Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:16:25.339001 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / तंत्र दुग्धप्रक्रियेचे
शेअर करा

T3 2019/10/14 23:16:25.343494 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:16:25.368674 GMT+0530

तंत्र दुग्धप्रक्रियेचे

दुग्ध व्यवसाय, पदार्थ निर्मितीविषयी प्रशिक्षण आणि तांत्रिक विषयांची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आवश्‍यक असते. आजच्या लेखात दुग्धप्रक्रिया, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती देत आहोत.

दुग्ध व्यवसाय, पदार्थ निर्मितीविषयी प्रशिक्षण आणि तांत्रिक विषयांची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आवश्‍यक असते. आजच्या लेखात दुग्धप्रक्रिया, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती देत आहोत. या संस्थांच्या माध्यमातून दुग्ध प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जाणून घेणे शक्‍य होईल. 
महाराष्ट्रात अनेक संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, पशुवैद्यक महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, विभागीय विस्तार केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणच्या पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधकांची मदत दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांना घेता येईल. 
याचबरोबरीने राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल (हरियाणा), कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद (गुजरात) या संस्थेतील अनुभवी शास्त्रज्ञांची मदत घेता येईल.

राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था

1) ही संस्था कर्नाल (हरियाना) या ठिकाणी आहे. याच संस्थेचे विभागीय कार्यालय कल्याणी (पश्‍चिम बंगाल) आणि बंगळूर(कर्नाटक) येथे आहे. 
2) कर्नाल येथे दुग्ध तंत्रज्ञान, डेअरी रसायनशास्त्र, डेअरी सूक्ष्मजीवशास्त्र, डेअरी विस्तार, डेअरी अर्थशास्त्र असे विभाग कार्यरत आहेत. 
3) दुग्ध तंत्रज्ञान हा सर्वांत मोठा, महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात दुग्धपदार्थ निर्मिती, त्यातील विविधता, नवीन तंत्र, पॅकेजिंग इत्यादींवर सखोल अभ्यास, संशोधन केले जाते. 
4) भारतातील विविध दुग्धपदार्थांची निर्मितीप्रक्रिया, टिकवण्याच्या क्षमतेत वाढ करणे, पॅकेजिंगवर भरपूर संशोधन झाले आहे. डेअरी इंजिनिअरिंग या विभागात अनेक प्रकारच्या दुग्धपदार्थांना तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध यंत्रणांचा अभ्यास, संशोधन होते. 
5) संस्थेमध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे. या ठिकाणी संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध आहे. तसेच संस्थेमार्फत प्रकाशित साहित्य उपलब्ध आहे. 
संपर्क - 0184 - 2259008, 2259023 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र - 0184 - 2259551

तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रकल्प

1)) राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल येथे काही वर्षांपूर्वी "टेक्‍नॉलॉजी बिझनेस इंन्क्‍यूबिटर' या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली आहे. दुग्धपदार्थ निर्मिती करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी अथवा व्यवसाय करत असणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे केंद्र आहे. 
2) हा प्रकल्प तंत्रज्ञान, नवीन डेअरीतील उपक्रमांची वाढ, उद्योजक घडविण्यासाठी व उद्योगासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व सोयी, सल्ला, विक्रीतंत्राची माहिती पुरवते. तसेच सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा प्रक्रिया केंद्रात प्रत्यक्षात काम करण्याची संधीही या प्रकल्पात उपलब्ध आहे. 
3) दुग्ध प्रक्रियेविषयी एकत्रित माहिती या ठिकाणी मिळते. याव्यतिरिक्त उद्योग तंत्राविषयी शिबिर, उद्योजकता वाढवण्यासाठी कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच अनुभवी व्यक्तींद्वारे, तज्ज्ञांद्वारे त्या प्रशिक्षणार्थीस उद्योग सुरू करण्यापर्यंत माहिती दिली जाते. 
संपर्क - 0184 - 2259291, 2251347

कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद (गुजरात)

1) या ठिकाणी दुग्धतंत्रज्ञान, डेअरी रसायनशास्त्र, डेअरी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, डेअरी इंजिनिअरिंग, डेअरी विस्तार आणि डेअरीचे अर्थशास्त्र असे विभाग कार्यरत आहेत. 
2) इथे "विद्या डेअरी' आहे. या डेअरीमध्ये विद्यार्थी पदवीचा एक भाग म्हणून प्रशिक्षणही घेतात. सदर डेअरीतील पदार्थांची निर्यातदेखील होते. 
संपर्क - 02692 - 225843

