Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:56:23.038037 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / तृणधान्यापासून खाद्यपदार्थ
शेअर करा

T3 2019/10/14 23:56:23.042806 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:56:23.068569 GMT+0530

तृणधान्यापासून खाद्यपदार्थ

तृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा उपयोग करण्यासाठी तृणधान्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करणे फायदेशीर ठरते.

तृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा उपयोग करण्यासाठी तृणधान्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करणे फायदेशीर ठरते. बाजारपेठेत अशा पदार्थांना चांगली मागणी आहे.

भारतामध्ये जगाच्या तुलनेत ३० टक्के तृणधान्याचे  उत्पादन होते. सध्या नाचणी, बाजरी, भगर यांचा जास्त प्रमाणात वापर होतो. यातील आहारमूल्य लक्षात घेता वरी, राळा यांचा खाद्यपदार्थांमध्ये वापर वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्यामध्ये उपलब्ध असलेली खनिजे आणि जीवनसत्त्वामुळे या धान्यांकडे स्वास्थ्यवर्धक म्हणून पाहिले जाते.

बाजरी

पिठाची भाकरी तयार केली जाते. याचबरोबरीने खारोड्या आणि पापड्यांनाही चांगली मागणी आहे.

नाचणी

भाकरीच्याबरोबरीने अलीकडच्या काळात पापड्या आणि बिस्किटांनाही चांगली मागणी वाढली आहे. नागलीची खीरही आरोग्यवर्धक आहे.

भगर

उपवासासाठी भगर वापरली जाते. याचबरोबरीने भगरीच्या पापड्यांनाही चांगली मागणी आहे.

कोदो आणि कुटकी

ही दोन्ही तृणधान्यांचे मध्यप्रदेशात चांगल्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यांचा उपयोग करण्यापूर्वी त्याच्या वरचे साल काढून त्यानंतर दळून पिठाची भाकरी केली जाते. याच्या पापड्याही चांगल्या तयार होतात.

राळा

राळ्याचा उपयोग टरफल काढून भात आणि खिरीसाठी केला जातो.

वरी

वरीचा तांदूळ काढून त्याच्या खाद्यपदार्थात वापर करतात. यापासून भात व खीर तयार केली जाते.

ज्वारी

ज्वारीची भाकरी खाण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. पिवळी ज्वारी ही बीड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत पेरली जाते. तिचा वापर खाद्योपयोगात केला जातो.

मका

महाराष्ट्रामध्ये मक्‍याचे उत्पादन वाढत आहे. विशेषकरून कोंबडी खाद्यासाठी मक्याची मागणी आहे. पंजाबमध्ये मक्‍याची भाकरी आणि मोहरीच्या पानाची भाजी (साग) हिवाळ्यात आवडीने खाल्ली जाते.

भारतातील तृणधान्यांचा उपयोग

खाद्योपयोग- ७५  टक्के

पशुखाद्य - ११ टक्के

बी/ बियाणे - २ टक्के

प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ - २ टक्के

प्रक्रियेत वाजाणारे घटक - १० टक्के

लेखक : डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४,

(लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)

2.88235294118
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:56:23.359327 GMT+0530

T24 2019/10/14 23:56:23.365903 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:56:22.957558 GMT+0530

T612019/10/14 23:56:22.977334 GMT+0530

T622019/10/14 23:56:23.027234 GMT+0530

T632019/10/14 23:56:23.028065 GMT+0530