Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:18:13.141869 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / खवा निर्मिती तंत्र
शेअर करा

T3 2019/05/26 00:18:13.146571 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:18:13.170639 GMT+0530

खवा निर्मिती तंत्र

खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते.

खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते. दूध चांगले घट्ट झाल्यावर तापमान 80 ते 88 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले जाते. जेव्हा खवा कढईचा आजूबाजूचा व तळाचा भाग सोडेल आणि एकत्र चिकटू लागेल तेव्हा खवा तयार झाला असे समजावे. पण या पद्धतीत वेळ जास्त लागतो.

खवानिर्मिती यंत्र

खवानिर्मिती यंत्र हे गॅस मॉडेल व डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. बहुतांशी ठिकाणी गॅस मॉडेलचाच वापर होतो. हे यंत्र वेगवेगळ्या क्षमतेचे आहे. यंत्र खरेदी करताना "जार क्षमता' ध्यानात न घेता जास्तीत जास्त किती व कमीत कमी किती खवा बनविता येईल याचा विचार करावा.

खवा बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस 60 ते 70 मिनिटे लागतात. प्रति किलो खव्यास नऊ ते दहा रु. खर्च (गॅस, वीज) येतो. डिझेल मॉडेलसाठी हा खर्च 16 ते 17 रु. प्रति किलो एवढा येतो. या यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे 0.5 एच.पी. मोटारच्या साह्याने गोल फिरते. भांड्यातच असणाऱ्या दोन स्क्रॅपरच्या साह्याने दूध भांड्याच्या पृष्ठभागास व कडेस लागत नाही. फक्त आचेवर नियंत्रण ठेवावे लागते. मोठ्या चौकोनी चमच्याने (सुपडी) दूध खाली-वर करावे लागते. भांड्याला नळ जोडला असल्यामुळे दूध गरम करणे किंवा बासुंदी, खीरसाठी दूध आटवणे या गोष्टीही सहज होतात.

खवा तयार करताना

* खव्यासाठी निर्भेळ दूध वापरावे.
* गाईच्या एक लिटर दुधापासून 170 ते 190 ग्रॅम खवा मिळतो.
* म्हशीच्या एक लिटर दुधापासून 200 ते 220 ग्रॅम खवा मिळतो.
* दुधाची आम्लता 0.14 ते 0.15 टक्का इतकी असावी.
* दुधात फॅट कमी असल्यास खवा कोरडा बनतो.
* दुधात भेसळ असल्यास खवा कठीण बनतो.
* म्हशीच्या दुधापासूनचा खवा पांढरट, तपकिरी छटा असलेला, किंचित तेलकट पृष्ठभाग मृदू, मुलायम, दाणेदार किंचित गोड असा असतो.
* गाईच्या दुधापासूनचा खवा फिक्कट पिवळा, तपकिरी छटा असलेला, ओला पृष्ठभाग, किंचित कठीण, खारट असतो.

संपर्क - 9405794668
डॉ. धीरज कंखरे, कृषी महाविद्यालय, धुळे

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन


2.92660550459
Suresh jadhav Jan 11, 2018 08:59 AM

सर मला खवा निर्मिती यंञ हव आहे . व त्याबद्दल माहीती ही हवी आहे . मला व्यवसायीक स्तरावर खवा निर्मिती करायची आहे प्लीज सहकार्य करा.
मोबा. - 94*****25.

गंगाप्रसाद Aug 13, 2017 01:07 PM

Milk project profile estimates for

गणेश निंबाळकर Aug 14, 2016 10:32 PM

२०० ,मी ली लिटर दुधात ४० ग्राम खवा मिळतो तर त्या दुधाचि फँट किती असेल

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:18:13.470739 GMT+0530

T24 2019/05/26 00:18:13.477124 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:18:13.061851 GMT+0530

T612019/05/26 00:18:13.078889 GMT+0530

T622019/05/26 00:18:13.131197 GMT+0530

T632019/05/26 00:18:13.132003 GMT+0530