Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:51:25.291169 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 23:51:25.295781 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:51:25.322032 GMT+0530

परसबाग

या भागात परसबागेचे महत्व, जागेची निवड तसेच कोणत्या मोसमात कोणत्या भाज्या लावाव्यात यासंबधी माहिती दिली आहे.

प्रस्तावना

भाज्यांचे स्थान आपल्या जीवनात, विशेषत: शाकाहारी लोकांच्या, अत्यंत महत्वाचे आहे. भाज्या ह्या पोषक मूल्येच नव्हे तर चवीच्या देखील एकमात्र साधन आहेत. आहार तज्ञांच्या मते, एका प्रौढाला आहारात समतोलपणा राखण्यासाठी दर रोज 85 ग्राम फळे व 300 ग्राम भाज्यांचे सेवन करायला हवे. पण आपल्या देशांतील भाज्यांच्या उत्पादनाच्या पातळीप्रमाणे माणशी रोज 120 ग्राम भाज्या फक्त वाट्याला येतात.

 

परसबाग


वरील तथ्ये लक्षांत घेता, उपलब्ध असलेले स्वच्छ पाणी वापरून आपल्या परसदारच्या जागेचा आणि स्वयंपाकघर तसेच न्हाणीघरातील सांडपाण्याचा उपयोग करून आपण स्वत:च भाज्या पिकवायला हव्यात. यामुळे सांडपाणी सांचून आरोग्याच्या दृष्टिने आपल्यासाठी हानिकारक न ठरता त्या पाण्याचा उपयोग होवून आपण आपल्या गरजेपुरत्या भाज्यांची लागवड करू शकतो. लहानशा जागेतील लागवड कीटक आणि रोग नियंत्रित राहू शकते आणि आपण रासायनिक द्रव्ये न वापरता देखील लागवडीची काळजी घेवू शकतो. ही एक सुरक्षित पध्दत आहे ज्यायोगे पिकविलेल्या भाज्यांमध्ये कोणतेही रासायनिक अंश नसतात.

परसबागेसाठी जागेची निवड


परसदारी भाज्यांची लागवड करण्यासाठी मर्यादित जागा असतील. बहुतेक शेवटी घराच्या परसदारी असलेले अंगण निवडण्यात येते. हे फार सोपे पडते कारण सवडीच्या वेळी भाज्यांकडे घरातील माणसांचे लक्ष राहू शकते आणि घरातील सांडपाण्याचा देखील सदुपयोग होतो. परसबागेचा आकार जागेची उपलब्धता आणि किती लोकांसाठी भाजीची लागवड करायची आहे यावर अवलंबून आहे. परसबागेचा आकार कसा असावा याबाबत काही बंधन नाही तरी पण आयताकार चांगला दिसतो. अनुक्रमिक आणि इंटरक्रॉपिंग पध्दतीने, पांच सेंट जागा चार किंवा पांच माणसांच्या कुटुंबासाठी भाज्या लावण्यास पुरेशी आहे.

जमिनीची तयारी

सर्वांत आधी एका खुरप्याने 30-40 सें.मी. खोलवर खणावे आणि दगड-गोटे, लहानखुरी रोपटी सर्व उपटून टाकावे. 100 कि.ग्रा. शेणखत किंवा गांडूळखत जमिनीत मिसळावे. वाफे आणि रांगा 45 किंवा 60 सें.मी.गरजेप्रमाणे तयार कराव्यात. याऐवजी समतल बेड देखील तयार केला जावू शकतो.

 

बिया लावणे आणि रोपणी करणे

सरळ मातीतच बिया लावण्याच्या भाज्या आहेत भेंडी, शेंगा आणि मटार. यांची लावणी शेताच्या कठड्यावर 30 सें.मी. अंतर ठेवून लावू शकता. अमरॅन्थसची (म्हणजे अख्खे रोपटे उपटून पुन्हा लावायचे) लावणी 1 भाग बिया 20 भाग चांगल्या वाळूमध्ये मिसळून लावू शकता. लहान कांदे, पुदीना आणि कोथिंबिर या भाज्या जागेच्या काठा-काठाने लावा. स्थलांतरीत रोपांचे बी जसे टोमॅटो, वांगी आणि मिरच्या नर्सरी बेडवर किंवा कुंड्यांमध्ये लावू शकता. बिया लावून त्यावर माती झाकून मग कडुलिंबाचा पाला पसरावा म्हणजे मुंग्यांपासून संरक्षण होते. 40 ते 45 दिवसांत टोमॅटो, वांगी आणि मिरच्या आणि दोन्ही बाजूंना 10 सें.मी. असे यांचे स्थलांतर मोठ्या कांद्यांसाठी करावे. स्थलांतर केल्यावर लगेच आणि तिस-या दिवशी पाणी घालावे. अंकुर फुटल्याच्या सुरूवातीला नंतर दोन दिवसांनी एकदा पाणी घालावे आणि नंतर 4 दिवसांनी एकदा पाणी घालावे.
परसदारी भाज्या लावण्यामागचा मूळ हेतू हा असतो कि वर्षभर घरातील स्वयंपाकासाठी भाज्यांचा पुरवठा व्हावा. काही पध्दतींचा वापर केला तर हा हेतू सहज साध्य होतो.

