Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:30:20.839805 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांचा तोंड व पायाचा रोग
शेअर करा

T3 2019/10/18 14:30:20.845288 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:30:20.873483 GMT+0530

जनावरांचा तोंड व पायाचा रोग

तोंड व पायाचा रोग हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग आहे.

तोंड पायाचा रोग

तोंड व पायाचा रोग (एफएमडी) हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये (दुभागलेला पाय) सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग आहे. हा रोग भारतामध्‍ये स्‍थानिक विशेष आहे आणि रोगट जनावरांचे उत्‍पाद दुस-या देशांमध्‍ये निर्यात करण्‍यावर प्रतिबंध असल्‍यामुळे त्यामूळे उत्‍पादकतेमध्‍ये कमतरता आल्‍याने देशाला गंभीर आर्थिक हानि होते.

लक्षणे काय असतात ?

 • खूप ताप येणे
 • दुग्‍ध-उत्‍पादनात कमतरता येणे
 • पाय, तोंड आणि कांस यांवर फोड येणे
 • पायांमध्‍ये फोड आल्‍याने लंगडणे
 • तोंडात फोड आल्‍याने तोंडावाटे फेसाळलेली लाळ गळणे

तोंडामध्ये रोगाची लक्षणे

gure rog 1.jpg

gure rog 3.jpg

 

 

पायांत रोगाची लक्षणे

gure rog 4.jpg

gure rog 5.jpg

 

हा रोग कसा पसरतो ?

१. प्रभावित जनावरांच्‍या लाळेतून व मल-मूत्रांतून, दुधातून तसेच फोडांमधील द्रवपदार्थाच्‍या वाहण्‍यातून विषाणू बाहेर टाकला जातो.
२. विषाणू एकीकडून दुसरीकडे हवेच्‍या माध्‍यमाने पसरतो आणि विशेषत: जेव्‍हां हवेत आर्द्रता जास्‍त असते तेव्‍हां विषाणू एका जागेतून दुसरीकडे सहज पसरतो.
3.  रोग-प्रभावित जनावरांपासून निरोगी जनावरांना खाद्य, पाणी आणि कुत्रे, पक्षी यां सारख्‍या प्राण्‍यापासून तसेच शेतावरील कामगारांच्‍या इकडे-तिकडे येण्‍या-जाण्‍यामुळे देखील हा रोग पसरतो.
४.  संसर्ग झालेल्‍या शेळ्या व डुकरे मल-मूत्रामार्गे व्‍हायरस बाहेर टाकतात आणि हा रोग तीव्रतेने पसरविण्‍यात महत्‍वाची भूमिका पार पाडतात.
५. देशी/स्‍थानिक जनावरांपेक्षा गुरा-ढोरांच्‍या संकरित प्रजाती संसर्ग होण्‍यासाठी जास्त संवेदनशील/ सुग्राह्य असतात.
६. संसर्ग झालेल्‍या जनावरांच्‍या एका जागेतून दुसरीकडे वाहतूक केल्‍याने देखील हा रोग पसरतो.

उत्तर-परिणाम काय आहेत?

रोगग्रस्‍त जनावरे चर्वण करणे, गर्भधारण करणे, उष्‍णता सहन करणे यांसाठी संवेदनक्षम होतात आणि दुग्‍ध उत्‍पादनात कमतरता येते.

प्रसरण कसे नियंत्रित करावे?

 • स्‍थानिक-विशेष क्षेत्रांमध्‍ये निरोगी जनावरांना पाठविले जाऊ नये.
 • प्रभावित क्षेत्रांमधून जनावरांची खरेदी करण्‍यात येऊ नये.
 • नव्‍याने विकत घेतलेल्‍या जनावरांस वैद्यकीय परीक्षण पूर्ण होईपर्यंत फार्ममध्‍ये/शेतात इतर जनावरांपासून २१ दिवस वेगळे ठेवण्‍यात यावे.

उपचार

 • तोंड व पायांचा रोग असलेल्‍या जनावरांना १% पोटॅशियम परमँगनेट असलेल्या पाण्‍याने धुवावे. पायांच्‍या फोडांना ऍन्टिसेप्टिक लोशन लावावे. बोरिक ऍसिड व ग्लिसरिनचा लेप तोंडातील फोडांवर लावावा.
 • रोगग्रस्त जनावरांना उपशामक आहार द्यावा आणि त्‍यांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवण्‍यात यावे.

लसीकरणाचा वेळापत्रक-तक्ता

 • ६ महिन्‍यांतून एकदा एफएमडी संवेदनक्षम जनावरांचे लसीकरण करावे. लसीकरणा कार्यक्रमात गुरु-ढोरे, शेळ्या, मेंढ्या आणि डुकरे यांचा ही समावेश असावा.
 • वासरांना प्रथम लसीकरण ४ महिने वयाची झाल्‍यावर आणि दुसरे लसीकरण ५व्‍या महिन्‍यांत द्यावे. त्‍या नंतर बूस्‍टर डोज् ४-६ महिन्‍यांनी एकदा द्यावा.

 

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

3.02380952381
माधव jadhav Sep 16, 2017 08:45 AM

gayeecha पाय फाटला upchar

बापूसाहेब लेंडे Jul 03, 2017 05:19 AM

गायीच्या सडांना फोड आलेत त्यावर उपाय काय आहे

विजय ढेगे Feb 07, 2017 12:39 PM

माझा म्हैसी ला पाय खुरी आणि तोड खुरी आला कोणती लस दावी

amit asaramji pathekar Aug 13, 2016 12:38 PM

मला गोठा बांधकाम आणि गाई ची सम्पूर्ण माहिती असलेली पुस्तक हवं aahe

विलास राउत Mar 22, 2016 06:57 PM

जनावराचया नाकातुन रक्त एने

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:30:21.179531 GMT+0530

T24 2019/10/18 14:30:21.186345 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:30:20.770129 GMT+0530

T612019/10/18 14:30:20.787364 GMT+0530

T622019/10/18 14:30:20.829664 GMT+0530

T632019/10/18 14:30:20.830460 GMT+0530