Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 13:41:10.944151 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / वासरांचे संगोपन/व्यवस्थापन
शेअर करा

T3 2019/10/18 13:41:10.949495 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 13:41:10.979293 GMT+0530

वासरांचे संगोपन/व्यवस्थापन

वासरू जन्माला आल्यापासून त्याचे संगोपन कसे करावे काय खाऊ घालावे याची माहिती यामध्ये दिली आहे.

सुरुवातीचे संगोपन

 • वासरू जन्माला आल्याबरोबर लगेचच त्याच्या नाकातोंडामधील चिकट पदार्थ दूर करावा.
 • साधारणपणे गाय आपल्या नव्याने जन्मलेल्या वासराला चाटून साफ करतेच. त्यामुळे वासराची कातडी कोरडी आणि साफ होतेच शिवाय त्याचा श्वास आणि रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. हवा थंड असताना किंवा गाईने वासराला न चाटल्यास कोरड्या कापडाने वासराचे अंग पुसा तसेच त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्या. त्याच्या शरीरापासून साधारण २ ते ५ सेंमी अंतरावर नाळ बांधा आणि लिगॅचरच्या खाली १ सेंमीवर तोडा. तेथे टिंक्चर आयोडिन किंवा बोरिक ऍसिड किंवा इतर कोणतेही प्रतिजैवक औषध (ऍँटिबायोटिक) लावा. गोठ्यातली सर्व ओली कापडे इ. काढून टाकून तो अतिशय स्वच्छ आणि कोरडा करा. वासराचे वजन नोंदून ठेवा.
 • गाईची आचळे शक्यतो क्लोरिनच्या द्रावणाने धुवून कोरडी करा.
 • गाईला येणारे पहिले (चिकाचे) दूध (कोलोस्ट्रम) वासराला पिऊ द्या.
 • जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या तासात वासरू स्वतःच्या पायांवर उभे राहून पिण्याचा प्रयत्न करू शकते. परंतु एखादे वासरू कमजोर असल्यास त्याला उभे राहण्यासाठी मदत करा.

वासरांना खायला घालणे

वासराचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे अन्न म्हणजे आईचे पहिले उर्फ चिकाचे दूध. जन्मानंतरचे पहिले ३ ते ७ दिवस त्यास आईकडून हे पोषणयुक्त चिकाचे दूध मिळते. त्यामध्ये जंतुसंसर्गाशी सामना करणारी रोगप्रतिकारक द्रव्ये (ऍँटिबॉडीज) तसेच पोषण कमी पडल्यास ते भरून काढणारे पदार्थदेखील असतात. वासराला चिकाचे दूध अवश्य पिऊ द्या.

या दूधाशिवाय पहिले ३ ते ४ आठवडे वासराला दूधदेखील मिळाले पाहिजे. त्यानंतर मात्र ते झाडपाल्यामधील स्टार्च आणि साखर पचवू शकते. ह्या दिवसांत दूध दिल्याने त्यास पोषक द्रव्ये मिळत राहतात हे खरे परंतु असे करणे महाग पडत असल्यास धान्य देऊ शकता. सर्व पातळ पदार्थांचे तापमान वातावरणीय किंवा शारीरिक तापमानाएवढे असू द्या.

वासरांना खाणे देण्यासाठी भांडी वापरली असल्यास ती स्वच्छ करा. सर्व साहित्य कोरड्या व स्वच्छ ठिकाणी ठेवा.