 

सतत उत्पन्न देणा-या भाज्या गार्डनच्या एका बाजूला लावाव्या, बहुधा अंगणाच्या मागच्या बाजूला म्हणजे त्यांची सावली इतर झाडांवर पडणार नाही, आणि त्या झाडांची पोषक तत्वे देखील सुरक्षित राहतील.
अंगणातील पायवाटेचा काठ आणि अंगणाचा मध्यभाग यांचा उपयोग अल्पकालीन भाज्यांसाठी करावा जसे कोथिबिर, पालक, मेथी आल्टरमंथरा, पुदीना इत्यादि.

लागवडीचा नमुना


लागवडीचा एक नमुना, भारतीय परिस्थितिंमध्‍ये परसबागेसाठी (हिल स्‍टेशन सोडून) उपयोगी ठरेल.

 

प्‍लॉट नं.

भाजीचे नांव

मोसम/हंगाम

01.

टोमॅटो आणि कांदा
मुळा
शेंगा
भेंडी (ओकरा)

जून-सप्‍टें.
ऑक्‍टो-नोव्‍हें.
डिसे-फेब्रु.
मार्च-मे.

02

वांगी
शेंगा
टोमॅटो
अमरॅन्थस

जून-सप्‍टें.
ऑक्‍टो-नोव्‍हें जून-सप्‍टें..
मे.

03

मिरची आणि मुळा
मटार
कांदा (बेलारी)

जून-सप्‍टें.
डिसे;-फेब्रु.
मार्च-मे.

04

भेंडी व मुळा
कोबी
गवारीच्‍या शेंगा

जून-ऑग.
सप्‍टें-डिसें.
जाने-मार्च

05.

बेलारी कांदा
बीट रूट
टोमॅटो
कांदा

जून-ऑगस्‍ट
सप्‍टें-नोव्‍हें
डिसें-मार्च
एप्रिल-मे

06

गवारीच्‍या शेंगा
वांगी व बीट रूट

जून-सप्‍टें
ऑक्‍टो-जाने

07

बेलारी कांदा
गाजर
लाल भोपळा (लहान)

जुलै-ऑगस्‍ट
सप्‍टे-डिसें
जाने-मे

08

लबलब (झुडूपासारखे)
कांदा
भेंडी
कोथिंबिर

जून-ऑगस्‍ट
सप्‍टें-डिसें.
जून-मार्च
एप्रिल-मे

निरंतर भाज्‍यांचा प्‍लॉट


शेवग्‍याच्‍या शेंगा, केळी, पोपई, टॅपियोका, कढीपत्ता आणि अगाथी. वरील लागवडीच्‍या नमुन्‍यावरून हे कळलेच असेल की संपूर्ण वर्षभर काही जमिनींमध्‍ये लागवड होवू शकते (एका मागून एक) आणि जेथे शक्‍य असेल तेथे दोन पिके (एक दीर्घकालीन आणि दुसरे अल्‍पकालीन) अशी पिके एकत्रच आणि एकाच प्‍लॉटवर घेतली जातात.

 

बागेचे अर्थिक फायदे


बाग करणारा या भाज्‍यांनी आधी स्‍वत:च्‍या कुटुंबाचे पोट भरतो आणि मग विकतो, अदलाबदल करतो किंवा कुणालाही देवून टाकतो. काही बाबतीत, तरीही, अंगणातील भाज्‍या हा मिळकतीचा एक मार्ग ठरतो. कोणत्‍याही परिस्थि‍तीत, हे पोषणावर आरोप लावणारे ठरते की यामुळे मिळकतीचा उद्देश मागे पडतो, कारण पुष्‍कळशा बाबतीत त्‍यांचा संबंध आहे आणि ते तुलनात्‍मक आहेत.
परसबागेचे संभाव्य आर्थिक लाभ खालीलप्रमाणे आहेत;
याच्‍यामुळे खाद्य आणि मिळकत दोन्‍हींचा लाभ होतो.
बागांमुळे खाद्य आणि जनावरांना चारा असा दुप्‍पट फायदा आहे. बागांमुळे घरच्‍या पाळीव जनावरांना चारा मिळतो आणि घरच्‍या इतर गरजांसाठी पुरवठा (हस्‍तशिल्‍प, ईंधन लाकूड, फर्निचर, बास्‍केट, इतर).
बागेतील उत्‍पादनांची आणि जनावरांची विक्री म्‍हणजे बहुधा स्त्रियांसाठी मिळकतीचे स्‍वतंत्र साधन आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

 

3.21212121212
जीवन dabke Jun 20, 2017 02:13 PM

खूप चॅन

sagar nirbhavane Sep 06, 2016 10:39 PM

सर कांदे लावलेले आहेत पण tyancya varti karpa aalela ahe konte औषेध मारायचे

gajale pandurang Feb 06, 2015 11:18 AM

टोमॉटर लागवनी ची माहीती देने १५गंुटे चा पलाट आहे व ऊस दोन एकर आक्टो़.ची लागवन आहे.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:51:25.649135 GMT+0530

T24 2019/10/14 23:51:25.655077 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:51:25.212971 GMT+0530

T612019/10/14 23:51:25.231624 GMT+0530

T622019/10/14 23:51:25.281283 GMT+0530

T632019/10/14 23:51:25.282060 GMT+0530