Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/18 22:35:9.005052 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / असे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन
शेअर करा

T3 2019/06/18 22:35:9.010582 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/18 22:35:9.039313 GMT+0530

असे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन

गोठ्याचे व्यवस्थापन ठेवण्याच्या पद्धती विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

1) गोठ्याची स्वच्छता ः


गोठा स्वच्छ असला पाहिजे. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी. दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. गोठा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुवावा, त्यामुळे धूळ उडणार नाही. जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत चुना लावावा, त्यामुळे गोठा जंतूविरहित राहतो; तसेच गोमूत्र व पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना असावी. गोठ्याबरोबर शोषखड्डा करून त्यात मलमूत्र साठवावे, त्यामुळे डास होणार नाहीत

 

2) जनावरांची स्वच्छता ः


दुधाची धार काढण्यापूर्वी जनावरांस पाण्याने स्वच्छ धुवावे. त्यानंतर शिफारशीत जंतुनाशकाच्या द्रावणाने कास व कासेजवळील भाग, सड स्वच्छ धुवावेत. कोरड्या फडक्‍याने कास पुसून घ्यावी. जेणेकरून कास व कासेच्या भागातील बारीक केस, धूळ दुधात पडणार नाही.

3) दोहन करणाऱ्या व्यक्तीची स्वच्छता ः


दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ व निरोगी असणे आवश्‍यक आहे. त्याची नखे वाढलेली नसावीत, त्याचे कपडे स्वच्छ असावेत. दूध काढण्यापूर्वी त्या व्यक्तीने साबण किंवा सोड्याने हात स्वच्छ धुवावेत. धार काढताना शिंकणे, थुंकणे, खोकणे, तंबाखू खाणे इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात. आजारी किंवा जखमा असलेल्या जनावरांचे दूध वेगळ्या भांड्यात अगर शेवटी काढावे.

4) दुधाच्या भांड्याची स्वच्छता ः


दूध खराब होण्याचे किंवा प्रत खालावण्याचे प्रमुख कारण म्हणजे भांड्यांमुळे रोगजंतूंची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. हे टाळण्यासाठी भांडी प्रथम थंड पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर गरम पाण्यात सोडा टाकून धुवावीत. धार काढण्याच्या बादल्या, किटल्या, चरव्या, कॅन यांना कमीत कमी कोपरे असावेत.

5) दूध काढण्याची पद्धती ः

सर्वसाधारणपणे सडाच्या भोवती चार बोटे लावून अंगठा दुमडून दूध काढतात, त्यामुळे सडांना इजा होण्याची, कासदाह होण्याची शक्‍यता अधिक असते. याउलट पूर्ण हाताचा वापर ही सर्वांत योग्य व चांगली पद्धत आहे. यामध्ये अंगठा न दुमडता पाचही बोटांत (मुठीत) सड पकडून धारा काढल्या जातात.

6) दूध काढल्यानंतर घ्यावयाची काळजी ः


दूध काढल्यानंतर स्वच्छ गाळणीने गाळून घ्यावे, यामुळे दुधातील घाण, कचरा वेगळा होतो व प्रत राखण्यास मदत होते. दूध उन्हाळ्यात बर्फात व हिवाळ्यात थंड पाण्यात साठवून लवकरात लवकर संकलन व शीतकेंद्रात पाठवावे, तसेच दुधाची वाहतूक करणारे टॅंकर निर्जंतुकीकरण मिश्रणाने स्वच्छ करावेत व ते वातानुकूलित असावेत.

---------------------------------------------------------------------------------------------------

 

स्त्रोत: अग्रोवन

2.93333333333
संजय मांगले Mar 25, 2018 06:00 PM

मला नवीन पशुपालन व्यवसाय करायचा आहे
माहिती सांगा

पवार आत्माराम uttam Jun 30, 2017 10:06 AM

चांगली माहिती आहे .

पवार आत्माराम uttam Jun 30, 2017 10:01 AM

चांगली माहिती आहे .

लोकेश पासलकर Nov 12, 2014 01:39 PM

उत्तम माहिती

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/18 22:35:9.300688 GMT+0530

T24 2019/06/18 22:35:9.306503 GMT+0530
Back to top

T12019/06/18 22:35:8.935126 GMT+0530

T612019/06/18 22:35:8.952212 GMT+0530

T622019/06/18 22:35:8.994606 GMT+0530

T632019/06/18 22:35:8.995416 GMT+0530