Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:40:1.631807 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / पडीक जमीनितून सुखाची सुगी
शेअर करा

T3 2019/10/17 05:40:1.637545 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:40:1.668968 GMT+0530

पडीक जमीनितून सुखाची सुगी

थोड्याशा बाह्य सहाय्यामुळे पानपोसी गावातील आदिवासी समुहाने आपल्या पडिक जमिनी उत्पादक बनवल्या.

थोड्याशा बाह्य सहाय्यामुळे पानपोसी गावातील आदिवासी समुहाने आपल्या पडिक जमिनी उत्पादक बनवल्या. वाढवलेल्या झाडानी त्याना उत्पन्व वाढ तर दिलीच पण त्याच

बरोबर सर्व समुहाला व गावालाच एकत्र  बांधले आणि पलायन पूर्णपणे थांबवले.

जाशीपूर ब्लॉककमधील पानपोसी हे आदीवासी खेड्यांपैकी एक गांव आहे. येथील शेतक्यांचा उदरनिर्वाह कोरडवाहू धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. येथील जवळजवळ 38% जमीन ओबडधोबड व चढउताराची आहे. त्यापैकी केवळ 10% जमीन शेतकरी धानाच्या उत्पादनासाठी वापरतात. उरलेली संपूर्ण जमीन उत्पादनासाठी योग्य नसल्यामुळे वर्षानुवर्ष पडीक ठेवण्यांत येते. त्यामुळे खेड्यात शेतीचे काम नसल्यामुळे जवळजवळ 40-50 कुटूंब नियमितपणे आपल्या कुटुंबाच्या उपजिवीकेने साधन/रोजगार शोधण्यासाठी शहराकडे स्थलांतर करतात. रोजगार व अन्नधान्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्थलांतराला थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक आवक वाढवीण्यासाठी DULAL संस्थेने NABARD च्या साहाय्याने शेतक-यांच्या विकासासाठी वाडी (WADI) प्रकल्पाचा प्रचार व प्रसार करण्यास सुरूवात केली. तसेच हया प्रकल्पाला राबवीण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सुरू केला. हा प्रकल्प ओरिसामधील NABARD च्या सहायाने राबवण्यात आलेल्या ३१ प्रकल्पांपैकी एक प्रकल्प होता हया प्रक्ल्पाचा मुख्य उद्देश्य वाडी विकसित करणे असला तरी वाडी सभोवती इतर कृषी विकास कार्यक्रम राबविले गेले. उदा. हया क्षेत्रात वनस्पतींना वाढविण्यासोबतच मातीचा ओलावा राखणे तसेच शक्य असेल तेथे विहिरी खोदुन पाण्याची सोय करणे, सोबतच महिला सशक्तीकरण व त्यांचे स्वास्थ्य हया घटकांना देखील स्थान मिळाले. वाडी मध्ये लावलेल्या  झाडांच्या मध्ये पुरेशी जागा असल्यामुळे आंतरपिके घेणे हा वाडी उपक्रमातील महत्वाचा भाग होता.

सुरूवात

सन 2005 मध्ये DULAL च्या सदस्यांनी त्या गांवाला भेट देतून तिथे वनस्पतींच्या लागवडीबाबत शेतक-यांशी चर्चा केली सुरुवातीला शेतकरी हयाबाबत निरूत्साही होतेच. शिवाय DULAL बाबत  त्यांच्या मनात विविध शंका होत्या विकासाच्या नावाखाली DULAL चे सदस्य आपली जमीन हिरावून घेतील, अशी भीती त्यांच्या मनात सतत घर करीत होती. जवळजवळ एक वर्षांपेक्षा जास्त काळ झाडांच्या लागवडीसाठी शेतक-यांची संमती

गुजरात मध्ये ‘वार्डी' म्हणजे छोटा बगीचा. प्रक दोन प्रकाराचा. ही संकल्पना बाएफ  संस्थेच्या दोन दंशकांच्या प्रयत्नातून निर्माण झालेली आदिवासी विकासाचे मॉडेल म्हणून विकसित झाली आहे. दोन ते तीन प्रकारची फळझाडे वार्डीमध्ये घेतली जातात. यामुळे पर्यावरण, जैवविविधता तसेच बाजार व्यवस्था या तीनही महत्वाच्या बार्बी लक्षात घेतल्या आहेत. आदिवासीची जमिन 5 एकरापेक्षा ही कमी असेल. त्यातील एक  एकरामध्ये सुमारे 60 फळझाडे व सभोवताली 600 जंगलीझाडे कुपंण म्हणून लावली जातात.

