Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 19:30:24.879451 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / पशुप्रजननासाठी खनिजद्रव्ये
शेअर करा

T3 2019/10/17 19:30:24.885780 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 19:30:24.921799 GMT+0530

पशुप्रजननासाठी खनिजद्रव्ये

दुधाळ गाई आणि म्हशींना दुग्धोत्पादन आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी बरीच खनिजद्रव्ये आवश्‍यक असतात. जनावरांच्या शरीरात खनिज तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्‍यक असते.

दुधाळ गाई आणि म्हशींना दुग्धोत्पादन आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी बरीच खनिजद्रव्ये आवश्‍यक असतात. जनावरांच्या शरीरात खनिज तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्‍यक असते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते.

दुभत्या जनावरावर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च त्यांच्या खाद्यावर होतो. जनावरांना पाणी, तेलयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, क्षार आणि जीवनसत्त्वे या पोषण मूल्यांची आवश्‍यकता असते. त्यापैकी क्षार हा घटक जनावरांना अल्प प्रमाणात लागतो. परंतु जनावरांच्या दुग्धोत्पादनासाठी आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. शेतकरी जनावरांच्या आहारात धान्य, पेंढी, हिरवा आणि सुका चारा याचा अवलंब करतात, ज्यातून जनावरांना प्रथिने, कर्बोदके, तेलयुक्त पदार्थ उपलब्ध होतात. परंतु या घटकांमधून जनावरांना योग्य प्रमाणात खनिज म्हणजेच क्षार उपलब्ध होत नाही.

क्षारांची गरज भागविण्यासाठी जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचा वापर करावा लागतो. बऱ्याच पशुपालकांना खनिज मिश्रण हा घटक माहीत नसतो, परंतु या घटकांच्या कमतरतेमुळे जनावरांची दुग्धोत्पादन आणि महत्त्वाचे म्हणजे प्रजनन क्षमता कमी होते. पशु खाद्यामध्ये खनिज कमी प्रमाणात असतील, तर जनावऱ्यांच्या चयापचयाच्या क्रिया व्यवस्थित पार पडत नाहीत. खनिज कमतरतेचा परिणाम वासराच्या वाढीवर, मोठ्या जनावरांच्या दुग्धोत्पादनावर आणि प्रजोत्पादनावर होतो. खनिज जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्‍यक असते.

दुधाळ गाई आणि म्हशींना दुग्धोत्पादन आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी बरीच खनिजद्रव्ये आवश्‍यक असतात. काही खनिजे जास्त प्रमाणात तर काही कमी प्रमाणात (सूक्ष्म खनिज) आवश्‍यक असतात. कॅल्शिअम, स्फुरद, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडियम, क्लोरीन आणि सल्फर ही खनिजे तुलनेने अधिक प्रमाणात़ तर लोह, झिंक, मँगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट, सेलिनिअम इत्यादी खनिजे कमी प्रामाणात लागतात.

शरीरातून स्रावाद्वारे बाहेर पडणाऱ्या क्षारांची उणीव भरून काढण्यासाठी, रक्तातील हिमोग्लोबिन, हाडातील कॅल्शिअम, स्फुरद व इतर क्षारांची झीज, स्नायूंची निरोगी अवस्था, पाचक रसाचे उत्पादन व सर्व शारीरिक क्रियांचे सुनियोिजत नियंत्रण करण्यासाठी जनावरांना क्षारांची गरज असते. जनावराच्या शरीरक्रिया संप्रेरक, पाचक रस व विकरांच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. त्यांना कार्यक्षम ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी खनिज क्षारांची गरज असते. त्यामुळे शरीरातील कोणतीही क्रिया क्षारांच्या अभावी होऊ शकत नाही.

प्रजननसाठी महत्त्वाची खनिजे आणि त्यांचे कार्य

कॅल्शिअम


दुग्धोत्पादन, हाडे व दातांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या आकुंचन प्रसरणासाठी कॅल्शिअम आवश्‍यक असते, याच्या कमतरतेमुळे प्रसूती सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो; कारण गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन प्रसरण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

स्फुरद


दुग्धोत्पादन, चयापचय आणि दातांच्या मजबुतीसाठी स्फुरद आवश्‍यक असते, याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक्र अनियमित होते. गाभण जनावरामध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.

मॅग्नेशिअम


हाडे व दातांची मजबुती आणि प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकांवरील क्रियेसाठी मॅग्नेशिअम आवश्‍यक असते.

सल्फर


सल्फर प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकावरील क्रियेसाठी उपयोगी आणि ‘ब’ गटातील जीवनसत्त्व, थायमीन आणि बायोटीन यांचा घटक, तसेच मिथिओनिन आणि सिस्टीन या अमिनो आम्लांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असते.

सोडिअम व पोटॅशिअम


शरीरातील अभिसरणाचा तोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकवून ठेवण्यासाठी सोडिअम व पोटॅशिअम आवश्‍यक असते.

तांबे/ कोबाल्ट


तांबे/ कोबाल्ट रक्तातील हिमोग्लोबीन उत्पादन, पेशी समूहांच्या रक्तछटांसाठी आवश्‍यक, बऱ्याचशा धातुजन्य अंतस्रवांचे घटक आणि प्रजोत्पादन क्रियेसाठी महत्त्वाचे असते, याच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये वांझपणा दिसून येतो.

