Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 09:48:56.655378 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...
शेअर करा

T3 2019/05/20 09:48:56.660040 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 09:48:56.685358 GMT+0530

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत...

शहरी भागातील नागरीकांना मिळणा-या जिवनावश्यक वस्तु जसे - भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ , अंडी, डाळी हे खात्रीशिर व भेसळमुक्त मिळेल याची हमी नसून हमी देणारी सक्षम यंत्रणा नाही.

शहरी भागातील नागरीकांना मिळणा-या जिवनावश्यक वस्तु जसे -  भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ , अंडी,  डाळी  हे खात्रीशिर व भेसळमुक्त मिळेल याची हमी नसून  हमी देणारी सक्षम यंत्रणा नाही.  ही यंत्रणा नसल्यामुळे आरोग्याविषयी जागरूक वर्गही याला नाहक बळी पडतो. भेसळ मुक्त वस्तु ग्राहकांना मिळत नसल्याने होणा-या दुर्धर आजाराची भिती वाढत आहे.  भेसळ करुन जास्त नफा मिळवणं-या  व्यापारी वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेतक-यांचा  माल थेट ग्राहका पर्यंत पोहचत नाही ज्यामुळे  शेतकरी व ग्राहकाचे  नुकसान होत आहे.

शेतकरी महिलांचे  जिल्ह्यात विविध व्यवसाय सुरु असून त्यात प्रमुख्याने  यवतमाळ सीएमआरसी अंतर्गत जांब येथे  दुग्ध संकलन व प्रक्रिया  केंद्र, नेर व मारेगाव येथे दालमिल तर आर्णी व राळेगाव येथे  कडकनाथ अंडी उत्पादनाचे युनिट सुरु करण्यात आले आहे. या  महिलांकडे विक्री  व्यवस्था  नसल्याने बरेचदा माल पडुन राहत होता तर दुध व दुग्धजन्य पदार्थ खराब होत होते. यासाठी  सक्षम विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक होते.  प्रभावी विक्री व्यवस्था उभारण्यासाठी एका अभियानास सुरवात करण्यात येवून या अभियानाला ‘ शेत ते थेट परीवार’  असे नाव देण्यात आले.

शेतक-यांना  शेत ते थेट परिवाराच्या  माध्यमातून आर्थिक बळकटी देण्यासाठी शेतातील उत्पादित माल व दर्जेदार उत्पादने थेट ग्राहक पर्यंत पोहचविण्यासाठी एक यंत्रणा उभारण्यात आली.  शेत ते थेट परिवार मध्ये ग्राहकाची नोंदणी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील शासनाच्या विविध विभागातील अधिका-यांना  भेटून ही संकल्पना  माविम च्या  अधिका-यांनी पटवून दिली.  सदर  उत्पादन हे  दर्जेदार असून यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. ताजे व भेसळमुक्त जिवनावश्यक  वस्तुचा पुरवठा करण्याची हमी ग्राहक नोंदणी दरम्यान देण्यात आली. ग्राहक नोंदणी अभियान राबविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची सुध्दा मदत घेण्यात आली. शहरात सद्यस्थितीत १८० ग्राहकाची नोदणी करण्यात आलेली आहे.यवतमाळ शहरालगतच्या जांब येथे  २०० ते ३०० लिटर क्षमतेचे दुध संकलन व प्रक्रीया केंद्र असून या केद्रातील दुध  शेत ते थेट परीवार या अभियानाच्या माध्यमातुन शहरात योग्य दरात विक्री होत आहे. सदर केंद्र गावातच सुरु झाल्याने  पशुपालकांचा यवतामळ शहरात नेउन दुध विकण्याचा त्रास वाचला असुन त्यांना फॅट प्रमाणे दर मिळतो. सिएमआरसी सदर चे दुध  विक्रीसाठी विपणन व्यवस्था विकसित केली असुन यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनात शहरात भेसळी संदर्भात व आराग्याच्या बाबतीत जागृत असलेल्या अधिका-यांची भेट घेण्यात आली व सदर दुधाचे वैशिष्टये समजवुन व पटवुन देण्यात आले. आजमीतीस यवतमाळ शहरात दररोज सरासरी १४० लिटर दुधाची व दुग्धजन्य पदार्थाची विक्री शेत ते थेट परिवाराच्या माध्यमातुन केली जाते.  दुधाची खरेदी करत असलेल्या ग्राहकांच्या उत्पादनांसदर्भात नियमित प्रतिक्रीया घेण्यात येवुन दर्जेदार उत्पादन पुरवण्याचा प्रयत्न केला जातो.