मिळवण्यास लागला. नंतर शेतक-यांच्या वारंवार घेतलेल्या भेटीत व त्यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे शेतकरी झाडांच्या लागवडीसाठी सहमत झाले व लागवडीसाठी जमीन तयार करू लागले. सन 2007 मध्ये 53 एकर  जमीन फळझाडांच्या लागवडीसाठी निश्चित करण्यात आली त्यावेळी काही लोकांनी विरोध केलाच. परंतु नंतर तेही हया कार्यक्रमात सहभागी झाले. सन 2008 मध्ये हयात पुन्हा नविन 62 एकर जमीनीची भर पडली. त्याचप्रमाणे पुढील वर्षात (2010 मध्ये) 15 एकर व 2011 मध्ये 38 एकराची भर पड़ली. एकंदरीत वाडी  प्रकल्पासाठी सध्या १६८  एकर जमीन आहे.

वाईी प्रक्ल्पाच्या अंतर्गत झाडाची निगा राखण्यासाठी, पोषणासाठी 10-12 सदस्यांची उद्यान विकास समिती स्थापल्या गेली. अशा एकूण 14 उद्यान विकास समित्या स्थापन केल्या  गेल्या. गांवपातळीवर प्रत्येक उद्यान विकास समीतीसाठी एक अध्यक्ष, सचिव व  ट्रेझरर नेमण्यात आले समितीचे सदस्य महिन्यातून दोनदा एकत्र बैठक घेऊन पुढील कार्यक्रमाची आखणीबाबत चर्चा करीत असत. हयाच 14 उद्यान विकास समीत्यांना मिळून एक आम्रपाली स्वयंसहाय सहकारी संस्था तयार झाली .

आम्रपाली स्वयंसहाय्य सहकारी संस्थेचा इतिहास

सन 2009 मध्ये सुरुवातीला प्रथमच लावलेल्या झाडांची फळे तोडणीला सुरुवात झाली व सुमारे 400 क्विंटल फळांची तोडणी झाली. त्यावेळी सर्व उद्यान विकास समीतीच्या सदस्यांना पुढे मोठ्ठा प्रश्न होता की जर का 25 गांवातील वाडी प्रक्ल्पातून एवढी फळे निघाली तर त्यांच्या विक्रीसाठी बाजारपेठ कुठे मिळवायची? नंतर अशाच एका ब्लॉक पातळीवरील चर्चा सभेत शेतक-याची कोऑपरेटीव्ह काढण्याची कल्पना सुचविण्यांत आली. DULAL च्या मदतीने उद्यान विकास समीतीच्या सदस्यांनी को-ऑपरेटीव्ह तयार करण्यास अर्ज केला आणि लगेच 2010 मध्ये आम्रपाली कोऑपरेटिव्ह  ही नौंदनी झाली हया को-ऑपरेटीव्हला 200 एकर जमीनीवरील फळांची काढणी व हाताळणी करण्याची जबाबदारी देण्यात आली. सद्या ह्या संस्थेचे सदस्य 25 गावातील आहेत.

सन 2010 मध्ये अर्थात प्रथम वर्षात 40000 किलो आंब्याची विक्री करण्यास त्रास गेला परंतु याची विक्री जवळच्या गावातील बाजारपेठेत

सहकारी संस्था सदस्य कविरी व पँकिंग करताना

उदा. कारानजीया , सइरानपूर ,बारीपादा भुवनेश्वर इत्यादी ठिकाणी करण्यात आली तरीदेखील शेतकर्यांना उत्पादनाचा काही भाग दलालामार्फत विकावा लागला. नंतर लवकरच नाबार्ड  च्या सहाय्याने शेतक-यांना खाजारपेठेसाठी जागा मिळाली. नाबार्ड च्या ग्रामीण बाजारपेठ योजनेअंतर्गत जाशीपूर येथे दुकान सुरु करण्यात आले त्यासाठी फळांची काळजी घेण्यासाठी व विक्री करण्यासाठी कर्मचारी नेमण्यांत आले. हया ग्रामीण बाजारपेठेच्या स्थापनेमुळे शेतकरी व दलाल हयांची साखळी तुटल्या गेली. हळूहळू नाबार्ड  च्या सहाय्याने वाडी  प्रकल्पातील संपूर्ण जमीनीतून उत्पन्न होणा-या फळांना एकत्रित करण्यासाठी 15 लाख रुपयांची कर्ज रुपात आर्थिक मदत मिळाली

सर्व गावातील वाडी मधील फळपिकांच्या फळ धारणेच्या काळात उत्पनाचा अंदाज लावण्यात आला नंतर फळे काढणीनंतर गोळा करून प्रत्येक गावातील घरांमध्ये साठविले गेले. 2-3  दिवसानंतर ही फळे खोक्यात भरून ग्रामीण बाजारपेठेत ठेवण्यांत आली व फळांची खोकी जोशीपूर कार्यालयांत ठेवल्या गेली. येथून ही फळांची खोकी इतर वेगवेगळ्या बाजारपेठेत बसमधून पोहोचविण्यांत आली  या फळांची बाजारपेठेतून विक्री झाल्यानंतर आलेल्या रकमेचा शेतकर्यांसोबत बसून हिशोब पूर्ण करण्यात येतो .

अनुकुल परिणाम

सद्य:परिस्थितीत ही सहकारी संस्था स्वबळावर उभी आहे. हया कोऑपरेटीवच्या मार्फत विक्री होणारी फळे संपूर्ण सेंद्रिय असल्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते . येथे झाडांच्या वाढीसाठी कोणत्याही प्रकारचे रसायने वापरत नाही किंवा फळांना पिकविण्यासाठी कार्बाईड सारखे रसायनांचा वापर केल्या जात नाही. फळे पिकवितांना नैसर्गीक पध्दतींचा अवलंब केल्या जातो. उदा. झाडांच्या पाणांचा वापर केल्या जातो. इथे फळांसोबतच काजूचीदेखील विक्री केल्या जाते. शेतातून काढलेल्या काजूंना बऱ्हाणपूर  येथे पुढील संस्करणासाठी पाठविले जाते व त्यांची विक्री ग्रामीण बाजारपेठेत किंवा यात्रेत केली जाते. हया काजूंना त्यांनी मयुरी' असा ब्रँड दिला आहे. साधारणतः एका झाडापासून 2 किलो काजूचे उत्पन्न होते व ग्रामीण बाजारपेठेत 400-600 रूपये प्रति किलो हया दराने विकल्या जातो. सध्या आम्रपाली को-ऑपरेटीव्ह नी सरकारी बागेत उत्पन्न झालेल्या 16 टन आंब्याची विक्री करण्यास होकार दिला आहे. सरकारी बागेतून उत्पन्न झालेले आंबे मे महिन्यांत येतात (दशेरी आंबा) व वाडीतून येणारे आंबे जुन-जुलै मध्ये विक्रीस निघतात. त्यामुळे विक्री करतांना बाजारपेठेत स्पर्धा होत नाही. ग्रामीण बाजारपेठेत सध्या ब-याच वेगवेगळया पदार्थाची विकी क्हायला लागली आहे.

सहकारी संस्थेतर्फे विक्री होणारी फळे संपूर्ण सेंद्रिय असल्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते फळे पिकवण्यासाठी  कार्बाईड सारख्या कोणत्याही रसायनाचा वापर होत नाही. तर नैसर्गिक रित्या फळे पिकू दिली जातात. येथील लोक ब-यापैकी छोटे उद्योग करायला लागले आहेत. बचतगटातील महिलांना दुधापासून चिज, पनीर व इतर पदार्थ तयार करणे, लोणची तयार करणे हयावर प्रशिक्षण देण्यांत येत आहे. हया पदार्थाची विक्री स्टोर मध्ये केल्या जाते. त्यानी दोन कर्मचारी देखिल घेतले आहेत. वाडीसोबतच शेतक-यानी पिक पध्दतीत सुधारणा केली आहे. आंतरपिक पध्दतीचा वापर केवळ वाडीमध्येच नाही तर पिकांमध्ये उदा. ज्वारी , मका भाजीपाला डाळीमध्ये  सुध्दा सुरू झाला आहे. आंतरपिक पध्दतीमुळे शेतक-यांची आर्थिक आवक वाढली आहे. येथील एका शेतक-याने आंतरपिकपध्दतीतून आलेल्या पैशाने सोन्याची अंगठी केली व ती इतरास भेट दिली. तेव्हा त्याचे म्हणणे असे होते की 'मातीतून सोने निघते हे मी ऐकले होते, पण प्रत्यक्षात तसे होतांना आता बघतो आहे. वाडी प्रकल्पातील सदस्यांच्या नियमितपणे घेतल्या गेलेल्या चर्चा व सभेमुळे येथील सर्व शेतकरी एकत्र आहे असे येथील शेतक-यांचे मत आहे. सध्या येथे बरेच चर्चासत्र, सभेचे आयोजन केल्या जाते व शेतक-यांमध्ये जागरूकता आणल्या जाते. कोऑपरेटीव्ह चे सी.ई.ओ गर्वाने म्हणतात की, जेव्हा आम्ही हे काम सुरू केले होते तेव्हा आम्हाला ते शिकायला गुजरातला जावे लागायचे. परंतू सद्यःपरिस्थितीत इतर लोक आमच्या गांवात शिकायला येतात. सध्या येथून कोणीच शेतकरी शहराकडे स्थलांतर करीत नाही. पूर्ण वर्षभर आपल्या शेतीच्या कामात गुंतलेले असतात. वाडीतील झाडांनी हया शेतक-यांना गांवासोबत बांधून ठेवले आहे.

 

स्त्रोत - लीजा इंडिया

2.95454545455
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:40:2.329163 GMT+0530

T24 2019/10/17 05:40:2.336306 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:40:1.464930 GMT+0530

T612019/10/17 05:40:1.484794 GMT+0530

T622019/10/17 05:40:1.620780 GMT+0530

T632019/10/17 05:40:1.621752 GMT+0530