Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:37:50.950909 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / केळीच्या खोडापासून खत
शेअर करा

T3 2019/10/14 23:37:50.955681 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:37:50.981907 GMT+0530

केळीच्या खोडापासून खत

केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करता येते. या तयार होणाऱ्या धाग्यात दीर्घकाळ टिकाऊ क्षमता आहे.

केळीच्या खोडापासून धागानिर्मिती

करता येते. या तयार होणाऱ्या धाग्यात दीर्घकाळ टिकाऊ क्षमता आहे. त्यापासून उत्तम दर्जाचे कापड, तसेच दोरी, दोरखंड, शोभेच्या वस्तू, पिशवी, पायपोस, हात कागद, क्राफ्ट पेपर, टिश्‍यू पेपर, फिल्टर पेपर, नोटांसाठी कागद, पुठ्ठा, फाइलसाठी जाड कागद, सुटकेसेस, बुटांचे सोल इत्यादी निर्मिती शक्‍य होते. खोडाच्या आतील गाभ्याचा उपयोग भाजीसाठी, त्याचप्रमाणे कॅण्डी बनविणे, गुरांचा चारा, आतील गाभाऱ्यातील पाणी औषधी उपयोग, खोडाच्या पाण्याचा उपयोग रंगनिर्मितीकरिता, धागा काढणे, सेल्युलोजपासून पृष्ठनिर्मिती, तसेच खोडवा पिकास अन्नसाठा म्हणून उपयोग होतो. केळीचा घड काढल्यानंतर खोडापासून दांडा, पाने वेगळे करतात. नंतर खोड मशिन असलेल्या जागेवर आणतात. केळी खोडापासून धागा काढण्याची मशिन ही सिंगल फेज आणि एक ते दीड हॉर्सपॉवर मोटरवर चालणारी आहे. ही मशिन हाताळायला अ तिशय सोपी असते, त्यासाठी विशेष कौशल्याची गरज नाही. मशिनद्वारे सुरवातीस दिवसाला आठ ते दहा किलो धागा निघतो. अनुभवाअंती 15 ते 20 किलो धागा प्रति दिनी निघतो. केळीच्या खोडापासून धागा काढण्याकरिता खोडावरील वाळलेला भाग बाजूला काढावा. नंतर खोडाच्या लांबीनुसार एक मीटर लांबीचे एक किंवा दोन भाग पाडावे. आतील हिरव्या भागावर अडीच ते तीन इंच रुंदीच्या पट्ट्या निघतील, अशाप्रकारे चार ते सहा काप द्यावे. हेच काम अधिक कार्यक्षमतेने करावयाचे झाल्यास कृषी विज्ञान केंद्राद्वारा विकसित कटरद्वारे लवकर होते. यात दोन फूट लांब, तीन इंच रु ंदीच्या दोन धारदार पट्ट्या क्रॉसमध्ये जोडून त्यावर चारही बाजूंस हॅण्डल लावून खोडावर ठेवून दाबल्याने खोडाचे चार भागांत सहजरीतीने ते कापले जाते. नंतर खोडाच्या एक मीटर पट्ट्या सुट्या कराव्यात. अशाप्रकारे या पट्ट्या एका मागोमाग मशिनमध्ये ठेवून धागानिर्मिती केली जाते.

खत तयार करण्यासाठी

धागा काढून उर्वरित खोडाचा शिल्लक भाग खड्डा करून त्यात टाकावा. त्यावर शेण व माती टाकून उत्तम कंपोस्ट खत तयार होते; तसेच जळगाव, यावल भागांत सगळे खोड एकत्र आणून त्याचे बेड तयार करतात, त्यावर शेण, माती टाकून त्यापासून आठ-दहा महिन्यांत खत तयार होते. खोडापासून खत तयार होण्यास वेळ लागतो, खोड कापून बारीक तुकडे करावेत.

------------------------------------------------------------------------------------------

संपर्क- 02584-288439,288525
प्रा. सी. एच. पाटील,
कृषी विज्ञान केंद्र, पाल, जि. जळगाव

स्त्रोत: अग्रोवन

2.96899224806
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:37:51.273668 GMT+0530

T24 2019/10/14 23:37:51.280323 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:37:50.869068 GMT+0530

T612019/10/14 23:37:50.888831 GMT+0530

T622019/10/14 23:37:50.940593 GMT+0530

T632019/10/14 23:37:50.941382 GMT+0530