Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:33:0.643123 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/26 00:33:0.649119 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:33:0.679280 GMT+0530

फुलशेती सल्ला

ग्लॅडिओलस - ग्लॅडिओलसचे दांडे काढणी केल्यानंतर, त्यांची प्रतवारी फुलदांड्यावरील फुलांची संख्या, रंग व दांड्याच्या लांबीनुसार करावी.

 

गुलाब

सध्या "व्हॅलेंटाईन डे'साठी फुलांची मागणी वाढली असून, डच गुलाबाप्रमाणेच देशी लाल गुलाबाच्या विविध जातींना चांगले दर मिळू शकतात. त्यासाठी गुलाब फुलांच्या काढणीनंतर प्रतवारी व पॅकिंग करून बाजारात पाठवावेत. काढणी बाजारपेठेतील मागणीप्रमाणे कळी अवस्थेत किंवा 1-2 पाकळ्या फुलकळीपासून अलग झाल्यानंतर करावी.
ग्लॅडिओलस - ग्लॅडिओलसचे दांडे काढणी केल्यानंतर, त्यांची प्रतवारी फुलदांड्यावरील फुलांची संख्या, रंग व दांड्याच्या लांबीनुसार करावी. कंद पोषणासाठी झाडावर कमीत कमी 4 पाने ठेवून दांड्याची काढणी करावी. काढणी केलेल्या पिकास पाणी द्यावे.

शेवंती

पूर्ण उमललेल्या शेवंती फुलांची काढणी करावी. शेवंती फुलांची काढणी पूर्ण झाली असल्यास शेवंतीच्या पुढील लागवडीसाठी भरपूर काड्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून शेवंतीची झाडे जमिनीपासून 15-20 सें.मी. अंतरावर छाटावीत. लागवडीसाठी शेवंतीची रोपे तयार करताना माती मिश्रणाने (1ः1) पिशव्या भरून घ्याव्यात. या पिशव्यात 8-10 सें.मी. लांबीचे शेंडे छाटून लावावेत. छाट्यांना भरपूर मुळ्या फुटण्यासाठी छाट्याच्या बुडाकडील 2-3 पाने काढून छाट्यांची टोके ह्युमिक ऍसिडच्या द्रावणात बुडवून लावावेत.

मोगरा

मोगरा पिकाला वेळेत पाणी द्यावे.
उन्हाळी फुलपिके - उन्हाळी हंगामात फुलझाडे (उदा. झेंडू, गॅलार्डिया इ.) लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.

पॉलिहाउसमधील फुलशेती

पॉलिहाउसमधील फुलपिकामध्ये प्रामुख्याने डच गुलाबांची लागवड असल्यास हा कालखंड फुलांच्या काढणीचा आहे. या काळामध्ये गुलाब दांड्याची काढणी बाजारपेठेतील मागणीप्रमाणे वेळेवर व काळजीपूर्वक करावी.

  • गुलाबाच्या दांड्याच्या लांबी, फुलांचा रंग, फुलांचा आकार पाहून प्रतवारी करावी. त्यामध्ये पानावरही रोगकिडीचा प्रादुर्भाव नसावा. एका बंचमधील गुलाबांची वीसही फुले एकसारखी व एका पातळीत लावलेली दिसावीत. या फुलांना चांगला दर मिळतो.
  • तसेच पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण करतेवेळी पानावर, फुलांवर डाग राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
  • गुलाब, कार्नेशन फुलपिकांमध्ये फुलदांड्यावरील फुट काढून टाकावी.
  • जरबेराची वाळलेली व रोगट पाने काढून टाकावीत म्हणजे फुलांची प्रत सुधारण्यास मदत होते.


संपर्क - 
डॉ. सतीश जाधव, 9404683709 
(लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड पुणे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत : अग्रोवन

3.0
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
Kishor Rane Apr 29, 2017 03:05 PM

गुलाब शेती करायची एका एकरात किती झाडे लागतिल आणि खर्च किती येईल व सध्या बाजारात किती रक्कम मिळु शकेल

अभय Mar 19, 2017 11:05 PM

सर मला daisy फुलाची माहिती हवी आहे

वसंत इंगळे Mar 17, 2017 09:52 PM

गुलाब शेती करायची एका एकरात किती झाडे लागतिल आणि खर्च किती येईल व सध्या बाजारात किती रक्कम मिळु शकेल

दिनेश पालवे Nov 01, 2016 01:01 PM

सर , मला फूल उत्पादन करायच आहे.मला पूर्ण पने माहिती मिळेल का? 77*****27

मंगेश नाईकवाडी Aug 18, 2016 06:52 PM

सुक्या फुलाची शेती व त्या संबधीत व्यापार माहीती द्यावी

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:33:1.042488 GMT+0530

T24 2019/05/26 00:33:1.048988 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:33:0.520956 GMT+0530

T612019/05/26 00:33:0.554555 GMT+0530

T622019/05/26 00:33:0.612955 GMT+0530

T632019/05/26 00:33:0.614000 GMT+0530