शहरी ग्राहकांना सकाळी दुधाबरोबर अंडीची गरज भासत असते ही गरज पुर्ण करण्यासाठी कडकनाथ जातीचे ओषधी गुणधर्म असलेली अंडी व ग्राहकाच्या मागणी नुसार  कोंबडी ची विक्री शहरात उभारण्यात आलेल्या विक्री केंद्र चे माध्यमातून केली जाते.  कडकनाथ ही अशी कोंबडीची देशी जात आहे की, जिचे मास त्वचा, हाडे, रक्तही काळेशार आहे. मध्यप्रदेशातील झाबुआ, धार या भागातील आदिवासीकडे हि जात आढळते. ब्रायलर  कोंबडीच्या तुलनेत कडकनाथची प्रतिकारशक्ती चांगली आहे. रक्ताचा कर्करोग, ह्यदयरोग व त्वचेचे रोग यावर याचे मास अतिशय गुणकारी आहे. या कोंबडीची अंडी स्वादिष्ट असुन त्यात प्रथिनाचे प्रमाण भरपुर असल्याने ही डायट अंडी म्हणुन वापरली जाते. सदर अंडी ही  शेत थेट परिवार मध्ये नोंदणी असलेल्या  ग्राहकाला दिली जात आहे.  या अंडी ला बाजारभावापेक्षा जास्त भाव  मिळत असल्याने या व्यवसायातुन प्रतिमहा  २० ते २२  हजार उत्पन्न त्यांना मिळत आहे.  आता मात्र या व्यवसायामुळे त्यांचे कष्टाचे काम करणे थांबले आहे. या व्यवसायातुन  ते  आपल्या मुलांचे शिक्षण पुर्ण करीत असुन नियमित गरजा हि या माध्यमातुन पुर्ण होत आहे.

मार्केट मध्ये येत असलेली तुर डाळ ही पॉलिस केली दाळ असुन त्यामध्ये  पोषक तत्वाचे प्रमाण कमी असते.  नेर व मारेगाव येथील दालमिल मधुन प्रक्रीया केलील दाळ ही  चवीला अतीशय रुचकर, शरीराला पोषक, प्रोटीन, कार्बोहाड्रेईटस, कॅलशियम, विटॉमिन चे प्रमाण भरपुर प्रमाणात असणारी दाळ आहे.  त्यामुळे हि दाळ खाल्याने आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होत आहे. सदर दाळ ‘शेत ते थेट परीवार’ च्या माध्यामातुन विक्री होत असल्याने ग्रामीण भागातील शेतक-याना याचा थेट फायदा होत आहे.

वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी माविम यांच्या मार्गदर्शनात रहीवासी कॉलनीतील परीचयातील लोकाची भेट देवुन ग्राहक नोंदणी करण्यात आली.  उपजीविका अधिकारी व सल्लागार यांनी व.जि.स.अ. यांच्या मार्गदर्शनात विविध शासकीय विभागातील अधिकारी  यांची भेट घेतली.  शेत ते थेट परिवारात नोंदणी करून घेतली.   अभियानाची व्यापकता वाढवी म्हणुन समाजकार्य महाविदयालय येथे भेट घेवुन शेत ते थेट या अभियाना संदर्भात माहीती दिली. या अभियानात समाजकार्य महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग  घेतला. या अभियानाची व्याप्ती वाढावी व अधिकाधिक लोकांपर्यंत हे अभियान पोहचावे यासाठी पॉम्पेलट, स्टिकर व्दारे जाहीरात करण्यात आली तसेच जाहीरातीसाठी सोशल मिडीयाचा  प्रभावीरित्या वापर करण्यात आला असून वॉटसअप व फेसबुक वर गृप तयार करून माहिती देण्यात येत आहे.  शहरात प्रमुख ठिकाणी स्टॉल लावुन माहीती देण्यात आली .यामुळे सदर अभियानात नोंदणी करणा-याची संख्या वाढत आहे.

यशस्विनी लोकसंचालीत साधन केंद्र , यवतमाळ यांनी शेत ते थेट परीवारातील ग्राहकांना दर्जेदार सेवा पोहचहविण्याचे दृष्टीने सीआरपीची नियुक्ती करण्यात आली असून  फॅट लावुन दुध घेणे तसेच दुधाचे पॅकींग करण्याचे काम सीआरपीच्या  माध्यामतुन केले जाते. दुध नियमित व वेळत  ग्राहकांपर्यंत पोहचविने हिशोब ठेवणे  पेमेंट  घेणे आदी कामाची जबाबदारी सीएमआरसी पार पाडत आहे. तसेच नागरी उपजिविका  अभियान अंतर्गत बचत गटातील महिलांची विक्री केंद्रासाठी निवड करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून अंडी व कोंबडी ची विक्री केली जाते. या  अभियानाच्या माध्यमातून  विक्री केद्र चालविण-या महिलांना रोजगार मिळाला आहे.

लेखक : डॉ रंजन वानखेडे

वरीष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, माविम यवतमाळ

3.02857142857
गोकुळ डिसले Jun 16, 2017 05:22 PM

या कार्याचा आभिमान वाटतो

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 09:48:56.834841 GMT+0530

T24 2019/05/20 09:48:56.841046 GMT+0530
Back to top

T12019/05/20 09:48:56.584514 GMT+0530

T612019/05/20 09:48:56.603933 GMT+0530

T622019/05/20 09:48:56.644041 GMT+0530

T632019/05/20 09:48:56.644926 GMT+0530