Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:50:0.670649 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / प्रक्रियेतून मोसंबीचे मूल्यवर्धन
शेअर करा

T3 2019/10/14 23:50:0.675129 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:50:0.700244 GMT+0530

प्रक्रियेतून मोसंबीचे मूल्यवर्धन

मोसंबीपासून स्क्वॅश, सिरप, मार्मालेड, जॅम आदी पदार्थ बनवून मूल्यवर्धन करता येते. अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

मोसंबीपासून स्क्वॅश, सिरप, मार्मालेड, जॅम आदी पदार्थ बनवून मूल्यवर्धन करता येते. अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

मोसंबी स्क्वॅश


प्रथम मोसंबीचा रस काढून, गाळून घ्यावा. स्क्वॅश बनविताना रस कमीत कमी 25 टक्के, एकूण विद्राव्य घटक 45 टक्के व आम्लता 0.8 टक्का असणे आवश्‍यक आहे. वरील प्रमाणीकरणानुसार रस एक लिटर, साखर 1.694 कि.ग्रॅ. सायट्रिक आम्ल 20 ग्रॅम, पाणी 1250 मि.लि., सोडिअम बेंझोएट दोन ग्रॅम या प्रमाणात वापरावे. प्रथम साखर व पाणी एकत्र करून उकळून घ्यावे. हे द्रावण उकळत असताना येणारी मळी काढून घ्यावी. तयार झालेले पाणी व साखरेचे द्रावण थंड करून त्यामध्ये रस एकजीव करून घ्यावा. नंतर दोन ग्लासमध्ये थोडा थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल व दुसऱ्यामध्ये सोडिअम बेंझोएट घेऊन विरघळून घ्यावे व ते स्क्वॅशमध्ये टाकावे. तयार झालेला स्क्वॅश पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घेऊन निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरतात.

सिरप


सिरप बनविताना प्रमाणीकरणानुसार कमीत कमी 25 टक्के रस, एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 65 टक्के, आम्लता 0.8 ते 1.2 टक्का असणे आवश्‍यक आहे. यानुसार एक लिटर रस असल्यास, 2.568 कि.ग्रॅ. साखर, 29 ग्रॅम सायट्रिक आम्ल, सोडिअम बेंझोएट दोन ग्रॅम वापरावे. सिरप तयार करण्याची कृती, पॅकिंग व साठवण स्क्वॅशप्रमाणे करावी. सिरपपासून सरबत बनविताना त्यामध्ये चार ते पाच पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरावे.

जेली


मोसंबीपासून जेली तयार करण्यासाठी रसरशीत ताजी व पक्व फळे निवडावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन, सोलून, पांढरा पापुद्रा काढून स्वच्छ करून घ्यावीत. नंतर स्वच्छ केलेल्या मोसंबीच्या फोडींचे छोटे छोटे काप करून घ्यावेत. एका स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात वरील काप घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात मंद शेगडीवर उकळत ठेवावेत. थोड्या वेळाने शिजविलेले फोडींचे तुकडे मलमलच्या कापडात बांधून टांगून ठेवावेत. कापडातून झिरपणारा फोडींचा रस दुसऱ्या स्टीलच्या पातेल्यात जमा करावा. या रसात 1ः1 या प्रमाणात साखर टाकून रस उकळावा. हे द्रावण एकूण विद्राव्य घटक 67 अंश ब्रिक्‍सच्या वर येईपर्यंतच उकळावे. अशा प्रकारे तयार झालेली जेली रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या बरणीत भरून हवाबंद करून ठेवावी. तयार झालेली जेली थंड व कोरड्या जागी साठवावी.

मार्मालेड

मार्मालेड तयार करताना जेलीमध्ये शिजलेल्या सालीचे तुकडे टाकतात. यासाठी सुरवातीला सालीचे छोटे छोटे तुकडे करावेत. एका स्टीलच्या पातेल्यात हे तुकडे घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात उकळत ठेवावेत. हे करत असताना तीन वेळा पाणी उकळून बदलावे. वर दिल्याप्रमाणे जेली तयार करून घ्यावी. तयार जेलीमध्ये मोसंबीच्या सालीचे तीन वेळा उकळलेले तुकडे टाकावेत व वर दिल्याप्रमाणे हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावे.

जॅम


जॅम तयार करताना पूर्ण परिपक्व झालेली निरोगी फळे निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. फळांवरील साल, पांढरा पापुद्रा काढून स्टीलच्या चाकूने फोंडीचे लहान तुकडे करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. हे तुकडे मिक्‍सरमध्ये फिरवून लगदा तयार करावा. प्रमाणीकरणानुसार जॅम बनविताना कमीत कमी 45 टक्के लगदा, एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 68.5 टक्के व आम्लता 0.6 ते 1.2 टक्का ठेवावी.

स्त्रोत: अग्रोवन

3.00961538462
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:50:0.985605 GMT+0530

T24 2019/10/14 23:50:0.992015 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:50:0.591262 GMT+0530

T612019/10/14 23:50:0.610294 GMT+0530

T622019/10/14 23:50:0.660792 GMT+0530

T632019/10/14 23:50:0.661572 GMT+0530