Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:04:26.856726 GMT+0530
मुख्य / शेती / शेती गुंतवणूक / माती परीक्षण / मातीपरीक्षणासाठी नमुना
शेअर करा

T3 2019/10/14 07:04:26.861979 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:04:26.891290 GMT+0530

मातीपरीक्षणासाठी नमुना

मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा: फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.

परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्‍यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते.

नमुना घेण्याची पद्धत

1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा. : फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.

2) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.

3)पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत संबंधित जमिनीतून माती नमुना घेऊ नये.

4) निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.

5) माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.

6) शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.

असा घ्या मातीचा नमुना

1) नमुना काढण्यासाठी शेतात गेल्यानंतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. हे विभाग पाडताना जमिनीची रंग, खोली, पोत, उंच-सखलपणा, पाणथळ किंवा टोपण जागा इ., बाबींचा विचार करावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

2) एका हेक्‍टरमधून 15 ते 20 ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी (व्ही) आकाराची हंगामी पिकासाठी 25 सें.मी., तर फळपिकासाठी 60 सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.

3) खड्ड्याच्या सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून, ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी.

4) अशा तऱ्हेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत आणि पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत.

5) अशा तऱ्हेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे. मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे नंबर/ गट नंबर व पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून मातीपरीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.

 

लेखक - रवी सारोदे, दहिवडी, जि. सातारा
संपर्क - 02426- 243209 
मृदशास्त्र व कृषी रसायन विभाग, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

माहिती संदर्भ :अॅग्रोवन

2.96341463415
विकास गवते Jan 09, 2018 10:23 AM

जालना जिल्हयात माती परीक्षण कोठे करून भेटेल

बळीराम गोजे Mar 22, 2017 06:49 AM

औरंगाबाद जिल्हयात माती परीक्षण कोठे करून भेटेल

निलेश इंगळे Aug 05, 2016 06:28 PM

माझे शेत एकदम तलावाच्या पाझराखाली येते त्यामूळे शेतात खुपच पाणी राहते आणि पिक वाया जाते. दरवर्षी असेच होते त्यामुळे खूप नुकसान होते. कुरपया काही मार्गदर्शन होईल का!!!!
माझा मो. 96*****81

निलेश वॉस्टर Aug 04, 2016 10:13 AM

मातीचा नमुना ओला असलातर किती दिवस सुकवला पाहिजेल? सर

अविनाश Apr 07, 2016 05:11 PM

देान दिवस जुनी माती परीक्षणासाठी देउ शकतो का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:04:27.068764 GMT+0530

T24 2019/10/14 07:04:27.074528 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:04:26.804448 GMT+0530

T612019/10/14 07:04:26.825780 GMT+0530

T622019/10/14 07:04:26.845729 GMT+0530

T632019/10/14 07:04:26.846498 GMT+0530