Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:09:27.425448 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / भुईमुगापासून दूधनिर्मिती
शेअर करा

T3 2019/10/17 06:09:27.430746 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:09:27.456214 GMT+0530

भुईमुगापासून दूधनिर्मिती

धियाना येथील सिफेट या अन्नप्रक्रिया विषयात संशोधन करणाऱ्या संस्थेने भुईमुगाच्या दुधावर आधारित उत्पादनाचे तंत्रज्ञान व्यावसायिकांना देऊ केले आहे.

धियाना येथील सिफेट या अन्नप्रक्रिया विषयात संशोधन करणाऱ्या संस्थेने भुईमुगाच्या दुधावर आधारित उत्पादनाचे तंत्रज्ञान व्यावसायिकांना देऊ केले आहे. उत्तर प्रदेशातील एका उद्योजक संस्थेला सिफेटमार्फत हे उत्पादन व्यावसायिक स्तरावर उत्पादित करण्याचा परवाना मिळाला आहे. भुईमुगावर आधारित उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करण्यात सिफेट संस्थेने यश मिळवले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ही संस्था कार्यरत आहे.

सिफेटमधील वरिष्ठ संशोधक डॉ. यादव याविषयी माहिती देताना म्हणाले, की आम्ही विकसित केलेल्या भुईमूग दुधाला कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल गंध येत नाही, त्यामुळे बाजारपेठेत त्याला चांगली मागणी असेल. सुमारे पाच ते सहा लाख रुपयांची गुंतवणूक करून या दूध निर्मितीचा प्रकल्प उभारणे शक्‍य होते. तंत्रज्ञान स्वीकारलेले बरेली येथील संबंधित उद्योजक चंद्रपाल जैन म्हणाले, की बाजारपेठेत या दुधाला मागणी नसेल असे कोणतेही कारण मला दिसत नाही.

कॅलिफोर्नियात भुईमुगाच्या दुधाने केव्हापासूनच लोकप्रियता मिळवली आहे. त्याचबरोबर भुईमुगाच्या दुधाचे लोणीही भारतात आयात झाले असून, भारतीय बाजारपेठेत त्याने चांगले स्थान मिळवले आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाला हा एक चांगला पर्याय आहे, असेही जैन यांनी बोलून दाखवले.

सोयाबीन दूधनिर्मितीचेही प्रशिक्षण


शेतकरी हा केवळ शेती करण्यापुरता मर्यादित न राहाता त्याने उद्योजक म्हणूनही पाऊल पुढे टाकले पाहिजे. नव्हे, ती काळाची गरज आहे, असे आता अनेक तज्ज्ञांच्या बोलण्यामधूनही येऊ लागले आहे. सिफेट संस्थेने याच हेतूने सात दिवसांचा सोयाबीन प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला होता. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (आत्मा) यांचे प्रायोजकत्व त्यासाठी लाभले.

देशात दुधाची एकूण मागणी लक्षात घेता, तसेच आरोग्‌ यदायी पर्याय म्हणून सोयाबीन दुधाचा पर्याय पुढे येऊ लागला आहे, असे प्रतिपादन सिफेटचे संचालक डॉ. आर. टी. पाटील यांनी या पार्श्‍वभूमीवर केले आहे. सोयाबीन दुधाव्यतिरिक्त प्र शिक्षणार्थींना टोफूसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांविषयीही प्रशिक्षण देण्यात आले.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.0534351145
anirudha mirikar Jun 01, 2016 01:46 PM

Mr. Shubham Verma (Proprietor)
HARYANA AGRO INDUSTRIES
SCO 6-7, Sai Market, Opp. PNB Bank, Radour Road, Camp, Yamunanagar - 135001, Haryana, India
येथे संपर्क साधावा . त्यांच्या वेबसाईट ला भेट द्या !! त्यावर आपली मागणी नोंदवावी !!
dhanyawad

भरत शेळके पाटील May 24, 2016 08:35 PM

महाशय कृपया भुईमुग व साेयाबीन पासुन दुध व ईतर पदाथँ बनवीणे प्रक्रीया मशीनरी विषयी माहीती दयावी

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:09:27.753899 GMT+0530

T24 2019/10/17 06:09:27.760055 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:09:27.317620 GMT+0530

T612019/10/17 06:09:27.336255 GMT+0530

T622019/10/17 06:09:27.414693 GMT+0530

T632019/10/17 06:09:27.415608 GMT+0530