Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:57:43.086939 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / रेशीम उद्योग-धागा निर्मिती
शेअर करा

T3 2019/10/14 23:57:43.091670 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:57:43.117555 GMT+0530

रेशीम उद्योग-धागा निर्मिती

रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून पैठणी, शालू, शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते.

प्रस्तावना

रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून पैठणी, शालू, शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते. त्याकरिता खरेदी केलेल्या कच्च्या रेशीम सूतावर पुढीलप्रमाणे त्यावर क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.

कच्चे रेशीम सूत प्रक्रिया दोन भागांत विभागले जाते :

  1. ताणा म्हणजे उभा धागा किंवा कपडयातील लांबीचा धागा - यात सिंगल टिङ्कस्टींग, डबलिंग, डबल टिङ्कस्टींग, सेटींग, धागा हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.
  2. बाणा म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, टिङ्कस्टींग, सेटींग, हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, कांडी भरणे व कांडी धोटयास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होवून कापड तयार होते.

रेशीम सूत प्रक्रिया

वाईंडिंग:


कच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशिनवर टाकून रिळावर घेतले जाते.

डबलिंग:

रिळावर घेतलेला धागा हा 16/18, 20/22 इ. डेनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन धागे, तीन धागे अगर चार धागे एकत्र घेतले जातात यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल टिङ्कस्ट करुन डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करुन टिङ्कस्टींग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.

टिङ्कस्टींग:


डबलिंग करुन तयार झालेल्या धाग्यास पीळ देवून मजबूती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल टि्स्ट देण्यासाठी एक वा अनेक मशिन उपयोगात आणतात.साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात 8-9 पिन सिंगल स्वरुपाचे तर ताणा धाग्यास एका इंचावर 19-20 डबल पीळ दिले जातात.

सेटींग:

रेशीम धाग्यास पीळ दिल्यानंतर आखूड व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये टिङ्कस्टेड सूताचे ड्रम स्टँडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने 15-20 मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.

हॅकिंक:

कच्च्या सूताप्रमाणे पक्क्या सूताच्या पुन्हा लडया तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हँक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हँकिंग व वाईंडींग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लिचिंग करुन रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के टिङ्कस्टेड सूत यामध्ये 3-4 टक्के घट येते.

डिगमिंग व ब्लिचिंग:

टिङ्कस्टेड रेशीम सूतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होवू शकतो व कपडा आकसू शकतो. तो होवू नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लिचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी 50 लीटर पाणी, 200 ग्रॅम साबण, 300मिलीलीटर हायड्रोजन पेरॉक्साईड, 60 मिलीलीटर सोडियम सिलीकेट हे मिश्रण उकळावे व टिङ्कस्टेड रेशीम सूत 45-60 मिनिटे यात घोळावे. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवावे. 5-6 लिटर पाण्यात 5 मिलीलीटर ऍसिटीक ऍसिड टाकून 10 मिनिटे हे सूत बुडवून ठेवावे. त्यानंतर 5-6 लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून 10-15 मिनिटे बुडवून ठेवावे व पीळून सावलीत सुकवावे. या पध्दतीमध्ये मूळ वजनाच्या 20-25 टक्के घट येते व एक किलो टिङ्कस्टेड सूत डिगमिंग व ब्लिचिंगसाठी 50/-रु. पर्यंत खर्च येतो. 8 तासात 2 कामगार 8-10 किलो सूत डिगमिंग करु शकतात.

 

वार्पिंग:

वार्पिंगमध्ये इंग्रजी व्ही आकाराच्या क्रीलवर 100-100 रिळ असे दोन्ही बाजूस ताणा धाग्याचे अडकवून त्या धाग्यांचा पट्टा फणीतून घेवून धागे क्रॉस करुन बीम भरण्याचे ड्रमवर 1ध्45.65 मीटर1ध्2 कापडाचा तागा लांबीनुसार गुंडाळला जातो. वार्पिंग झाल्यानंतर सर्व पट्टे धाग्याचे बीमवर गुंडाळले जातात व भरलेले बीम हातमागावर सांधणीसाठी जोडली जाते.

बीम सांधणी

बीमवरील धागे पूर्वीच्या मागवरील धाग्यांना जोडून वही फणीमधून ओढून विणकाम सुरु करणे यास बीम सांधणी म्हणतात. बीम सांधणीस एक कामगारास 3 दिवसांचा कालावधी लागतो.

कांडी भरणे:

बाणा धागा रिळावरुन कांडीवर चरख्याच्या सहाय्याने अगर 10 कांडया अर्ध्या हॉर्सपॉवरच्या मोटारने एकाच वेळी भरता येतात. व भरलेल्या कांडयावरील धागा हातमागामध्ये रुंदीच्या धाग्याकरिता वापरला जातो.