झिंक


नरांमध्ये शुक्रजंतूंच्या निर्मितीसाठी आणि लैंगिक अवयवाच्या प्राथमिक आणि त्यापुढील वाढीसाठी झिंक महत्त्वाचे असते, तसेच ‘अ’ जीवमनसत्त्व कार्यान्वित करते. वळूंची प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि वळूंकडून चांगल्या वीर्याची निर्मिती होण्यासाठी झिंक आवश्‍यक ठरते.

आयोडीन


आयोडीन कार्बोदकाच्या उत्पादनासाठी कार्य करणाऱ्या शरीरातील अनेक अंतस्रावांच्या (टी-३, टी-४) निर्मितीसाठी, त्याचबरोबर शारीरिक वाढीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी आवश्‍यक असते, याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक्र अनियमित होते. गर्भपात होऊन, मृत आणि दुबळे आणि केसविरहित, गालगुंड असलेले वासरू जन्माला येते. जनावर मुका माज दाखविते.

खनिज कमतरतेमुळे होणारे परिणाम

  • खनिजांच्या अभावामुळे जनावरांमध्ये अनियमित ऋतुचक्र व अकार्यक्षम पुनरुत्पादन दिसून येते. क्षारांच्या कमतरतेमुळे गाई माजावर येत नाहीत. माज सुप्त स्वरूपात राहतो. हंगामी वांझपणा येतो, गर्भपात व गर्भामध्ये उपजत दोष उत्पन्न होतात.
  • खनिजांच्या कमतरतेमुळे कालवडी माजावर येत नाहीत. माज सुप्त अनियमित राहतो. वाया जातो, गर्भधारणा होत नाही. कालवडीच्या पहिल्या विताचे वय वाढते. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो किंवा अशक्त वासरू जन्माला येते. प्रसूती सुलभ होत नाही.
  • गाईंचा भाकड काळ वाढतो. दोन सलग वितांतील अंतर वाढते व उत्पादन उपयुक्त आयुष्य कमी होते.
  • खनिज अभावामुळे नर वासराच्या पुनरुत्पादन संस्थेतील अवयवांची वाढ समाधानकारक होत नाही. वयात येण्यास उशीर लागतो. चांगल्या प्रकारचे वीर्य उत्पादन मिळत नाही.

खनिज मिश्रणाची आवश्‍यकता

जनावरांनी खाल्लेल्या खाद्यातून आणि वैरणीतून पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झालेली खनिजे जनावरांना खनिज मिश्रणातून पुरविणे गरजेचे असते. जी खनिजे खाद्य घटकात कमी प्रमाणात असल्याचे आढळून येते, त्यांचा पुरवठा खनिज मिश्रणातून केला जातो.

खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण

१) सर्वसाधारणपणे खुराकामध्ये एक टक्का मीठ, दोन टक्के क्षार मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्षारांची गरज पूर्ण होते किंवा प्रति किलो वजनाच्या प्रमाणात ४० मिलिग्राम क्षार मिश्रणाचे प्रमाण जनावरांसाठी पुरेसे असते.
२) दुभत्या गाई आणि म्हशी - ६० ते ७० ग्रॅम/ जनावर / दिवस (दुग्धोत्पादनानुसार)
३) मोठी वासरे, कालवडी आणि भाकड जनावरे- ४० ते ५० ग्रॅम/ जनावर / दिवस.
४) लहान वासरे- २० ते २५ ग्रॅम / वासरू /दिवस (योग्य वजन वाढीसाठी).

खनिज मिश्रण देण्याच्या पद्धती

  • खनिज मिश्रण अाबोणातून जनावरांना खाऊ दिले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या खुराकात निरनिराळ्या प्रमाणात खनिज मिश्रण मिसळलेले असते, परंतु खनिजांचा योग्य पुरवठा होण्यासाठी खनिज मिश्रण देणे योग्य ठरते.
  • क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण ठराविक भागातील जमिनीमधील आणि पिकांमधील खनिजांच्या प्रमाणाचा अभ्यास करून बनविली जातात. जी खनिजे जमिनी आणि पिकांमध्ये कमी असतील, अशा खनिजांचाच क्षेत्रनिहाय खनिज मिश्रणात अवलंब केला जातो.

खनिज मिश्रणाचे फायदे

१) वासरांची आणि कालवडींची योग्य प्रमाणात वाढ झाल्याने पैदासक्षम वयात त्या लवकर येतात.
२) वळू आणि गाईंची प्रजोत्पदानाची कार्यक्षमता वाढते. वेताचा काळ वाढून (दूध उत्पादनाचा काळ) दोन वेतांतील अंतर कमी होते.
३) खाद्याची उपयुक्तचा वाढते.
४) दुग्धोत्पादनात वृद्धी होते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

संपर्क - डॉ. गणेश महादेव गादेगावकर, ९८६९१५८७६०
(लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे कार्यरत आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

3.02816901408
दिन कर कोल्हे Sep 17, 2016 08:24 PM

गिर गाय खाद्य विषई माहिती हवी

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 19:30:25.448922 GMT+0530

T24 2019/10/17 19:30:25.455930 GMT+0530
Back to top

T12019/10/17 19:30:24.798346 GMT+0530

T612019/10/17 19:30:24.820684 GMT+0530

T622019/10/17 19:30:24.867185 GMT+0530

T632019/10/17 19:30:24.868211 GMT+0530