Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:34:20.579276 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / उन्हाळी पीके जगविण्याचे मार्ग
शेअर करा

T3 2019/05/26 00:34:20.583973 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:34:20.610136 GMT+0530

उन्हाळी पीके जगविण्याचे मार्ग

उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उष्ण हवा, कोरडे हवामान, आणि सोसाट्याचा वर यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होते

उन्हाळी पीके जगविण्याचे मार्ग

उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उष्ण हवा, कोरडे हवामान, आणि सोसाट्याचा वर यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होते. त्यामुळे जमिनीतली ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात लवकर कमी होते. त्यामुळे पाणी लवकर द्यावे लागते, पाळ्याही जास्त द्याव्या लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा अवघड स्थितीत पिकांना पाणी देताना फारच काळजी घ्यावी लागते.

काटकसरीने पाणी वापरण्यासंबंधी काळजी घ्यावी लागते

  मध्यम ते भारी जमिनीची जलधारा शक्ती जास्त असल्याने अशा जमिनीत उन्हाळी पीके घ्यावीत.

  पाण्याची उपलब्धता पाहूनच कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागण करावी. पाण्याचा अपव्यय टाळावा. पाट स्वच्छ ठेवावेत. रान बांधणी सहजपणे पाणी बसेल अशा पद्धतीने करावी.

  उन्हाळ्यात पिकांच्या शिफारशीप्रमाणे योग्य जात, रोपांची संख्या, योग्य खतमात्रा, कीड-रोग नियंत्रण, तणांचा बंदोबस्त याकडे काश देणे आवश्यक आहे.

  पिकाला क्षेत्राच्या सर्व क्षेत्रावर सम-प्रमाणात पाणी बसवण्यासाठी योग्य रानबांधणी करावी, भुईमुग, मुग, घासासारख्या, पिकांना थोडा ढाळ असलेले ३ मीटर रुंदीचे आणि २५ ते ३० मीटर लांबीचे सारे करून पाणी द्यावे.

  बश्पिभावानाची क्रिया कमी करण्यासाठी सेंद्रिय मटेरियल उष्टावळ, पालापाचोळा, निकृष्ठ गवत, पाचट-वेगवेगळा खाण्याअयोग्य भुसा-भुसकट, प्लास्टिक कागद यांचे पिकामध्ये आच्छादन करावे. आच्चादानामुळे ३०-४०% पाण्याची गरज कमी होते.

 

स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव

2.97142857143
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:34:20.838406 GMT+0530

T24 2019/05/26 00:34:20.844998 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:34:20.508964 GMT+0530

T612019/05/26 00:34:20.528037 GMT+0530

T622019/05/26 00:34:20.569042 GMT+0530

T632019/05/26 00:34:20.569858 GMT+0530