विणकाम:

बीम सांधणी आणि कांडी भरणे झाल्यानंतर वीणकाम करता येते. एक विणकर एका हातमागावर 3-4 मीटरपर्यंत रेशीम कापड विणतो. रेशीम कापडावर डिझाईन हे धोटा, डॉबी, जेकॉर्डच्या सहाय्याने रंगीत धागे वापरुन काढता येते. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई करता येते. तसेच भरतकाम व डिझाईनस् काढता येते. भांडवली गुंतवणूक लक्षांत घेता यंत्रमागापेक्षा हातमाग आर्थिकदश्ष्टया व रेशीम कापडाचे वेगळेवेगळे नमुने काढण्यास उपयुक्त ठरतो. हातमागाची पीटलूम, पॅडल हातमाग व अर्धस्वयंचलित हातमाग हे तीन प्रकार असून यंत्रमाग व स्वयंचलित यंत्रमाग असे दोन प्रकार आहेत.

अशा रितीने तयार केलेले रेशीम कापड आकर्षक पॅकिंग करुन विक्रीसाठी पाठविले जाते. ज्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा शेणोली गांवातील तेरा सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन कामधेनु प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. प्रथम त्यांनी प्रत्येकी दरमहा 500 रूपये जमा करून अल्प बचत योजना सुरू केली. या करीता त्यांनी बँक ऑॅफ महाराष्ट्र, शाखा - शेणोली येथे बचत गटाचे स्वंतत्र खाते सुरू केले. त्या खात्यामध्ये वर्षाला 78 हजार रूपये जमा होऊ लागले व यातुनच त्यांनी प्रत्येकी एक एकर मध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला. व संगोपनगश्ह बांधणी करीता बचत रक्कमेतुन पैसे घेतले. बँक अधिकाऱ्यांनी सदर योजनेस प्रोत्साहन म्हणुन 60 हजार फिरते भांडवल (सी. सी.) दिले. सदर रकमेमुळे प्रत्येकाचे स्वंतत्र संगोपन  निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येकाला रेशीम उद्योगापासुन भरपूर अर्थिक लाभ झाला. सदर संस्थेचे यश पाहुन गावांमध्ये जवळपास 50 एकरवर तुतीची लागवड झाली. कराड तालुक्यातील शेतकरी रेशीम उद्योग पहाण्याकरीता शेणोली गावामध्ये येऊ लागले. संस्थेने यापुढे जाऊन सुत निर्मिती प्रकल्पाकरीता एम आय डी सी कराड येथे जागा घेतलेली आहे. शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकरीता आवश्यक असणारे साहित्य व औषधे वाजवी दराने स्थानिक पातळीवर लवकरच उपलब्ध होण्याचे दश्ष्टीने विक्री केंद्र सुरू केलेले आहे. अशा प्रकारे सुशिक्षित तरूणांनी एकत्र येऊन रेशीम उद्योग केल्यास त्यांची निश्चितच अर्थिक उन्नति होईल.

 

रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन


स्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन

3.05109489051
प्रविण जंगापल्ले Mar 28, 2018 02:23 AM

रेशीम धागा निर्मिती संबंधी माहिती हवी आहे आम्ही रेशीम कोष निर्मिती करत आहोत आणखी प्रगती करायची आहे त्यासाठी 83*****05हा मोबाईल नम्बर वर माहिती दया

Gambhire Ravikant Mar 06, 2018 06:00 PM

मला धागा निर्मिती चा प्लांट चालू करायचा आहे तर त्यासाठी ट्रेनिंग कोठे मिळेल ? Mo-84*****77

हनुमंत ल. पाडे Jan 27, 2018 10:44 PM

मला धागा निर्मिती चा प्लांट चालू करायचा आहे तर त्यासाठी ट्रेनिंग कोठे मिळेल ? प्रोजेक्ट कॉस्ट किती असेल ? परवाना कुठला लागेल? त्यासाठी सबसिडी किती मिळेल ? माझा मोबाईल नंबर ९८२३२९४००७.

सविता भराडे Jan 23, 2018 08:15 PM

मला रेशीम धागा निर्मिती चा रिलिंग चा प्रोजेक्ट चालू करायचा आहे त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल का कोणाची

अशोक अरूण हंगे Oct 11, 2017 07:13 PM

मी 1 विनकर आहेत रेशिम खूप महाग झाले आहेत हातमाग चालवणे मुश्किल झालेय सरकार नि काहीतरी करावे मोः89*****37

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:57:43.458554 GMT+0530

T24 2019/10/14 23:57:43.464404 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:57:42.980547 GMT+0530

T612019/10/14 23:57:42.999611 GMT+0530

T622019/10/14 23:57:43.076273 GMT+0530

T632019/10/14 23:57:43.077191 GMT+0530