आपण वासराला खायला काय देता ह्यानुसार खायला घालण्याची पद्धत बदलेल. साधारणपणे खालील पद्धती वापरल्या जातात

 • पूर्ण दूध देणे
 • स्निग्धांश काढलेले (स्किम्ड) दूध देणे
 • दुधाशिवाय इतर पातळ पदार्थ देणे – उदा. ताजे ताक, गोड दह्याचे पाणी, पेज इ.
 • दुधाच्या पर्यायी पदार्थावर वाढवणे
 • वासरांसाठीच्या खास मिश्रणावर (काफ स्टार्टर्स) वाढवणे
 • आईशिवाय दुसऱ्या गाईचे (नर्स काऊ) दूध देणे
 • साधारण ५० किलो वजनाच्या वासराला पहिल्या तीन महिन्यांमध्ये लागणाऱ्या पोषणमूल्यांची गरज याप्रमाणे असते
-

कोरडे पदार्थ (ड्राय मॅटर डीएम)

1.43kg

- पचण्याजोगी एकूण पोषकद्रव्ये (टीडीएन)

1.60kg

- कच्ची प्रथिने

315g

 • हे लक्षात ठेवा की टीडीएन ची गरज डीएम पेक्षा जास्त असते कारण त्याच्या आहारात फॅट्सचे प्रमाण जास्त असते. १५ दिवसांचे वासरू गवत खाण्याचा प्रयत्न करते. ते दरदिवशी सुमारे अर्धा किलोग्राम गवत खाते. तिसर्यात महिन्यात हेच प्रमाण ५.० किलोग्रामपर्यंत जाते.
 • ह्या दिवसांत, हिरव्या चारयाऐवजी, चांगल्या प्रतीचे १-२ किलोग्राम वाळवलेले गवत देता येईल. वय १५ दिवस असताना ०.५ किलोग्राम तर ३ महिन्याच्या वासराला १.५ किलोग्राम द्यावे.
 • तिसर्याव आठवड्यानंतर, पूर्ण दुधाचे प्रमाण कमी पडत असल्यास, त्याजागी स्किम्ड दूध, ताक अथवा दुधाऐवजी इतर काही पातळ पदार्थ द्यावा.

वासरांचे विशेष खाणे उर्फ काफ मिक्स्चर

 • काफ मिक्स्चरमध्ये दूध किंवा इतर पातळ पदार्थांवर वाढणार्या् वासरासाठी पूरक पोषकद्रव्ये असतात. ह्यात मुख्यतः मका किंवा ओट्ससारखी धान्ये असतात.
 • ह्या मिश्रणात बार्ली, गहू किंवा ज्वारीसारखी धान्येही वापरता येतात उसापासून मिळणार्याम मोलासेसचेही प्रमाण ह्यामध्ये १०% पर्यंत ठेवता येते.
 • दर्जेदार मिश्रखाद्यात ८०% टीडीएन आणि २२% सीपी असते.

 

वासरासाठी रफेज म्हणजे कोंज्यासारखे पाचक अन्न

 • वासराचा कोठा साफ ठेवण्यासाठी पानांपासून किंवा शेंगा देणार्याी वनस्पतीपासून बनवलेले व बारीक केलेले वाळवलेले गवत उत्तम. दोन आठवड्यांनेतर हे दिलेले चालते. थोडे गवत मिळलेला कडबादेखील अतिशय उपयोगी असतो.
 • सूर्यप्रकाशात वाळवलेल्या छान हिरव्या रंगाच्या गवतापासून अ तसेच ड आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्वे मिळतात.
 • ६ महिन्यांचे वासरू सुमारे १.५ to २.२५ किलोग्राम कडबा खाते. वयानुसार अर्थातच खाण्याचे प्रमाण वाढते.
 • ह्याशिवाय, ६ ते ८ आठवडे वयानंतर, चांगल्या रीतीने साठवलेला ओला चारा (सायलेज) थोड्या प्रमाणात दिला तरी चालतो. मात्र ओला चारा लवकर सुरू केल्याने वासराच्या अंगावर खटे (स्कोअर्स) पडतात.
 • वासरू ४ ते ६ महिन्यांचे होईपर्यंत शक्यतो ओला चारा देऊ नये.
 • लक्षात ठेवा की मका तसेच ज्वारीचा ओला चारा बरेचदा दिला जात असला तरी त्यामध्ये फारशी प्रथिने नसतात आणि ड जीवनसत्वाचे प्रमाणही अगदी कमी असते.

