Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/19 08:43:1.994679 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / गाईमधील कासदाहावर उपचार
शेअर करा

T3 2019/06/19 08:43:2.000159 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/19 08:43:2.029072 GMT+0530

गाईमधील कासदाहावर उपचार

कासदाह हा आजार प्रामुख्याने तीन किंवा त्यापुढील वितातील अधिक दूध देणाऱ्या गाई - म्हशींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

कासदाह हा आजार प्रामुख्याने तीन किंवा त्यापुढील वितातील अधिक दूध देणाऱ्या गाई - म्हशींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. व्यायल्यानंतरचे पहिले दोन - तीन महिने आणि जनावर आटण्याच्या काळात हा आजार आढळून येतो. मोठी कास आणि लांब सड असलेल्या जनावरांत कासदाहाचे प्रमाण अधिक असते.

जिवाणूंच्या संसर्गामुळे कासदाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. कास किंवा सडास इजा पोचणे किंवा जखम होणे हे या आजाराचे महत्त्वाचे कारण आहे. कासेवरील जखमेमुळे जिवाणू सडात प्रवेश करतात, तसेच अस्वच्छ गोठा, दूध काढणाऱ्या व्यक्तीचे हात, कास धुण्यासाठी वापरलेले पाणी, दूध काढण्यासाठी वापरलेली भांडी निर्जंतुक नसल्यास संसर्ग होतो. जनावराच्या आजूबाजूच्या अस्वच्छ वातावरणामुळे जंतूंचा प्रादुर्भाव जास्त होतो.

उपचार


1) कासदाहाचे निदान लक्षणांवरून करता येते. सुप्त कासदाहाच्या निदानासाठी सीएमटी (कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट) या चाचणीची मदत घेता येते. ही चाचणी पशुपालक स्वतः करू शकतात. ही चाचणी अत्यंत सोपी असून, कमी वेळेत आणि कमी खर्चात रोगाचे निदान करते.

2) कासदाह हा रोग प्राथमिक अवस्थेत ओळखल्यास कमी खर्चात औषधोपचार होतो आणि जनावर बरे होते; पण वरचेवर जंतूंची संख्या वाढत गेल्यास महागडी प्रतिजैविकेही प्रभावी ठरत नाहीत. तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शक्‍य तितक्‍या लवकर उपचार करावेत.

संपर्क - डॉ. मीरा साखरे - 9423759490

स्त्रोत: अग्रोवन

2.98181818182
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/19 08:43:2.265660 GMT+0530

T24 2019/06/19 08:43:2.272128 GMT+0530
Back to top

T12019/06/19 08:43:1.922270 GMT+0530

T612019/06/19 08:43:1.941146 GMT+0530

T622019/06/19 08:43:1.983867 GMT+0530

T632019/06/19 08:43:1.984703 GMT+0530