Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:40:23.290681 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / एक एकर शेताने दिला महिलेला आधार
शेअर करा

T3 2019/10/14 06:40:23.296145 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:40:23.326471 GMT+0530

एक एकर शेताने दिला महिलेला आधार

सहकाराचं मोठं जाळं असलेला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आर्थिक दृष्ट्या संपन्न समजला जातो. या जिल्ह्य़ातील पुणे-नगर हायवेवरील चास नावाचं छोटं खेडं. शहरालगत वसलेल्या याच गावात राहणारं जाधव कुटुंब.

सहकाराचं मोठं जाळं असलेला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आर्थिक दृष्ट्या संपन्न समजला जातो. या जिल्ह्य़ातील पुणे-नगर हायवेवरील चास नावाचं छोटं खेडं. शहरालगत वसलेल्या याच गावात राहणारं जाधव कुटुंब. ८० वर्षाचे गंगाराम आणि ७५ वर्षांच्या त्यांच्या पत्नी सीताबाई जाधव. पिढीजात गरीबी, राहायला स्वतःचं घर नाही, दुसर्याच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आपला संसार मांडलेला. पोटापाण्याचं एकमेव साधन म्हणजे १ एकर शेती. दोन मुलींचं हालाकीमुळे लहानपणीच लग्न लावून दिलेलं.

अशा परिस्थितीत पण गंगाराम आणि सीताबाई कबाडकष्ट करुन आपला संसार चालवत होते.

अचानक एक दिवस गंगाराम यांचा मोठा अपघात झाला, त्यात त्यांचा एक हात अन् एक पाय गंभीर जखमी झाला. ते अंथरूणाला खिळुन पडले. घरात पैसा नाही, कोणाचा मानसिक आधार नाही असे असुन देखाल त्यांच्या पत्नी सीताबाई खचल्या नाहीत. त्यांनी हातात नांगर धरला. नवर्‍याची अहोरात्र सेवा करत करत त्यांनी स्वतः शेती करण्यास सुरुवात केली.

औषध खर्चासाठी जवळ असलेल्या ६ पेकी ४ शेळ्या विकाव्या लागल्या. एक एकरमध्ये पहिल्या वर्षी त्यांनी कांदा आणि लसुन लावला. कांद्याला भाव न मिळाल्याने तो सडला आणि अक्षरशः फेकुन द्यावा लागला. पण सीताबाईंनी जिद्द सोडली नाही. आठवडी बाजारात जाऊन त्या लसुन विकत असत आणि सोबतचं इतरांच्या शेतात मजुरी काम करुन मिळणाऱ्या पैशातुन नवर्‍याचं औषधपाणी करत.

जिद्द, कष्ट यांना यावर्षी निसर्गाची देखील साथ  मिळाली. चांगला पाऊस झाल्याने गव्हाचं चांगलं पीक आलं. त्यासोबतच लसुन आणि कांद्याचं उत्पन्न त्यांना शेतातुन मिळालं. आता गंगाराम यांच्या तब्येतीत पण चांगला फरक पडलाय. ते आता चालु-फिरु शकत आहेत.

एकामागून एक संकटे येऊन सुद्धा, कोणाचाही आधार नसताना सीताबाईं ठामपणे उभ्या राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी मनात एक नवी उमेद जागृत ठेवली.त्यांच्या धैर्याला सलाम !!

 

लेखक : कौशल मुकुंदराव खडकीकर

3.27272727273
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:40:23.953028 GMT+0530

T24 2019/10/14 06:40:23.959670 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:40:23.129208 GMT+0530

T612019/10/14 06:40:23.148008 GMT+0530

T622019/10/14 06:40:23.280151 GMT+0530

T632019/10/14 06:40:23.281130 GMT+0530