दुस-या गाईच्या दुधावर वाढवणे

 • वासराला काही कारणाने त्याच्या आईचे दूध मिळू शकत नसल्यास कमी फॅटचे पण भरपूर दूध देणारया गाईचे दूध अशा २ ते ४ वासरांना, अगदी पहिल्या आठवड्यापासून, देता येते.
 • कोरड्या चार्या्सोबत इतरही कोरडे अन्न देता येते. अशी वासरे दुसर्या ते तिसर्याड महिन्यापासून बाहेरच्या दुधावर वाढवता येतात.

कांजी किंवा पेजेवर (ग्रुएल) वासरे वाढवणे

हा काफ-स्टार्टरचाच पातळ प्रकार आहे. मात्र हा दुधाला पर्याय नाही. चौथ्या आठवड्यापासून वासराच्या अन्नातील दुधाचे प्रमाण कमी करून पेज वाढवली जाते.

काफ स्टार्टरवर वाढवणे

ह्या पद्धतीत वासरांना प्रथम पूर्ण दुधावर वाढवतात. नंतर त्यांना कोरडे अन्नपदार्थ व चारा खाण्यास शिकवले जाते. ती ७ ते १० आठवड्यांची झाल्यावर त्यांना दुधापासून पूर्णपणे दूर ठेवले जाते.

दुधाला पर्यायी अन्नावर वासरे वाढवणे

एक लक्षात ठेवा की वासराला पोषणमूल्ये मिळण्याच्या दृष्टीने दुधाला पर्याय असू शकत नाही. मात्र दूध किंवा तशा इतर पातळ पदार्थांचा तुटवडा असल्यास पर्यायी अन्न द्यावे लागेल.

ज्या दराने आपण वासराला पूर्ण दूध द्याल त्याच दराने हे पर्यायी अन्न द्या – त्याच्या वजनाच्या १०% ह्याप्रमाणे. ह्या पर्यायी अन्नातील एकूण घन पदार्थ पातळ पदार्थाच्या १० ते १२% ठेवा.

बाहेरचे दूध देणे

 • वासरू गाईपासून सोडवणे हे कार्यक्षम दुग्धशाळा व्यवस्थापनाचे एक अविभाज्य अंग आहे. ह्यामुळे एकसमान व्यवस्थापन करता येते आणि प्रत्येक वासराला योग्य त्या प्रमाणात दूध मिळण्याची खात्री राहते. तसेच एखाद्या वासराने अति दूध पिणे किंवा दूध वाया जाणेही टाळता येते.
 • अवलंब केलेल्या व्यवस्थापनाच्या पद्धतीनुसार वासरू सोडवण्याचे काम त्याच्या जन्मापासूनच किंवा ३, ८ ते १२, अथवा २४ आठवड्यांनीदेखील करता येते. शेतावरील किंवा गोठ्यातील प्रत्यक्ष परिस्थितीनुसार ही सोडवणूक १२ व्या आठवड्यातही करता येईल. मात्र नर वासरे (बैल) आईजवळ ६ महिन्यांपर्यंत देखील ठेवली जातात.
 • मोठ्या कळपामध्ये वासराची सोडवणूक जन्मानंतर लगेचच करणे चांगले.
 • जन्मानंतर लगेचच सोडवल्याने पर्यायी अन्न आणि काफ मील्स लवकर सुरू करता येतात ज्यायोगे गाईचे दूध आपण पिण्यासाठी वापरू शकतो.

पाण्याचे महत्त्व

नेहमी ताजे व स्वच्छ पाणी मिळेल असे पहा. वासराने एका वेळी जास्त पाणी पिऊ नये ह्यासाठी पाण्याचे भांडे वेगळे तसेच दुधाच्या भांड्यापासून लांबवर ठेवा.

