Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 18:25:4.605933 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / मक्‍याचे दाणे वेगळे करणारे यंत्र
शेअर करा

T3 2019/05/26 18:25:4.610465 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 18:25:4.638024 GMT+0530

मक्‍याचे दाणे वेगळे करणारे यंत्र

कृषी संशोधन संचालनालयाने पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सहजतेने वापरता येईल, असे मक्‍याचे कणीस सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे.

मक्‍याचे दाणे वेगळे करणारे यंत्र विकसित

मका पिकातील सगळ्यात कंटाळवाणे काम कोणते असेल, तर ते म्हणजे कणसावरील आवरण बाजूला करून, त्यातील मक्‍याचे दाणे वेगळे करण्याचे. हे काम बहुतांश ठिकाणी महिलांकडे असते. काढणीनंतर करायच्या प्रमुख कामातील हे काम पूर्वी हाताने केले जात असे. त्यासाठी हाताच्या साह्याने चावण्याची छोटी यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे महिलांवरील या कामाचा भार थोडासा हलका झाला असला तरी त्यासाठी अधिक ताकद लागत असल्याने कमी प्रमाणात मक्‍याचे दाणे वेगळे करता येत होते. त्यातही कणसावरील आवरण काढण्याचे काम हातानेच करावे लागत असे. मात्र भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील महिलांसाठी कृषी संशोधन संचालनालयाने पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सहजतेने वापरता येईल, असे मक्‍याचे कणीस सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे.

..अशी आहेत या यंत्राची वैशिष्ट्ये


  • हे यंत्र दोन व्यक्तींच्या साह्याने चालवता येते. त्यामध्ये एकामागोमाग एक अशी मक्‍याची कणसे आत टाकावी लागतात.
  • पुरुष या यंत्रावर काम करत असताना, या यंत्राच्या क्रॅंकशाफ्टचा वेग 57 (फेरे प्रति मिनिट) आरपीएम ठेवला जातो. त्यामुळे प्रति तास 89.6 किलो दाणे मक्‍याच्या कणसापासून मिळतात.
  • स्त्रिया या यंत्रावर काम करत असताना क्रॅंकशाफ्टचा वेग हा 52 (फेरे प्रति मिनिट) आरपीएम ठेवला जातो. त्यामुळे महिलांनाही हे काम करताना ताण येत नाही. सहजतेने काम करता येते. या वेगाने काम केल्यास प्रति तास 63.4 किलो दाणे वेगळे करता येतात.
  • या यंत्रामुळे हाताच्या साह्याने कणीस सोलणे, दाणे वेगळे करण्यापेक्षा 48.9 टक्के वेळ कमी लागतो.
  • नळीच्या आकाराच्या मका सोलणी यंत्रापेक्षा 38.7 टक्के वेळ कमी लागतो.
  • हे उपकरण 370 वॉट सिंगल फेज इलेक्‍ट्रिक मोटरवर चालते.

 

अधिक माहितीसाठी संपर्क :
महिलांसाठी कृषी संशोधन संचालनालय,

भारतपूर स्क्वेअर, नंदन कानन खांदागिरी रोड,

बारामुंडा, भुवनेश्‍वर- 751003, ओडिशा.

फोन : 0674-2386940, २३८६२४१

 

स्त्रोत: अग्रोवन

2.89380530973
Sumedha May 11, 2017 06:36 AM

Mala machine chi Price malahi

अरूण Sep 03, 2016 10:03 PM

काळे साहेब मकेचे भुटृटे आम्ही घेतो
फो नं-97*****70

योगिराज काळे Feb 29, 2016 10:57 PM

मला हे यंत्र घ्यायचे आहे यंत्राची कीमंत कळावी

राजेंद्र देवरे Oct 29, 2015 03:11 PM

मका दाणे काढल्यावर उरलेल्या भुट्टी चे
उपयोग सांगा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 18:25:4.955032 GMT+0530

T24 2019/05/26 18:25:4.960842 GMT+0530
Back to top

T12019/05/26 18:25:4.527247 GMT+0530

T612019/05/26 18:25:4.545748 GMT+0530

T622019/05/26 18:25:4.596110 GMT+0530

T632019/05/26 18:25:4.596843 GMT+0530