Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:24:44.133760 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / कडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन
शेअर करा

T3 2019/10/17 05:24:44.139557 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:24:44.167691 GMT+0530

कडबाकुट्टी यंत्रामुळे फुलले जीवन

पशु पालकांनी जनावरांना पारंपरिक वैरणीऐवजी त्यात थोडे बदल केले तर जनावरे ते आवडीने खातात तसेच वैरणीची नासाडीही कमी होते.

पशु पालकांनी जनावरांना पारंपरिक वैरणीऐवजी त्यात थोडे बदल केले तर जनावरे ते आवडीने खातात तसेच वैरणीची नासाडीही कमी होते. लक्ष्मण सूर्यभान धनके हे तुळजापूर तालुक्यातील सारोळा येथील रहिवासी असणारे एक पशूपालक. त्यांची नुकतीच भेट झाली. तेव्हा मला याची प्रचिती आली. त्यांच्याकडील कडबाकुट्टी यंत्र पाहिल्यानंतर वैरण देण्याच्या आगळ्या पद्धतीबाबत माझी उत्सुकता वाढली आणि त्यांनीही पशुपालन कडबाकुट्टी यंत्राचा कसा लाभ करून घेतला याची सविस्तर माहिती दिली.

पारंपरिक पद्धतीने वैरण कापणी

श्री. धनके म्हणाले की, माझ्याकडे स्वत:ची लहान व मोठे मिळून 10 जनावरे आहेत. एके दिवशी माझी गाय सिंदफळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेलो असता डॉ. किरण आरेकर यांनी सध्या आपण पारंपरिक पद्धतीने वैरण कापून टाकतो त्यामुळे वैरणीची नासाडी होऊन आर्थिक नुकसान होत असल्याचे आणि परिणामी वैरणीची टंचाई भासत असल्याचे सांगितले. मला त्याचे महत्त्व पटल्याने त्यांनी मला कडबाकुट्टी यंत्राबाबत माहिती दिली.

मला गतवर्षी केंद्र पुरस्कृत वैरण विकास योजनेतून विद्युतचलित कडबाकुट्टी या योजनेचा लाभ मिळाला. या योजनेत मी माझा लाभार्थी हिस्सा रु.4 हजार 350/- पहिल्यांदा भरला व शासनाकडून अनुदानाची रक्कम रु. 13 हजार 050/- मिळून मला रु.17 हजार 400/- कडबाकुट्टी यंत्र पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद कडून मिळाले.

कडबाकुट्टी यंत्र

कडबाकुट्टी यंत्राचा मी नियमितपणे वापर करू लागलो. त्यामुळे माझ्या रोजच्या वैरणीची सरासरी 60 ते 70 टक्के बचत होऊ लागली व शिल्लक वैरण मला पुढील दिवसासाठी शिल्लक राहू लागली. त्यामुळे माझ्या जनावरांच्या वैरणीचा प्रश्न काही महिन्याकरिता सुटला.

वैरणीची कडबाकुट्टी केल्यामुळे ती कुट्टी जनावरे आवडीने खाऊन जास्त वेळ रवंथ करु लागली. जनावरे सुधारून त्यांच्या दूध उत्पादनात आणि माझ्या उत्पन्नात देखील वाढ होऊ लागली. यामुळे मी सध्या माझ्या कुटुंबियात सुखी समाधानाने राहत आहे. मला आलेल्या चांगल्या अनुभवामुळे पशुपालकांनी या कडबाकुट्टी यंत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी करीत आहे. हे सर्व सांगत असताना लक्ष्मण धनकेंच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता.

 

लेखक - आश्रुबा सोनवणे
जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद

स्त्रोत - महान्युज

3.08333333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:24:44.402228 GMT+0530

T24 2019/10/17 05:24:44.415142 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:24:44.064796 GMT+0530

T612019/10/17 05:24:44.085332 GMT+0530

T622019/10/17 05:24:44.122909 GMT+0530

T632019/10/17 05:24:44.123792 GMT+0530