Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:19:0.359867 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / धानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन
शेअर करा

T3 2019/10/14 07:19:0.371447 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:19:0.435210 GMT+0530

धानाच्या नवीन संशोधित पार्वती सूत वाणाला आत्माने दिले प्रोत्साहन

सुगंधीत व लहान तांदळाच्या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी.

प्रायोगिक तत्वावर 200 एकरात भाताची रोवणी

आकाराने लहान असूनही सुगंधीत असलेल्या पार्वती सूत - 27 या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी 200 एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वती सूत - 27 हे भाताचे वाण इतर वाणाच्या तुलनेत अत्यंत वेगळे असून केवळ 125 दिवसात उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही या नवीन संशोधित वाणाबद्दल चांगलीच उत्सुकता आहे.

पार्वती सूत - 27 हे 125 दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधीत असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी 170 एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी 20 क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.

हलका सुगंधीत व बारिक असलेले पार्वती सूत हे धानाचे नवीन संशोधन चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदीचे प्रगतीशील शेतकरी सुधाकर पोशेट्टीवार यांनी संशोधित केले आहे. धान पिकामध्ये संशोधन करुन पार्वती सूत हे वाण तयार झाल्यानंतर या संशोधित वाणाला इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना कमी दिवसात व सरासरी जास्त उत्पादन देणारे हे वाण असल्यामुळे आत्मातर्फे शेतकरी बचतगटाच्या माध्यातून प्रायोगिक तत्वावर उत्पादनाला सुरुवात केली.

शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतच उत्पादन व थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्मातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. नवीन संशोधित वाण असल्यामुळे पहिल्याच वर्षी या वाणाला जनतेकडून मागणी मिळविण्यासाठी धान्य महोत्सवात खुले करण्यात आले. संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने भाताचे उत्पादन घेतल्याने सरासरी उत्पादनही बऱ्याप्रमाणात झाले. प्रायोगिक पद्धतीने 20 हेक्टरवर 1 हजार 360 क्विंटल धान उत्पादन झाले. धान्य महोत्सवात सरासरी 70 रुपये किलोप्रमाणे या तांदळाला भाव मिळाला. त्यामुळे हे नवीन वाण जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रारंभी धानाचे प्रयोगशाळेत पाठवून उगवणूक क्षमता तसेच आवश्यक गुणधर्म तपासण्यात आले. त्यानंतरच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रोवणीसाठी पार्वती सूत हे वाण उपलब्ध्‍ा करुन देण्यात आले. जिल्ह्यातील मौदा, उमरेड, कुही, रामटेक, पारशिवनी आदी भात उत्पादन क्षेत्रात रोवणीसाठी हे धान उपलब्ध करुन देण्यात आले. शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी तथा गट स्थापन करुन पार्वती सूत या नवीन संशोधित वाणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

- अनिल गडेकर

माहिती स्रोत: महान्युज

2.85714285714
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:19:1.328894 GMT+0530

T24 2019/10/14 07:19:1.336209 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:19:0.146174 GMT+0530

T612019/10/14 07:19:0.165806 GMT+0530

T622019/10/14 07:19:0.338764 GMT+0530

T632019/10/14 07:19:0.340700 GMT+0530