मका लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत तयार करून घ्यावे. लागवड जून- जुलै, ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि फेब्रुवारी- मार्च महिन्यांत पूर्ण करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-2, विजय या जातींची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणीपूर्वी 20 ते 25 गाड्या शेणखत अथवा कंपोस्टखत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी सात ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना करावी म्हणजे पौष्टिक व चवदार चारा आपणाला उपलब्ध होतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्याचे हेक्टरी 550 ते 700 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
संपर्क - 02426- 243256
चारा पिके संशोधन प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...