134
भूजल संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

स्त्रोत: अग्रोवन

 

3.0
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 10:55:8.815066 GMT+0530

T24 2019/05/20 10:55:8.821551 GMT+0530
Back to top

T12019/05/20 10:55:8.231277 GMT+0530

T612019/05/20 10:55:8.250568 GMT+0530

T622019/05/20 10:55:8.347359 GMT+0530

T632019/05/20 10:55:8.348293 GMT+0530