Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 02:31:3.385872 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळ्यांच्या प्रजननावर लक्ष
शेअर करा

T3 2019/06/17 02:31:3.391745 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 02:31:3.422812 GMT+0530

शेळ्यांच्या प्रजननावर लक्ष

शेळीशेळीच्या आरोग्याची काळजी न घेणे, शेळी व करडांना जंत नाशकाचा मात्रा न देणे, चुकीचे प्रजनन व्यवस्थापन, असंतुलित खाद्य पुरवठा यामुळे शेळी आणि करडांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

शेळीपालन करताना शेळीच्या जातीची निवड, शेळी आणि करडांचे व्यवस्थापन, त्यांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार तसेच व्यवसायाचे अर्थशास्त्र याबाबत माहिती असणे आवश्‍यक आहे.

1) शेळीपालन व्यवसायामध्ये प्रजनन व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. शेळीचे किमान वय 8 ते 10 महिन्यांत 30 किलो झाले पाहिजे. या वेळेस शेळी पहिला माज दाखवतात; परंतु पहिले दोन माज रेतन न करता सोडून द्यावेत. तिसऱ्या माजास रेतन करावे.

2) शेळी अस्वस्थ होणे, सतत ओरडणे, शेपटी हलवणे, खाद्ये खाणे कमी करणे, योनी मार्गात चिकट स्राव दिसून येणे ही शेळीमधील माजाची लक्षणे आढळून येतात.

3) शेळीतील माजाचे चक्र दर 21 दिवसांनी येते. माजाचा कालावधी 30 ते 36 तास असतो. असे निदर्शनास आलेले आहे, की शेळीमधील स्त्रीबीज 24 ते 30 तासांत माज सुरू झाल्यानंतर होत असते. या करिता शेळीस या कालावधीमध्ये किमान दोन वेळेस रेतन करावे.

4) 25 शेळ्यांकरिता 1 नर असावा. शेळीमध्ये दोन वर्षांला तीन वेत घेतल्यास शेळीपालन व्यवसाय जास्त फायदेशीर ठरू शकतो.

5) माजाची तारीख, रेतन झालेली तारीख व इतर सर्व प्रजनन विषयी नोंदी ठेवाव्यात.

6) रेतन केल्यानंतर दोन पुढील माजाची काळजीपूर्वक पाहणी करणे, माज दिसून आला नाही तर गाभण असण्याची शक्‍यता असते. वजन वाढणे व इतर लक्षणांवरून गाभणची खात्री करून घ्यावी.

7) वेळोवेळी पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. त्यानुसार शेळी गाभण असल्याची खात्री करून घ्यावी.

8) शेळीचा गाभण काळ 150 दिवस असतो.

9) गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन वेगळे करावे. गाभण शेळ्यांना संतुलित आहार, हिरवा व वाळलेला चारा, स्वच्छ पाण्याचा वेळेवर पुरवठा करावा. वेळोवेळी आरोग्याची काळजी घ्यावी. योग्य काळजी घेतल्याने सशक्त करडे जन्मतात.

10) शेळी व करडांना औषध उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

नवजात करडांचे संगोपन

1) नवजात करडास शेळी स्वतः चाटून स्वच्छ करते, त्याचे दोन फायदे असतात, त्यामुळे करडांचे रक्ताभिसरण वाढत असते; शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास पिलांचे अंग स्वच्छ, खरखरीत कापडाने स्वच्छ करावे. नाकातील व तोंडातील चिकट स्राव काढावा, त्यामुळे करडांना श्‍वास घेण्यास सोपे जाते. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल.

2) करडांना उभे राहण्यास मदत करावी. करडे उभे राहिल्यानंतर शेळीच्या सडाला तोंड लावून दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही ते पाहावे. नाही तर दूध पिण्यास शिकवावे. पिलू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणे आवश्‍यक असते, यामुळे करडांची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि करडांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.

3) पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. करडे जन्मल्यानंतर त्याचे वजन करून नोंद करून घ्यावी.

4) जन्मल्यानंतर पाच-सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत. रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.

5) साधारणपणे 65- 70 दिवसांपासून करडांचे दूध कमी करत 90 दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे आणि शेळीपासून पूर्णपणे वेगळे करावे. करडांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते.

6) करडांची निरोगी व झपाट्याने वाढ करण्यासाठी त्यांना आवश्‍यक औषधी, सकस आहार इ.कडे बारकाईने लक्ष द्यावे. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.

7) करडांच्या गोठ्यात अनावश्‍यक गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.

8) करडे पाच महिन्यांच्या नंतरच विक्रीसाठी काढावीत, कारण या वयानंतर करडांची वाढ झपाट्याने होते व जास्त नफा मिळतो.

9) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

 

संपर्क - डॉ. अनिल पाटील - 7588062556
(लेखक नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पशुप्रजननशास्त्र विभागात कार्यरत आहेत)
-----------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ: अग्रोवन

3.01470588235
अमोल विजय उघडे Sep 09, 2017 03:47 PM

मला साधारणत ५०-६० शेळी पासून शेळी पालन सुरु करायचे आहे तरी मला शेळी पालाचे मार्गदर्शन व शेळी पालन साठी सरकारी बँक लोन कसे मिळवता येईल हया संदर्भ मार्ग दर्शन पाहिजे होते. मोबाईल नो. ८९७६१०२०७८

किशोर,भाऊसाहेब,बोरकर May 26, 2017 12:32 PM

मला,गोटा,बाधनया,साटी,सरकारी,लोन,हवे

Hrishikesh agale Dec 08, 2016 05:47 PM

माला बंदिस्त शेळी पालन करायचे आहे माझी पुरंदर तालुक्यात पोंढे गावत ४ एकर शेती पडीक आहे तर माला बैंक लोन मिळू शकते का? व किती मिळेल. कृपया माला मर्गदर्शन करा मझा मो.नं.९५५२५६२०१५

बालाजी गुळमे Nov 23, 2016 10:24 PM

मला शेती नाहीये पण मला व्यवसाया साठी शेळीपालन करयचे आहे मदत पहिजे मो92737459

लक्ष्मन कोराणे May 30, 2016 02:26 PM

मला शेलिपलना विषयी माहिती हवी आहे 90*****00/99*****00

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 02:31:3.641545 GMT+0530

T24 2019/06/17 02:31:3.647966 GMT+0530
Back to top

T12019/06/17 02:31:3.305315 GMT+0530

T612019/06/17 02:31:3.324464 GMT+0530

T622019/06/17 02:31:3.374170 GMT+0530

T632019/06/17 02:31:3.375141 GMT+0530