Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 17:57:13.510124 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / थंडीत करडांची काळजी
शेअर करा

T3 2019/06/26 17:57:13.520163 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 17:57:13.558525 GMT+0530

थंडीत करडांची काळजी

जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो.

जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. गोठ्यामध्ये करडांच्या कप्प्यातील तापमानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मरतुकीचे सत्र सुरू होते. अति थंड बाह्य हवामानास गोठ्यात उबदारपणा, उष्णतामान वाढविण्यासाठी विद्युत दिवे उपयोगी पडतात. अति थंड वातावरणात आर्द्रतेमुळे करडांचे कप्पे लवकर कोरडे होत नाहीत. लेंड्या, पातळ हगवण किंवा मूत्र यामुळे कप्प्यात ओल राहते; मात्र दिवसातून तीन-चार वेळा जागा बदलून करडे कोरड्याच ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी. करडांच्या कप्प्यात गोणपाटाचा वापर केल्यास ओल शोषली जाऊ शकते, जमिनीत चुनखडीचा थोडा वापर ओल शोषण्यास मदतीचा ठरतो. फरशीपेक्षा मुरूम, मातीची धुम्मस केलेली जमीन अधिक गरम असते. एका दुरडीखाली चार-पाच करडे, म्हणजे मोकळी हवा मिळणे कठीण आणि श्‍वसनाचे रोग पसरण्यास वाव निर्माण होतो. दुरडीमुळे शरीर हालचाल पूर्ण बंद होते.

तीन-चार करडे असणाऱ्या शेळीस दूध कमी असू शकते. अशा वेळी करडांना बाहेरून बाटलीने दूध पाजावे. पाने तोडणाऱ्या करडांसाठी कप्प्यात हिरवा लुसलुशीत चारा टांगून ठेवावा. वाढीच्या वयाप्रमाणे कप्प्याची जागा वाढवावी आणि गटवारीनुसार करडे वेगळे करावेत. तीन महिन्यांनंतर नर व मादी करडे वेगळी करावीत. अशक्तपणा आलेल्या करडांसाठी पशुवैद्यकाची मदत आणि उपचार आवश्‍यक असतात. 

संपर्क - 02426- 243455 
संगमनेरी संशोधन योजना, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

एस. जी. जमदाडे, मल्हारपेठ, जि. सातारा

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

2.88709677419
विकी CHAVAN Jan 25, 2018 08:19 PM

मी धुळे जिल्ह्यात राहतो तर मी कोणत्या शेळी चे पालन करू शकेल

नागेश चाैधरी Apr 19, 2017 11:14 AM

मी किनवट तालुक्यात राहतो मला शेलीपालन करायचे आहे कृपया मला शेळीचे खादय, आरोग्य़ लसीकरण माहिती पाठवा… धन्यवाद ई-मेल- नागनाथचौधऱी५५@गमाची.कॉम मोबाइलला नो. 97*****79

SATLE JALINDAR NARAYAN Mar 23, 2017 12:43 PM

मला शेळी पालन करायचे आहे माहिती पाठवा


मोबा नो 95*****70

कमलेश सोनवणे Mar 03, 2017 01:33 PM

मला शेळी पालन करायचे आहे. मी जळगाव जिल्हा मध्ये राहतो तर मला कोणत्या जातीची शेळी पालन करता येईल

विशाल वाबळे Mar 02, 2017 11:40 AM

करडांना जन्मतः रोग असतात का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 17:57:13.976513 GMT+0530

T24 2019/06/26 17:57:13.982896 GMT+0530
Back to top

T12019/06/26 17:57:13.443234 GMT+0530

T612019/06/26 17:57:13.467736 GMT+0530

T622019/06/26 17:57:13.495451 GMT+0530

T632019/06/26 17:57:13.496370 GMT+0530