सोडवल्यानंतर

सोडवल्यानंतरच्या ३ महिन्यांत काफ स्टार्टरचे प्रमाण हळूहळू वाढवत न्या. चांगल्या दर्जाचा कडबा वासरांना हवा तेवढा मिळाला पाहिजे. जास्त ओलावा असलेले पदार्थ (म्हणजे हिरवे गवत किंवा उत्कृष्ट चारा) वासराला आपण त्याच्या वजनाच्या ३ टक्क्यांपर्यंत देऊ शकता. अर्थात जास्त खाणे देऊ नका कारण त्याने शरीरात एकंदर पोषणमूल्ये कमी जातात.

वासराची वाढ

वासराची वाढ आपणांस हव्या त्या वेगाने होत आहे ना हे पाहण्यासाठी त्याचे वाढते वजन तपासा.

 • वासरांना पहिल्या तीन महिन्यात दिले जाणारे अन्न फार महत्त्वाचे असते.
 • ह्या दिवसांत चुकीचे अन्नपाणी मिळाल्यास २५-३०% वासरे मरू शकतात.
 • गाभण गाईस, विण्याआधीच्या २-३ महिन्यांत दर्जेदार चारा व पोषकद्रव्ये पुरवा
 • जन्माचे वेळी वासराचे वजन साधारणपणे २०-२५ किलोग्राम असते.
 • वासराला चांगले खायला घाला, त्याला जंत होत नाहीत हे पहा. ह्याने त्याचे वजन दरमहा १०-१५ किलोग्राम वाढेल.

गोठ्यात पुरेशी जागा करा

सोडणणुकीचे दिवस येईपर्यंत प्रत्येक वासरू स्वतंत्र खणात ठेवा. म्हणजे दूध पिताना ती एकमेकांना त्रास देणार नाहीत तसेच सांसर्गिक रोग पसरणार नाहीत. प्रत्येक खण स्वच्छ, कोरडा ठेवा आणि त्यामध्ये हवा खेळू द्या. मात्र वासरांच्या अंगावर थेट गार हवा येऊ देऊ नका.

वासरांना झोपण्यासाठी गवताची किंवा भुश्याची गादी पुरवा. गोठा बाहेर मोकळ्यावर असल्यास त्यावर छप्पर द्या तसेच कडक उन्हामुळे आतील हवा तापणार नाही हे पहा. पाऊस आणि गार वारा अडवण्याची व्यवस्था करा. गोठ्याची पूर्वेकडची बाजू मोकळी असल्यास सकाळचे ऊन आत येते शिवाय नंतरच्या कडक उन्हापासून संरक्षण मिळते. तसेच आपल्याकडे पाऊसदेखील फारच क्वचित पूर्वेकडून पडत असल्याने तोही प्रश्न आपोआप सुटतो.

वासरे निरोगी ठेवा

सुरूवातीपासूनच वसरांची तब्येत चांगली असणे आवश्यक आहे म्हणजे नंतर मृत्यू, आजारपण, रोगराईचा फैलाव अशांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. वासरांवर नियमित नजर ठेवा, त्यांना योग्य रीतीने योग्य तेच खायला द्या आणि मुख्य म्हणजे स्वच्छता राखा.

 

स्रोत : Dairy Animal Management, State Institute of Vocational Education, Andhra Pradesh

3.13333333333
योगेश लांडगे पाटील Apr 21, 2019 09:51 PM

वासरू जन्मल्यानंतर त्याला किती दिवसांनी पाणी पाजावे

विजय Dec 30, 2016 10:09 PM

वासरु माती खात आहे काय करावे

प्रविण माने Aug 09, 2016 05:14 PM

वासराचे जन्मल्या पासुनचे त्याला किती प्रमानात खादे द्यावे
त्याची घ्याची काळजी व त्याच्या वाडीसाठी लागणारेआन्न द्रवे याची माहीती

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 13:41:11.257050 GMT+0530

T24 2019/10/18 13:41:11.262922 GMT+0530
Back to top

T12019/10/18 13:41:10.873301 GMT+0530

T612019/10/18 13:41:10.892372 GMT+0530

T622019/10/18 13:41:10.933979 GMT+0530

T632019/10/18 13:41:10.934819 GMT+0530