Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/18 10:21:35.033711 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / जनावरांतील विषबाधा
शेअर करा

T3 2019/06/18 10:21:35.039483 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/18 10:21:35.070507 GMT+0530

जनावरांतील विषबाधा

गवतावर तणनाशक फवारल्यानंतर शेताच्या बांधावर आपले जनावर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी

विषबाधेची लक्षणे

लाळ गाळते, जनावरे थरथर कापतात, शरीर हेलपाटते, अस्वस्थता, झटके देणे, पोट फुगणे, पाय लुळे पडणे, जलद श्‍वासोच्छ्वास, अशक्तपणा येणे, जुलाब होणे, पोटात वेदना होणे, दात खाणे अशी जनावरातील वीषबाधेची लक्षणे दिसतात.

विषबाधा होऊ नये यासाठी उपाययोजना

 • तणनाशक व कीटकनाशक औषधांच्या रिकाम्या बाटल्या, कॅन उघड्यावर फेकल्यास जनावरे ते चाटतात. त्यामुळे त्या कॅन किंवा बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावावी. त्या पाण्याच्या स्रोतामध्ये उदा. नाला, तळी, उपळ्याच्या जागा इ. ठिकाणी फेकू नयेत.
 • जनावरातील गोचीड निर्मूलनाची औषधे आणि पिकांवर फवारायची कीडनाशके वेगवेगळी ठेवावीत. गोचीड निर्मूलनाकरिता औषध वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल वाचून खात्री करूनच वापरावे.
 • गवतावर तणनाशक फवारल्यानंतर शेताच्या बांधावर आपले जनावर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी किंवा तसे गवत व फळभाज्यांचे अवशेष जनावरास खाऊ घालणे टाळावे.
 • उपचार :विषबाधेची लक्षणे निदर्शनास येताच ताबडतोब नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. रसायनाच्या पाकिटावर किंवा डब्यावर विषनाशकाचे नाव दिले आहे का ते पाहावे. हे नाव पशुतज्ज्ञाला सांगावे. त्यामुळे योग्य उपचार करण्यास मदत मिळते. जनावराला शांतता व आराम मिळेल असे वातावरण ठेवावे.जनावराला स्वच्छ चारा व भरपूर पाणी द्यावे.विषबाधा त्वचेमार्फत झाल्यास जनावरास भरपूर पाण्याने अंघोळ घालावी. जनावरांचे शरीर घासू नये.

 • - डॉ. हगवणे, ९८८१४४१६५८

  माहिती संदर्भ :अॅग्रोवन

  3.0
  सुदर्शन बोराडे Aug 12, 2017 03:07 PM

  मला म्हैस पालन करून दूध व्यवसाय करायचा आहे.
  मार्गदर्शन पाहिजे.

  संतोष जाधव Mar 20, 2017 08:02 AM

  गाय फुगली आहे उपाय सांगा

  संतोष जाधव Mar 20, 2017 07:59 AM

  गाय फुगली आहे उपाय सांगा

  आपल्या सूचना पोस्ट करा

  (वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

  Enter the word
  नेवीगेशन

  T5 2019/06/18 10:21:35.345348 GMT+0530

  T24 2019/06/18 10:21:35.351453 GMT+0530
  Back to top

  T12019/06/18 10:21:34.960073 GMT+0530

  T612019/06/18 10:21:34.979975 GMT+0530

  T622019/06/18 10:21:35.022702 GMT+0530

  T632019/06/18 10:21:35.023651 GMT+0530