प्रशिक्षण शिबिरे

1)"विद्या डेअरी' येथे विविध विषयांवर 3 ते 7 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर राबविले जाते. जास्त फॅटचे दुग्धपदार्थ तयार करणे, "दुग्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास नसलेल्या व्यावसायिकांसाठी दुग्ध तंत्रज्ञानातील बारकावे सांगणे, आंबवलेल्या दुग्धपदार्थासंबंधीचे तंत्रज्ञान, मोझारेला चीज निर्मिती, चेडार चीज निर्मिती, प्रोसेस चीज निर्मिती इत्यादी विषयांवर प्रशिक्षण राबविले जातात. 
2) कमीत कमी बारा प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणार असतील तर आवश्‍यक असलेल्या किंवा हव्या त्या विषयासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. 
3) तज्ज्ञ व्याख्याते तंत्रज्ञान समजावून देतात. विद्या डेअरीत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके होतात. 
संपर्क - 02692 - 262501 
संकेतस्थळ - www.vidyadairy.in/ contact.php

राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळ, आणंद (गुजरात)

1) डेअरी विषयात महत्त्वाचे काम करणारे हे महामंडळ आहे. देशभरातील अनेक तज्ज्ञांचा या महामंडळात समावेश आहे. 
2) प्रकल्प उभारणीसाठी संपूर्ण सल्ला देणे, तांत्रिक साह्य करणे हीदेखील महामंडळाची महत्त्वपूर्ण कामे आहेत. व्यावसायिकांना इथल्या तज्ज्ञांचा प्रकल्प उभारणीसाठी सल्ला घेता येईल. 
संपर्क - 02692 - 260148, 260149

राज्यातील कृषी विद्यापीठे

1) राहुरी, दापोली, अकोला आणि परभणी येथील कृषी विद्यापीठांतील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात झालेले संशोधन तसेच तेथील तज्ज्ञांची मदत व्यावसायिकांना घेता येईल. 
2) अन्न तंत्रज्ञान विभागातील तंत्रज्ञांचीही मदत घेता येईल. 
3) वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांत दुग्धजन्य पदार्थांवर संशोधन झालेले आहे. त्या-त्या विद्यापीठातील ग्रंथालयांमध्ये विभागातील संशोधित माहिती प्रबंधांत मिळू शकते. याचा व्यावसायिकांना खूप फायदा होईल. 
संपर्क - अधिक माहितीसाठी कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाशी संपर्क साधावा.
भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई 
1) दुग्ध पदार्थांतील पॅकेजिंगसंदर्भात सखोल माहिती तसेच पॅकेजिंग घटकांच्या विविध प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी या संस्थेचा उपयोग होतो. 
2) ठराविक शुल्क भरून पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅकेजची चाचणी करता येते. 
संकेतस्थळ -www.iip-in.com

इंडियन डेअरी असोसिएशन, दिल्ली

1) या संस्थेचे दिल्ली येथे मुख्य कार्यालय आहे. विभागीय स्तरावर देशात चार ठिकाणी कार्यालये आहेत. 
2) असोसिएशनमार्फत दरवर्षी सभा आयोजित केली जाते. यात दुग्धव्यवसायातील संशोधनाचे सादरीकरण, महत्त्वाच्या विषयांवरील साधकबाधक चर्चा होते. तसेच असोसिएशनतर्फे "इंडियन डेअरीमन', "इंडियन जर्नल ऑफ डेअरी सायन्स' ही इंग्रजीतील दोन नियतकालिके प्रसिद्ध होतात. 
3) या संस्थेने खवा, पनीर, छन्ना, निवळी इत्यादींवर प्रसिद्ध केलेल्या लहान माहितीपुस्तिका उपयुक्त आहेत. 
संपर्क - 011 - 26170781, 26165355 

संपर्क - डॉ. धीरज कंखरे -9405794668 
( लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

3.05
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:16:25.650759 GMT+0530

T24 2019/10/14 23:16:25.657348 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:16:25.260303 GMT+0530

T612019/10/14 23:16:25.279104 GMT+0530

T622019/10/14 23:16:25.329243 GMT+0530

T632019/10/14 23:16:25.329992 GMT+0530