অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन

जीवनक्रम

या किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष, पतंग अशा अवस्थामधून पूर्ण होतो.

अंडी: एक मादी  सुमारे ५० अंडी जमिनीत ५-१० से.मी. खोलीवर घालते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाला सुरु होताच म्हणजे जूनच्या सुमारास सुरु होतो. १०-१५ दिवसात आली बाहेर पडते.

अळी: अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पांढरी असते. पूर्ण वाढ झालेली आली पांढरट पिवळी इंग्रजी सी आकाराची असून ती जमिनीत अर्ध गोलाकार आकारात राहते. पुढे ही अळी तीन अवस्थांमधून जाते. यापैकी प्रथमोवस्था 25-30 दिवसांत जून - जुलैमध्ये आढळते. या दरम्यान अळी 45 दिवस व तिसरी अवस्था 140 - 145 दिवस असते. दुसऱ्या अवस्थेतील अळ्या जुलै - ऑगस्ट महिन्यात आढळतात. तिसऱ्या अवस्थेतील अळ्या अतिशय खादाड असतात. पुढील तीन - चार महिन्यांपर्यंत या पूर्णावस्थेतील अळ्या नुकसान करतात, त्यामुळे खरिपातील ऑगस्ट - सप्टेंबर व रब्बीतील नुकत्याच पेरणीनंतर ऑक्‍टोबरमध्ये जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. नंतर स्वतःभोवती मातीचे घर बनवते. कोषावस्था हि जमिनीत खोलवर केली जाते व हि जागा निवडताना ओलावा आहे याच काळजी आली घेते.

कोष: कोषावस्था २-४ आठवडे चालते. कोषावस्था प्रामुख्याने ऑगस्ट ते मार्च पर्यंत आढळते.

पतंग (भुंगेरा): पावसाळा सुरू होताच म्हणजे साधारणतः जून महिन्यातील पहिल्या - दुसऱ्या आठवड्यात भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन, थव्यांच्या रूपाने सूर्यास्तादरम्यान कडुनिंब, बाभूळ या झाडांवर गोळा होऊन त्यांच्या पानांवर उपजीविका करतात. हे भुंगेरे रात्री या वनस्पतीवर उपजीविका करतात व दिवसा जमिनीत राहतात. हे भुंगेरे 90 - 110 दिवस जगतात. प्रौढ भुंगेरे बाहेर आल्यानंतर लगेच मिलनास सुरुवात होते. अश तर्हेने या किडीची वर्षभरात एक पिढी पूर्ण होते.

 

हुमणीच्या नुकसानीचा प्रकार


हुमणीच्या प्रथमावस्थेतील अळ्या पहिले काही दिवस कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करतात. त्यानंतर तृणधान्य पिके, कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला अगदी गवताच्या मुळ्यांवरसुद्धा उपजीविका करतात.

 

 

अळीचे व्यवस्थापन:

 

१ पिक काढणी नंतर लगेच १५-२० से.मी. खोल नांगरत करून घ्यावी.

२ शेतातील ढेकळे फोडून घ्यावीत, जेणेकरून ढेकळांमध्ये असलेल्या हुमणीच्या विविध अळ्यांचा नाश होतो. यासाठी रोटाव्हेटर किंवा तव्याचा कुळवदेखील वापरता येईल.

३ पावसाच्या पहिल्या सरीबरोबरच भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरवात होते. संध्याकाळी साडेसात ते नऊ या वेळेत हे भुंगेरे झाडांवर दिसून येतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. या काळातच कडुनिंबाची झाडे हलविल्यास झाडाच्या पानांवरील भुंगे जमिनीवर पडतात. हे पडलेले भुंगे गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकल्याने अर्ध्या तासात ते मरतात. भुंगे मेल्याने एक पिढी नष्ट होते, त्यामुळे त्यांचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील नुकसान टळते.

४ अति प्रादुर्भावग्रस्त शेतात हुम्णीस कमी बळी पडणारे पिक घेऊन पिकांची फेरपालट करावी.

५ मुख्य पिकांमध्ये ज्वारी, मका इ. सापळा पिकांचा वापर करावा, त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त सापळा पीक काढून टाकणे शक्‍य होईल, तसेच मुख्य पिकांचे नुकसान होणार नाही.

 

जैविक उपाय:

 

१ अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे.

२ कोळे, कुत्रे, बेडूक, उंदीर हे प्राणी अळ्याबरोबर भुंगेरेही खातात.

३ दोन किलो परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली या 20 किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून पीक लागवडीअगोदर एक हेक्‍टर जमिनीत मिसळावी म्हणजे प्रथमावस्थेतील अळ्यांचा बुरशीमुळे नाश होईल.

 

रासायनिक उपाय:

 

१ जमीन तयार करताना अथवा शेणखतामधून फोरेट (10 टक्के दाणेदार) 25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेतात टाकावे.

२ उभ्या पिकामध्ये क्लोरोपायरीफॉस २०% किवा क्विनोलफोस २५% प्रवाही प्रती हेक्टर४ लिटर पाण्यात मिसळून तयार झालेले द्रावण पहिल्या पावसानंतर ३ आठवड्यानी पाण्य्च्या पालीबरोबरच द्यावे.

माहितीदाता: पृथ्वीराज गायकवाड

स्त्रोत: बळीराजा

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate