Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 17:55:18.671733 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / उत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती
शेअर करा

T3 2019/10/17 17:55:18.677865 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 17:55:18.710110 GMT+0530

उत्कृष्ट व्यवस्थापन टोमॅटो शेती

सातारा जिल्ह्यातील जखीणवाडी (ता. कराड) येथील आनंदराव व शिवाजी भानुदास पाटील या दोघा बंधूंनी टोमॅटो पिकातील सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून शेतीत प्रगतीचा सुगंध निर्माण केला आहे.

सातारा जिल्ह्यातील जखीणवाडी (ता. कराड) येथील आनंदराव व शिवाजी भानुदास पाटील या दोघा बंधूंनी टोमॅटो पिकातील सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून शेतीत प्रगतीचा सुगंध निर्माण केला आहे. टोमॅटोच्या हुकमी उत्पन्नाच्या जोरावर ते ऊस पिकाचे नियोजन करतात. कष्टातील सातत्य व आधुनिकतेची कास पकडून त्यांनी साधलेली प्रगती दिशादर्शक आहे.
अमोल जाधव
कराड शहरापासून काही अंतरावर जखीणवाडी हे गाव आहे. गावालगत मलकापूर व कराड ही दोन मोठी शहरे असल्याने उसाबरोबर भाजीपाला व त्यातही फळपिकाखाली गावाची बहुतांश शेती आहे. येथील आनंदराव व शिवाजी पाटील यांची वडिलार्जित एकूण दहा एकर शेती हलकी ते मध्यम व चुनखडी अशा प्रतीमध्ये विखुरली आहे. विंधन तसेच विहिरीद्वारे शेतीला पाणी मिळते. सध्या गळितासाठी चाललेला तीन एकर आडसाली ऊस, दोन एकर 20 गुंठे आडसाली ऊस लागवड, 25 गुंठे पपई व चार एकरांत टोमॅटो आहे.
सध्या संकरित टोमॅटोची सप्टेंबर 2013 च्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात दोन टप्प्यांत अर्ध्या अर्ध्या क्षेत्रावर पाटपाण्यावर तसेच ठिबक सिंचनावरही लागवड केली आहे. आनंदराव दहावी शिक्षणानंतर शेतीत राबत आहेत. तर शिवाजी यांनी बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर तालुक्‍यातील एका सहकारी साखर कारखान्यात नोकरी केली. परंतु नोकरीत मन रमत नसल्याने तेही शेतीकडे वळले. त्याचबरोबर ट्रॅक्‍टर व्यवसाय सुरू केला. 

त्यांच्या शेतीची पार्श्‍वभूमी म्हणजे शेतीचे निम्मे क्षेत्र बुद्धकालीन आगाशिव डोंगरपायथ्याशी आहे. जमिनीला मोठ्या प्रमाणात चढ-उतार, पाण्याची दुर्भिक्षता, जंगली प्राण्यांचा पिकांना सातत्यपूर्ण उपद्रव आहे. जमिनीची प्रत चुनखडीची असल्याने पीक नियोजनही तितकेच कठीण असते. या स्थितीत हुकमी उसाचे शिलकी उत्पन्न नजरेसमोर ठेवून टोमॅटो या हमीदायी पिकातून त्यांनी प्रगती साधली आहे. योग्य व्यवस्थापन केले तर उत्पादनही चांगले मिळते, या गोष्टीवर विश्‍वास ठेवून ते गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत.

पाटील बंधूंच्या शेतीतील महत्त्वाच्या बाबी

 • पूर्वमशागतीवेळी एकरी नऊ ट्रेलर शेणखत व एक टन कंपोस्ट
 • हिरवळीच्या खतासाठी तागाचा अवलंब.
 • लागवडीपूर्वी शेतात मेंढ्यांचा कळप बसवतात.
 • प्रत्येकी दोन एकर ऊस व टोमॅटोत ठिबक सिंचनाचा वापर.
 • कीडनाशकांच्या वेळेत नियंत्रणात्मक फवारण्या. वेलांची बांधणी.
 • नैसर्गिक आरिष्ट्य, अवेळी पाऊस, धुके व आभाळी वातावरण व थंडीच्या कालावधीत वातावरणातील बदलानुसार फवारण्या.
 • फुलकळी धारणेसाठी संजीवकांचा योग्यवेळी वापर.
 • सध्या बिगर हंगामी टोमॅटो प्लॉट. तरीही यशस्वी करण्याचा प्रयत्न
 • मुळांना चालना, फुलकळी गळू न देणे तसेच फळे पोकळ होऊ नयेत यासाठी पाण्याचा काटेकोर वापर.
 • फवारण्यांद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये
 • मूळकूज, कीडनियंत्रणासाठी ड्रेंचिंगही केले जाते.

पाणी व्यवस्थापन

पाटपाण्यावरील क्षेत्रात ओलावा पाहून पाच ते सहा दिवसांनी पाणी दिले जाते. ठिबकवरील क्षेत्रात सुरवातीच्या एक महिन्यात दररोज एक तास व फळधारणेनंतर ओलावा पाहून दीड ते दोन तास सिंचन सुरू ठेवले जाते. डोंगर पायथ्याच्या क्षेत्रात गेल्या वर्षी धाडसाने 50 फूट व्यास व 45 फूट खोलीची विहिरीची खुदाई केली. विहिरीच्या बांधणीसाठी स्वतःकडील टेंम्पोही विकला. विहिरीस पाणी चांगले असल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित केली आहे.
 • पाटील बंधू दोघेही शेतीचा व्याप सांभाळतात. त्यामुळे निम्मा वाटा पद्धत अवलंबली आहे. याचा फायदा वेळेत कामे पूर्ण करता येऊन मजूरटंचाईवर मात करणे शक्‍य झाले आहे.
 • दरवर्षी दोन एकरांवर टोमॅटो. यातून शेती व्यवस्थापन व घरखर्च पूर्ण करता येतो. दरवर्षी उत्पादित उसाचे उत्पन्न शिलकी ठेवले जाते.
 • टोमॅटोचा बहर संपल्यानंतर तार, काठी बाजूला घेऊन पिकाच्या अवशेषांसह जमिनीची पूर्ण मशागत केली जाते. याच पिकाच्या बेवडावर ऊस लागवड होते.
 • आडसाली तुटलेल्या उसाची खोडकी व पाला एकत्रित कुट्टी करतात. त्यावर बेसल डोस देऊन पुरेशी मेहनत करतात. शेताला विश्रांतीनंतर दुसऱ्या पिकाची लागवड करतात.
 • डोंगरपायथ्याच्या क्षेत्रात जाण्यासाठी पाटील बंधूंना खडतर प्रवास करावा लागतो. परंतु अडचणींची तमा न बाळगता घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागणाऱ्या क्षेत्रालगत त्यांनी विहीर खुदाई केली आहे.
 • उत्पादन-
 • मार्च 2011 मध्ये पाटपाण्यावरील दोन एकरांतील टोमॅटो क्षेत्रात 58 टन उत्पादन मिळाले. उत्पादित मालास प्रति दहा किलोस सुरवातीपासून ते शेवटपर्यंत 130 ते 150 रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या वर्षी उन्हाळ्यात लागवड केलेल्या 70 गुंठे क्षेत्रात 63 टन उत्पादन मिळाले. त्यास किलोस सरासरी 15 ते 28 रुपयांपर्यंत दर मिळाला.
सध्या ठिबक लागवडीखालील दोन एकरांतील आठ तोड्यांपासून सुमारे 21 टन 700 किलोपर्यंत उत्पादन मिळाले आहे. सुरवातीच्या तोड्यातील 25 क्रेट मालास 330 रुपये (प्रति क्रेट) प्रमाणे व त्यानंतरच्या 65 क्रेट मालास 300 रुपये भाव मिळाला. मध्यंतरी ऊसदर आंदोलन व आवक वाढल्याने दरांवर परिणाम झाला. आजमितीला हाच दर 100 ते 120 रुपयांपर्यंत मिळत आहे. दोन एकरातील ठिबक तसेच व्यवस्थापनकामी आतापर्यंत एक लाख रुपये खर्च आला आहे. अजूनही आठ ते नऊ तोडे होतील अशी शक्‍यता आहे. पाटपाण्यावरील दोन एकरांत टोमॅटोचा नुकताच तोडा सुरू झाला आहे. उत्पादित माल दैनंदिन बाजारभाव पाहून कराड, बेळगाव व मुंबई मार्केटला विक्री केला जातो. शेतीतील उत्पन्नाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान, विविध पिकांच्या वाणांचा अवलंब करतच टोलेजंग घराचे स्वप्नही पाटील बंधू यांनी पूर्ण केले आहे.

सुधारणा केल्याने प्रगतीला मिळाली गती...

पाटील बंधूंकडे पूर्वीपासून टोमॅटोची पाटपाण्यावर लागवड आहे. शेतीला हमीदायी पाण्याची उपलब्धी झाल्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये ठिबक सिंचन पद्धत अवलंबली. ठिबकखालील पिकात फळांचा बहर लवकर सुरू झाला. त्यामुळे उत्पादन लवकर सुरू झाले. फळांची संख्या चांगली व जोमाने वाढ झाली. 
पाटील बंधू ऍग्रोवनचे नित्यपणे वाचन करतात. त्यातील वाचनीय लेख व बातम्यांचे संकलनही करतात. ऍग्रोवनमधील शेतकऱ्यांच्या यशोगाथांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी शेतीत उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचे सांगितले. 

शिवाजी पाटील- 9145401020

माहिती संदर्भ अॅग्रोवन

 

3.01265822785
शुभम देशमुख Apr 04, 2017 09:16 AM

मला तुमचा संदेश चांगला वाटत आहे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 17:55:19.379118 GMT+0530

T24 2019/10/17 17:55:19.385703 GMT+0530
Back to top

T12019/10/17 17:55:18.497814 GMT+0530

T612019/10/17 17:55:18.516216 GMT+0530

T622019/10/17 17:55:18.659885 GMT+0530

T632019/10/17 17:55:18.660935 GMT+0530