Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:43:41.210978 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/15 00:43:41.216290 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:43:41.245804 GMT+0530

आवळा कॅन्डी

आवळा कॅन्डी

आवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावी. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रकिया ८ ते १० मिनिटे देऊन त्यामधील बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियापासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १ लिटर पाण्यात १ किलो साखर मिसळावी. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५ ते ३० एवढे कमी होते. त्यामध्ये ३५० ते ४०० ग्राम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्राम साखर मिसळून ब्रिक्स ७० डिग्री कायम ठेवावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्राम साखर घालावी आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात पहील्यांदाच २% आल्याचा रस किवा विलायची पूड मिसळल्यास चव चांगली येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात झटपट धुवून घ्यावी किंवा कापडाने पुसून घ्यावी आणि ३ ते ४ दिवस सुकवून घ्यावी. सुकलेली कॅन्डी प्लास्टिक पिशवीत भरून हवा बंद करावी.

माहितीदाता: पृथ्वीराज गायकवाड

स्रोत: कृषी दर्शनी, महत्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

2.94957983193
kamlesh Jun 18, 2019 12:08 PM

आवळा कँडी बनविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण राहुरी कृषी विद्यापीठ किंवा इतर मान्यता प्राप्त संस्थेमध्ये कोठे मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे

सत्येंद्र chavan May 24, 2018 08:25 AM

सर मला आवळा कँडी चे उत्पादन करायचे आहे .त्याबद्दल विस्तार पने माहिती हवी आहे.मोबा ८८०५९५५६१०
ई-मेल सत्येंद्र_चव्हाण@रेडीफमैल.कॉम

बाबु गिरगाल ,सोलापुर Apr 17, 2017 04:45 PM

मला कँडीची पॅकिंग करुन विकायची आहे,होलसेल दरात मिळेल का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:43:41.628919 GMT+0530

T24 2019/10/15 00:43:41.635125 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:43:41.118602 GMT+0530

T612019/10/15 00:43:41.141741 GMT+0530

T622019/10/15 00:43:41.199577 GMT+0530

T632019/10/15 00:43:41.200421 GMT+0530