Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:08:21.854714 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळीपालनासाठी जाती निवडा
शेअर करा

T3 2019/10/17 16:08:21.860638 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:08:21.892388 GMT+0530

शेळीपालनासाठी जाती निवडा

उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, तर संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे.

उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, तर संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.

ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोंपर्यंत भरते. ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.

दूध उत्पादनासाठी शेळी निवडताना : शेळ्यांचे डोळे पाणीदार व तेजस्वी असावेत. छाती रुंद, भरदार असावी व मान लांब व उंच असावी. कास मोठी, दोन्ही सडांची लांबी सारखी असावी. कास दोन्ही पायांच्या मध्ये किंचित मागच्या बाजूला उंचावलेली असावी.
मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळ्या निवडताना : सरासरी वजनापेक्षा (35 ते 40 कि. ग्रॅ.) थोडे जास्त वजन असणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. या शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे. पाठ सरळ व रुंद असावी. छाती भरदार व रुंद असावी.

- संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

- संपर्क - 02426 - 243362, 243455
संगमनेरी शेळीसुधार योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.


स्त्रोत: अॅग्रोवन

 

2.87878787879
Mule Prashant Oct 26, 2017 01:26 PM

मला शेळी पालन करायचे आहे आपल्या कडुन माहिती मिळावी अशी अपेक्षा करतो MO. ७३५०४६१३९७

Rajendra Ratan Garud Mar 14, 2017 01:38 PM

मला सटाणा तालुक्यात बंदिस्त शेळीपालन व्यवसाय चालू करायचा आहे तरी शेळीची कुठली जात निवडू, व
मला त्याच्यासाठी किती शेड अपेक्षित तयार करावे लागेल याची कल्पना द्यावी ह्या व्यवसायासाठी काही अनुदानाची व्यवस्था
आहे का या बद्दल मला कळवावे माझा मोबाईल नो ८८०६२८२७४५.

ravi kale Feb 17, 2017 10:37 PM

mala shelipalna karayache ahe maza Dt. jalna ahe tar mi kontya jatichi nivad karavi jenekarun mala chagla rojgar milhel mo.80*****18

पांडुरंग चव्हाण Dec 30, 2016 10:51 AM

mala शेळीपाळण karayche ahe mala manthli 20000 uthpann have ahe tya sathi mala kithi guntav nuk karave lagel. Kontya jathichi shele palave lagel v jaga kithi lagel.mala mahithi 98*****15 ya nambhar var dyavi.

अतुल प्रकाश जाधव Dec 24, 2016 11:01 PM

अपुन सर्व १ ग्रुप बनुआय म्हणजे प्रश्न सुटतील प्लीज़ ग्रुप नाव शेळीपालन अस देऊ ओके मज़ा मो.98*****32

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 16:08:22.156031 GMT+0530

T24 2019/10/17 16:08:22.162487 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:08:21.795018 GMT+0530

T612019/10/17 16:08:21.815623 GMT+0530

T622019/10/17 16:08:21.842519 GMT+0530

T632019/10/17 16:08:21.843416 GMT+0530