Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 07:01:40.056684 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / हवामानात सुधारणा
शेअर करा

T3 2019/10/17 07:01:40.061446 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 07:01:40.087026 GMT+0530

हवामानात सुधारणा

हवामानामध्ये आपल्याला आवश्‍यक तसे बदल घडविणे शक्य आहे का, या दृष्टीने गेल्या काही दशकांपासून संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील अशा प्रयत्नांचा हा आढावा.

जगभरामध्ये सुरू आहे सातत्याने संशोधन

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीला हवामानाची विशिष्ट स्थिती आणि हवामानाचे जागतिक घटकही कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र, हवामानामध्ये आपल्याला आवश्‍यक तसे बदल घडविणे शक्य आहे का, या दृष्टीने गेल्या काही दशकांपासून संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील अशा प्रयत्नांचा हा आढावा.

फ्रान्स - १९९५

मध्ये फ्रान्स देशातील संशोधक बेर्थोमियो जीन - फ्रान्सिस्को यांनी आकाशातील ढगावर काही रासायनिक घटकांची प्रक्रिया केल्यास बर्फवृष्टी व गारपीट होणे काही प्रमाणात रोखता येऊ शकत असल्याचे दिसून आले आहे. या तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट वादळापासून संरक्षण करणे असे असले तर गारपीट रोखण्यासाठी त्याचा लाभ होऊ शकत असल्याचे दिसून आले. काय आहे हे तंत्रज्ञान - १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये हायग्रोस्कोपिक सॉल्ट यांच्या साह्याने पाऊस पाडण्यासाठी अशा स्वरूपाचा प्रयोग पहिल्यांदा झाला. यामध्ये कॅलशियम किंवा सोडीयम क्लोराईड या क्षारांचे मिश्रण अत्यंत सूक्ष्म स्वरूपामध्ये विमानांच्या साह्याने ढगामध्ये सोडले जाते. या पद्धतीमध्ये ढगांतील पाण्याचे रूपांतर बर्फात होण्यापूर्वीच रूपांतर पावसात केले जाते. अशा प्रकारची घटना नैसर्गिकपणे होताना दिसून येते. - या पद्धतीवर अधिक प्रयोग फ्रान्समध्ये १९९५ ते २००३ या कालावधीमध्ये करण्यात आले. त्यामध्ये ४२ हेलीपॅड आणि ११४ रेनगेजेस आणि १० अत्याधुनिक हवामान केंद्राचा उपयोग करीत प्रयोग केले गेले. - प्रयोगाचा आराखडा तयार करण्यापूर्वी टायटन या संगणक प्रणालीचा उपयोग करून वातावरणातील ढगांची माहिती गोळा करण्यात आली. - पोटॅशिअम आणि सोडियम क्लोराईड या क्षारांचा वापर दक्षिण आफ्रिकेतील प्रयोगामध्ये केला होता. त्यासोबतच या प्रयोगामध्ये कॅल्शिअम क्लोराईड या घटकांचाही वापर करण्यात आला. या क्षारांच्या कणांचा आकार ०.३ पासून ०.५ मायक्रॉन इतका सूक्ष्म ठेवण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारच्या ढगामध्ये वरील क्षार २३ मिनिटांसाठी सोडले. निष्कर्ष - एकूण ९५ ढगांवर क्षारांचे प्रयोग झाले, त्यापैकी

  1. ५५ ढगांनी क्षार भरण्यापूर्वी, भरताना, भरल्यानंतर कोणत्याही प्रकारची बर्फवृष्टी केली नाही.
  2. २७ ढगांनी प्रक्रियेनंतर हिमवृष्टी केली नाही.
  3. १३ ढगांमध्ये क्षारांची प्रक्रिया करूनदेखील बर्फाचा पाऊस पडला. या प्रयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढील पाच वर्षे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये पोटॅशियम क्लोराईडऐवजी कॅल्शियम क्लोराईड; तसेच क्षारांचा आकार ०.५ वरून ०.८ पर्यंत वाढविण्यात आला.

हवामान सुधारणेसाठी होताहेत चीनमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न

गेल्या काही वर्षांमध्ये हवामानामध्ये बदल घडवून आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे बदल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. चीनमध्ये अत्यंत सुसंघटीतरीत्या प्रयत्न केले जात असून, स्थानिक शेतकऱ्यांची मदत घेतली जाते.

चीनमध्ये २००० ते २००५

या कालावधीमध्ये हवामानामध्ये बदल करण्याच्या प्रयोगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. शास्त्र आणि तंत्रज्ञान मंत्रालय (MOST) यांच्या पुढाकारामुळे हवामानामध्ये गरजेनुसार सुधारणा करण्यासाठी आवश्यक साधनांची, यंत्राच्या निर्मितीला वेग आला. त्यामध्ये अत्याधुनिक रडार, मायक्रोवेव्ह रेडिओमीटर्स, एअरक्राफ्टद्वारा संचलित विविध उपकरणांचा समावेश होता. त्याबाबत माहिती देताना हवामान सुधारणा केंद्राचे संचालक गुओ झुईलियांग यांनी सांगितले, की ढगांमध्ये पावसाचे बीज पेरणे, पावसाला चालना देणे याचे महत्त्व आम्ही जाणून आहोत. या साऱ्या बाबी नियंत्रित व कार्यक्षमपणे करण्यासाठी शास्त्रीय प्रयोगांची आवश्यकता असून, ते केले जात आहेत. - ॲकॅडमी ऑफ मटेरॉलॉजिकल सायन्सेस येथील वांग गुआंघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या 30पेक्षा अधिक प्रांतामधील स्थानिक पातळीवरील प्रशासने आर्टिलरी आणि एजी1 या घटकांचा रॉकेटच्या साह्याने वापर करतात. त्यातील २४ एजी१ फ्लायरचा वापर एअरक्राफ्टच्या साह्याने पाऊस वाढीसाठी करीत आहेत. या साऱ्या रचनेसाठी सुमारे ३३ हजार लोक आणि ७१०० ॲण्टीएअरक्राफ्ट गन, ४९९१ रॉकेट लॉंचर आणि ३६ एअरक्राफ्ट सातत्याने राबत आहेत. या एअरक्राफ्टच्या प्रतिवर्ष सरासरी सुमारे ५०० फेऱ्या होतात. - एकट्या बिजिंग भागामध्ये हवामान विभागाच्या अंतर्गत हवामान सुधारणेसाठी १६ पूर्णवेळ आणि १३५ अर्धवेळ हवामान सुधारक कार्यरत असून, त्यामध्ये बहुतांश स्थानिक शेतकरी आहेत. शहराच्या पश्चिमेला असलेल्या फ्राग्रॅंट हिल्स पार्कवर ३१ ॲण्टीएअरक्राफ्ट गन आणि ४६ रॉकेट लॉंचरपैकी बहुतांश ठेवले आहेत. त्याद्वारे योग्य अशा ढगामध्ये एजी1 घटकांचे लॉंचिंग केले जाते. - या साऱ्या लोकांसाठी काही आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आणि परवाना देण्याचे काम केले जाते. त्यामुळे स्थानिक शेतकरीही तातडीच्या प्रसंगी कामी येतात. या शेतकऱ्यांना प्रत्येक शेलच्या लॉंचिंगसाठी ५० युआनपर्यंत मानधन दिले जाते. हे शेतकरी प्रतिवर्ष सुमारे ४० वेळा आपले कर्तव्य बजावतात.

हवामान सुधारण्यासाठी आहे वार्षिक अंदाजपत्रक

चीनचे हवामान सुधारण्यासाठीचे वार्षिक अंदाजपत्रक ६१५ दशलक्ष युआन इतके आहे. त्यामुळे २००० या वर्षापासून सुमारे 250 अब्ज टन कृत्रिम पाऊस पाडण्यात यश आले आहे. त्याचा फायदा 400 दशलक्ष लोकांना झाला आहे. - चीन हवामान विभागातील कृत्रिम पाऊस विषयाचे तज्ज्ञ हू झिजीन यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांमध्ये बिजिंग शहरावर पडलेल्या जवळपास प्रत्येक पाऊस हा हवामान विभागाच्या ढगामध्ये बीज पेरण्याच्या पद्धतीचा परिणाम आहे. - अकराव्या पंचवार्षिक (२००६ ते २०१०) मध्ये ४८ ते ६० अब्ज घन मीटर कृत्रिम पाऊस प्रतिवर्ष पाडण्यासाठी नियोजन केले होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी त्यामध्ये वाढ होत गेलेली आहे. - एक जानेवारी २००० मध्ये चीनमध्ये हवामानविषयक कायदा तयार करण्यात आला असून त्यामध्ये कृत्रिम पाऊस किंवा बर्फवृष्टीसाठी प्रयत्न करणे, गारांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवणे, पावसाच्या विस्तार व पडण्यावर नियंत्रण ठेवणे, धुके पसरवणे यांचा समावेश करण्यात आला आहे.

लक्ष्य २०२० चे ...

- २०१३ ते २०२० या कालावधीसाठी चीनच्या सहा प्रदेशामध्ये हवामान नियंत्रणासाठी यंत्रणा बसविण्याचे नियोजन असल्याचे सीएमएच्या वरिष्ठ संशोधक यावो झांयू यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की याचा उपयोग ईशान्य, मध्य, आणि आग्नेय विभागातील गहू पिकांचे अवकाळी पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी, तर वायव्य प्रांतामध्ये पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने होणार आहे. तसेच या भागातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. उत्तरेच्या भागामध्ये खात्रीपूर्व पाण्याची सोय होऊ शकेल. मे २०१२ मध्ये ईशान्य भागामध्ये पथदर्शी प्रकल्प राबविला असून, त्यातून प्रकल्पाची व्यवहार्यता समोर आली आहे. - चीन येथील राज्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० पर्यंत प्रतिवर्ष ६० अब्ज टन पाऊस याद्वारे पाडण्याचे नियोजन असून, ५ लाख ४० हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळावरील गारपिटीला कृत्रिमरीत्या रोखण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.

ढगामध्ये पावसाचे बीज पेरण्याच्या पद्धतीविषयी तांत्रिक माहिती

पावसाचे बीज म्हणून ओळखले जाणारे मिश्रणामध्ये एजी१ (पायरोटेक्निक अवस्थेमध्ये) , ऍझोटिक कुलिंग लिक्वीड, ड्राय आईस (कार्बन डायऑक्साईड) आणि प्रोपेन यांचा समावेश असतो. - हे मिश्रण योग्य ढगांपर्यंत पोचविण्यासाठी एअरक्राफ्ट, रॉकेट, आर्टिलरी शेल, हवामान विभागाचे बलून या सोबत डोंगरावरील विविध उपकरणांचा वापर केला जातो. - एक ग्रॅम एजी१ मुळे सुमारे एक लाख अब्ज इतके बर्फ स्फटिक तयार होतात. ढगांच्या निर्मितीसाठी आवश्यक नायट्रोजन आणि कॅल्शिअम क्लोराईड यांसारखे अनेक घटक ढगामध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतात.

लेखन : प्रा. कर्णेवार एस. डी., प्रा. नलावडे एन. ए. (लेखक कृषी महाविद्यालय, बारामती जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत : अग्रोवन २६ मार्च २०१४

2.98461538462
nandkumar yadav Jul 20, 2014 04:29 PM

bhartat ase prayant ka hot nahit.

santosh desai Jul 15, 2014 04:52 PM

वरील प्रमाणे जी माहिती दिली आहे, नक्कीच उपयुक्त आहे. पण महत्वाचे, असे काही प्रयत्न भारतात होतायेत का? चीनमध्ये जे प्रयत्न तेथील स्थानिकांना हाताशी घेऊन किंवा स्थानिकांच्या मदतीने होत आहे ते भारतात होतायेत का. मला आवर्जून सांगावेसे वाटते की याला भारतीय प्रवृत्ती अतिशय जबाबदार आहे. ती बदलवणे अतिशय महत्वाचे आहे . शेतीप्रधान भारतात हे सर्व केव्हाच व्हायला हवे होते. या सर्व गोष्टीना केव्हाच सुरवात व्हायला हवी होती. कोणतेही नवीन तंत्राद्यान आणताना त्याच्या दुष्परिणामांचा केव्हाच विचार होताना दिसत नाही आणी दुष्परिणाम झाल्या नंतर विचार होतो हि अतिशय वाईट गोष्ट आहे आणी हे सर्व सुधारेल का हा माझा प्रश्न आहे. नाहीतर पृथ्वीच्या अंताला वेळ लागणार नाही.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 07:01:40.335907 GMT+0530

T24 2019/10/17 07:01:40.341977 GMT+0530
Back to top

T12019/10/17 07:01:39.985662 GMT+0530

T612019/10/17 07:01:40.003720 GMT+0530

T622019/10/17 07:01:40.046400 GMT+0530

T632019/10/17 07:01:40.047228 GMT+0530