অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळीपालन

शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकÚयांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.

हे कोण सुरू करू शकते?

  • लघु आणि मध्यम शेतकरी
  • ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक
  • सामान्य कुरणांची उपलब्धता

सुरू करण्याची कारणे

  • कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे
  • साधे आणि लहान शेड पुरेसे आहे
  • स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे
  • शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर
  • वर्षभराचे काम
  • चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे
  • केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात

तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?

जमनापरी

goat-1.jpg


  • चांगली उंची असलेले जनावर
  • प्रौढ जमनापरीमध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान
  • बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते
  • प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू
  • सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते
  • दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन

तेलीचेरी

goat2.jpg

  • शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो
  • एका विण्यात 2-3 करडी
  • बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते

 

बोअर

goat3.jpg

  • संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात
  • वाढीचा दर तीव्र आहे
  • बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते
  • 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते

आहार प्रबंधन

  • चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो
  • प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.
  • शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.
  • एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.

घन आहार खाली दिल्याप्रमाणे तयार करता येऊ शकतो:

घटक

करड्याचा आहार

वृध्दि आहार

स्तनपान
देणाऱ्या शेळीचा
आहार

गर्भारशेळीचा आहार

ज्वारी

37

15

52

35

डाळी

15

37

---

---

तेलवड्या

25

10

8

20

गवताचा भुसा

20

35

37

42

खनिज मिश्रण

2.5

2

2

2

सामान्य मीठ

0.5

1

1

1

एकूण

100

100

100

100

  • करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत 50-100 ग्राम घन/सांद्रित आहार द्यायला पाहिजे.
  • वाढत्या वयाच्या करड्यांना 3-10 महिन्यांपर्यंत दररोज 100-150 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
  • गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
  • 1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
  • शेळ्यांच्या स्टॉलमध्ये उत्तम प्रकारच्या तांब्याने युक्त (950-1250 पीपीएम) असलेले मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यायला हवे.

goat4.jpg

प्रजोत्पादन प्रबंधन

लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळा व्यायला (किडिंग) हवे.

  • तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा.
  • प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा.
  • मादींनी एका किडिंग नंतर 3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते.
  • शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24-72 तास टिकते.
  • माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते.
  • माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो.
  • काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसऱ्या दिवशी घडवायला हवा.
  • गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिलेले बरे.

कृमि नष्ट करणे (पोटातील जंत नष्ट करणे)

  • समागमाच्या आधी माद्यांचे डीवर्मिंग करून पोटातील कृमि नष्ट करायला पाहिजे. ज्या शेळ्यांना जंत असतील त्या कमकुवत आणि संथ असतात.
  • करड्यांचे डीवर्मिंग ते एक महिन्याचे झाल्यावर करावे. कृमि किंवा जंतांचे जीवनचक्र तीन आठवड्यांचे असते, म्हणून करडी दोन महिन्यांची झाल्यावर पुन्हा एकदा डीवर्मिंग करण्याची शिफारस केलेली आहे.
  • विण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे गाभण माद्यांचे डीवर्मिंग करण्यात यायला हवे.
  • गर्भारपणाच्या आरंभिक काळात (2 ते 3 महिने) गर्भपात होवू नये म्हणून माद्यांचे डीवर्मिंग करू नये.

लसीकरण

  • करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.
  • माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा.
  • नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.

शेळ्यांसाठी गोठा (मेषगृहे)

1.डीप लिटर सिस्टम (जनावरांसाठी तृण शय्या)ి

goat5.jpg

  • लहानसा कळप ठेवण्यासाठी पुरेशा आकाराचे शेड ज्यांमध्ये चांगले वातायन (Cross ventilation) असावे.
  • लिटरची (गवताच्या गादीची) उंची कमीत कमी 6 सें.मी. असावी.
  • लिटर तयार करण्यासाठी लाकडाचा भुगा, धान्याचा भुसा आणि शेंगांच्या सालपटांचा वापर करावा.
  • लिटरला थोड्या दिवसांनी वरखाली आलट-पालट करीत राहावे ज्याने घाण वास येत नाही.
  • दर दोन आठवड्यांनी लिटर सामग्री बदलावी.
  • प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते.
  • बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव कमी होईल ह्याबाबत काळजी घेण्यात यायला हवी.
  • एक प्रौढ शेळी एका वर्षांत सुमारे एक टन खत टाकते.

2. रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टम (उंचीवर असलेला मंच)

goat6.jpg

  • जमिनीपासून 3 ते 4 फुटांवर लाकडी तख्त किंवा तारांची जाळी यांचा वापर ह्या पध्दतीत केला जातो.
  • ह्या पध्दतीत बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव पुष्कळ कमी होण्याची शक्यता असते.

संगोपनाच्या पध्दती

  • सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम (अर्ध-गहन पध्दती)
  • कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल.
  • इंटेन्सिव्ह सिस्टम
  • शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो.
  • कुरणात चारणे नाही.
  • शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत.

शेळ्यांचा विमा

  • 4 महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो.
  • अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.

भारतामध्ये शेळ्यांचे फार्म

  • नादूर शेळी फार्म
  • शिवाजी पार्क शेळी फार्म

 

 

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate