Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:57:31.996056 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / पीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात
शेअर करा

T3 2019/10/14 06:57:32.001734 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:57:32.032256 GMT+0530

पीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात

एकीकडे अनेक शेतकरी विषयक हवामान बदलाच्या संकटाशी झगडत आहेत तर अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील कुंभारवाडी या गावातील शेतक-यानी मात्र आपल्या पोक पद्धतीमध्ये बदल करून हवामान बदलाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

पीक विविधीकरणाद्वारे हवामान बदलावर मात

एकीकडे अनेक शेतकरी विषयक हवामान बदलाच्या संकटाशी झगडत आहेत तर अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील कुंभारवाडी या गावातील शेतक-यानी मात्र आपल्या पोक पद्धतीमध्ये बदल करून हवामान बदलाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. पिकांच्या या विविधतेमुळे पर्यावरण बदलाची व बाजाराची चिंता तर कमी झालीच पण कौटुंबीक पातळीवर विविध प्रकारच्या सकस अन्नाची उपलब्धता देखिल आपोआप निर्माण झाली.

गेल्या काही वर्षापासून शेतकरी हवामानात होणारा सततचा बदल अनुभवत आहे. उदा. उशिरा किंवा अवेळीचा पाऊस, पूर येणे किंवा वाढते तापमान इत्यादी. यासर्वांचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर दिसतोच आहे असेच एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात आकोली ब्लॉक मधील काही गावामध्ये दिसून आले. रब्बी हंगामात लावलेला चना व गहुपिकांचे नोव्हेंबर 2010 मध्ये आलेल्या मुसळधार पाण्याने असेच खुप नुकसान झाले. व जमिनीत साचलेल्या पाण्याने तेव्हा शेतक-यांनी डिसेंबर मध्ये पुन्हा पेरणी करुन पिके घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातही रबी हंगामाचे उत्पन्न 50% नी कमीच मिळाले.

त्याचप्रमाणे 2011च्या मे महीन्याच्या शेवटच्या आठवडयात आलेल्या मुसळधार पावसाने कापणीला आलेले बाजरी व भूईमूगाचे चे जवळजवळ 50% नुकसान झाले. त्याचप्रमाणे १ फेब्रूअरी 2012 मध्ये देखील हवामानाच्या बदलामुळे अंकुर आलेल्या भुईमुगाच्या बियाणांचे खूप नुकसान झाले म्हणूनच सध्याच्या काळात शेतकऱ्यांना हवामानात असलेल्या सततच्या बदलासोबत जुळवून घेऊन शेती करणे कठीण झाले आहे. सन 1996-2001 च्या दरम्यान महाराष्ट्राच्या ब-याच भांगामध्ये WOTR या स्वयंसेवी संस्थेने. इंडो-जर्मन पाणलोट विकास कार्यक्रम राबवला. त्या गावांमध्ये कुभांरवाडी गावाचा देखील समावेश होता. सन 2012 मध्ये आधारीत काही भागामध्ये प्रकल्प पुर्ण पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम संपल्यानंतर WOTR संस्थेने 2012 साली GIS च्या सहाय्याने कुंभार वाडी गावाच्या अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने वनस्पती व पीकपद्धतीचा समावेश होता. त्या वर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असताना असतील हे समजून घेण्यासाठी माहिती मिळवण्याची तीव्र इच्छा WOTR  संस्थेला झाली. गावामध्ये वेगवेगळय़ा कालावधीतील पिकांची माहीती मिळविण्यासाठी आम्ही तुलनात्मक पद्धतीचा अवलंब केला. पिकांची हि माहिती ३ वेगवेगळय़ा पर्वात म्हणजेच सन 1996, 2011ब 2012 प्रमाणे मांडली.

शेतकरी २०१२ च्या उन्हाळ्यात डाळींबाची शेती दाखविताना
सन 2012 मध्ये पिकांची जास्तीत जास्त विविधता समजुन घेण्यासाठी आम्ही सर्वेक्षण पध्दती अवलंबिली. ह्या सर्वेमध्ये ज्या शेतक-यांनी नगदी पिके ,फळवर्गीचे भाजीवर्गीय पिके व चारा वर्गीय पिके घ्यायला सुरवात केली आहे. अशा शेतक-यांचा समावेश करुन घेतला.त्याचप्रमाणे डाळ वर्गीय व इतर कडधान्य पिके घेण्याचा काही निवडक नमुना शेतक-यांना पण घेण्यात आले. एवढेच नाही तर आम्ही पिंक पध्दतीतील बदल करण्यामागे शेतक-यांचे विचार व त्यांचे अनुभव जाणण्यासाठी शेतकरी समुहासोबत चर्चा केल्या.

जलसंवर्धनातून पिकांची जैव विविधता

कुभांरवाडी गाव हे पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिंल्ह्यात संगमनेर तालुक्यापासून 45 की मी वर वसलेले आहे. या गावात जवळपास 145 घरे आहेत. ती वेगवेगळ्या वाड्यामध्ये विखूरलेली आहेत. शेती हा जरी प्रमुख व्यवसाय असला तरी घरोघरी दुधाचा जोडधंदा पहावयास मिळतो व पर्यायाने दुभती जनावरे पाळण्याचा त्यांचा दुय्यम व्यवसाय आहे.

कुंभारवाडी गाव हे महाराष्ट्राच्या कमी पर्जन्य असलेल्या क्षेत्रात येते. हया भागात दुष्काळाचे प्रमाण नेहमीच जास्त असते.(सरासरी 500 मि.मि) सन 1996 मध्ये इंडोजर्मन पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यापुर्वी त्या क्षेत्रात फत दोनच पिके घेण्यात यायची, बाजरा खरीप मध्ये व ज्वारी रखी मध्ये. सोबत थोड्या प्रमाणात मटकी, मुग,चना, उस (चाच्यासाठा) घेतला जायचा. सपुर्ण325.5हेक्टर जमीनीत कोरडवाहुपिके घेण्यात यायची व त्यापैकी हेक्टर 66 हेक्टर जमीन मोकळी सोडण्यात यायची. खरीपमध्ये 168 हेक्टर जमीनीत बाजरा घेण्यात यायचे. व रब्बी हंगामात 149 हेक्टरवर ज्वारी घेतली जायची. ही

सर्व पीके शेतकरी स्वतःच्या कुंटुंबाच्या पोषणासाठी घ्यायचे. गहुपिक घेण्याचे कधी त्यांनी ऐकले सुध्दा नव्हते.

सन 2002 पासून म्हणजेच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यानंतरच्या काळात पाण्याची पातळी वाढली त्यामुळे शेतकर्यांनी नगदी पिके उदा. गहू, टमाटर, कांदा अशा सारखी पिके घेण्यास सुरुवात केली. आमच्या अभ्यासादरम्यान असे दिसून आले की सन 2011 मध्ये वार्षिक पर्जन्यमान साधारण होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात खारीपच्या पेरणीच्या वेळी व सप्टेंबर महिन्याच्या मध्यानात (रब्बी पेरणी वेळी) चांगले पर्जन्य मान होते.

चांगले पर्जन्यामानामुळे संपूर्ण ४१४.७५ हेक्टर मध्ये हे घेण्यात आली. शेतकर्यांनी जवळजवळ १५ पिके घेतली. खरीपात बाजरा (४० हेक्टर मध्ये घेतला. कांदा, टमाटर, सोयाबीन, जास्तीत जास्त क्षेत्रात घेतले. रब्बी हंगामात सुमारे ८० हेक्टर मध्ये गहू ज्वारी ६० हेक्टर मध्ये टमाटर व कांदा मुख्य पिक म्हणून घेतले गेले . उन्हाळ्यात सुदधा शेतकऱ्यांनी १० हेक्टर मध्ये टमाटर घेतले व २५ हेक्टर मध्ये चारा घेतला याशिवाय तिन्ही हंगामात त्यांनी जवळजवळ चार डाळवर्गीय पिके व काही भाजीवर्गीय पिके घेतली . काही शेतकऱ्यांनी डाळींबाच्या शेतीला सुरवात केली.

अल्पपर्जन्यामानाशी जुळवून घेणे

सन 2012 चे पर्जन्यमान हे सन 2011 पेक्षा कमीच होते. सन 2012 मध्ये सपुर्ण पाऊस पडण्याचे (पर्जन्यवृष्टीचे) 60 दिवस होते व 2011 मध्ये हेच 86 वर होते. त्यामध्ये ही विविधता होतीच. तसेच दोन पावसामध्ये बरेच अंतर होते. सन 2012  मध्ये खरिपात पेरणीसाठी चांगला पाऊस जुलै 2012 मध्ये सुरु झाला. आणि रब्बी मध्ये पेरणीसाठी उशिरा पाऊसाचे आगमन-सप्टेंबरच्या शेवटच्या 3भाठवड़यात व ऑक्ट्रोबरच्या पहील्या आठवड्यात  झाले. पावसाच्या बदलत्या अंदाजामुळे  शेतक-यांचा पिके निवड करण्याबाबतच्या  कल वेगवेगळा होता. पर्जन्यमान कमी असुन सुध्दा शेतकरी वेगवेगळी पिके घेवू शकले. शेतक-यांनी जवळजवळ 318 हेक्टर जमिनीत तिन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेतली. अंदाजे 24 प्रकारची पिके घेण्यात आली. हयामध्ये द्वीदल डाळ वर्गीय पिके , एकदलीय पिके , भाजीवर्गीय पिके , चारावर्गीय , फळझाडे , कापूस यांचा समावेश होता .सर्वात महत्वाचे हे कि ज्वारीचे पिक हे १४२ हेक्टर जमिनीवर घेण्यात आले जे कि  सन 2011 पेक्षा दुपटीने वाढले.

पावसाच्या प्रमाण तुलनेने कमी असताना सुद्धा कुभांर वाडीचे शेतकरी 24 प्रकारची पिके घेऊ शकले.

सन 2012 च्या खरिपातील कमी पर्जन्यमानामुळे व उशिरा आलेल्या मान्सूनमुळे बाजरा जवळपास 2011 च्या दुप्पट क्षेत्रात घेतल्या गेला. खरिप व रबी हंगामात आपण पिके घेवू शकू की नाही अशी त्यांना शंका होती. त्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी धान्य हवे होते .म्हणून बाजरासोबत त्यांनी थोडे मटकी , मुग,सोयाबीन  टमाटर, वाटाणा ही पिके घेतली. शेतक-यांच्या मते खरिपात मूग केल्यास रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पन्न वाढते . काही शेतकऱ्यांनी कापूस पिकासोबत ताग लावून प्रयोग केला. ताग हिरवळीच्या खतसाठी शेतात वाढवून त्याचा मातीची आर्दता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी वापर केला. त्यांच्यामते वेळेवर पाऊस न आल्यामुळे सन हिम्पची झाडे आच्छादनासाठी तयार झालेली नाही म्हणून त्यांच्या बिजासाठी त्यांना वाढवीत होते .

सन 2012 मध्ये पाणी कमी असल्यामुळे ज्वारीचे पिक फक्त कुटुंबासाठीच घेतले शेतकऱ्यांचे मते फक्त एक पूस पडला तरी ज्वारीचे पिक हमखास होते  आणि जर पाऊस नाहीच पडला तरी जनावरांसाठी चारा होतोच. या पिकांच्या उरलेल्या अवशेषांना सुध्दा चांगले भाव मिळतात. गहुघेणारया शेतक-याच्या मते पाण्याची एक पाळी जरी कमी पडली तरी गव्हाचे पीक हातचे जाते. हवामानातील किवा तापमानातील थोडा ही बदल झाला तरी गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो

शेतकऱ्यांनी ज्वारीसोबतच डाळवर्गीय पिके व तेलबियांची पिके घेतली  त्यांच्या मते तुरीला पाणी कमी लागते व बाजारपेठेत चांगली किंमत मिळते तसेच पिकाचे उरलेले अवशेष जनावरांच्या चारयासाठी वापरता येतात. शेतक-यांच्या मते तूर पिकला वाढत्या तापमानाचा फायदा मिळतो . तसेच किडींचा प्रादुर्भाव देखील कमी असतो  काही शेतकऱ्यांनी चना पिक सुमारे ८ हेक्टर जमिनीत कुटुंबासाठी घेतले गहू पिकाच्या तुलनेत चना पिकला पाणी कमी लागते . गव्हाला सुमारे ७ – ८ पाळ्या दयाव्या लागतात तर चना पिकला १ -२ पाळ्या मध्ये चं पिक येत . यासोबतच  थोड्याप्रमाणात टमाटर व कांदा पिकासोबत पत्ताकोबी,भेंडी व मिरची कुटुंबासाठी व बाजारात विक्रीसाठी घेतली

उन्हाळी पिकापासून मिळत असलेली नकदी आवक बघुन काही प्रगत शेतकरी हयाकडे आकर्षित झाले. त्यांच्या पाठोपाठ इतर काही शेतकरी देखील आले. टमाटर  व कांदा पिकाला पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे हि पिके कमी जमिनीत घेतले गेले. त्याऐवजी त्यांनी मका, गाजर, उस व चारयाची  पिके घेतली मक्याचे पिक जवळजवळ १० हेक्टर वरून २३ हेक्टर क्षेत्रात काढले . पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमापुर्वी फळबागा कुठेच नव्हत्या, आता त्या लागवडीला सुरुवात झाली. सन 2012 मध्ये डाळींबाची शेती कमी पाऊस असुनही 10 हेक्टर क्षेत्रात केली. शेतक-यांच्या मते पाऊस जरी कमी पडला तरी डाळींबाला ड्रीप नी पाणी दिल्यास पाण्याची बचत होते व डाळिंबाला बाजारपेठेत चांगली मागणी व किंमत आहे, डाळिंब पिके जास्त तापमानात चांगले येते. इतर पिकांपेक्षा डाळींब पिकाला मजुरी पण कमी लागते जे की शेतक-याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याच दरम्यान आंबा लागवड सुरू केली व केवळ तसेच 0.33 हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड केली फळबागेला पाणी देण्यासाठी तीन शेतकरी मिळून  (ज्यांच्याकडे फळबाग व इतर उन्हाळी पिके आहेत) मार्च - मे 2012 दरम्यान एकुण रु 80000 गुंतवुन 50 टॅकरची सोय करुन घेतली.

गावामध्ये गाई-जनावरांची संख्या एकुण 156 होती त्यात क्रॉस बिड गाई पण होत्या. त्यांच्यापासून रोजचे 500 लीटर दूध मिळायचे. हया उन्हाळयात पाणी कमी असल्याने दूष्काळी वातावरणचा दुधाच्या उत्पादनावर परिणाम होवून रोजचे उत्पादन 350 लीटर वर आले. शेतक-यांच्या मते जास्त तापमानाचा गाईच्या दुध देण्यावर परिणाम होतोच. अशा परिस्थितीत शेतकरी गाईंना सतत अंघोळ घालून त्यांचे शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करत होते  त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होत होती. गुरांसाठी हिरवा चारा ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती. त्यासाठी शेतक-यांनी मका व ज्वारीचे देशी बाण कडवळ लावले ह्या  पिकांना पाणी कमीच लागते.  शेतकऱ्यांनी गुरांना गाजराच्या पिकांच्या उरलेला अवशेष आणि उसाचे पाचट खाऊ घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचे दुध देण्याचे प्रमाण नक्कीच वाढते.अ शी त्यांची भावना

जैवविविधता  विविध गरजांची पूर्तता

पिकांचे उत्पादन घेतेवेळी कुटुंबाच्या गरजा प्रथमतः लक्षात घेतल्या गेल्या. ज्या शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पिके घेतली त्यांनी कुटुंबासाठी पुरेसे ठेवून बाकी उरलेली थोडी डाळीची विक्री केली . तसेच ज्यांनी एक दलीय पिक घेतले त्यांनी प्रथम स्वतःसाठी ठेवले फक्त संपूर्ण सोयाबीचे उत्पादन विक्रीसाठी ठेवले तसेच  भुईमुग पिक सुध्दा कुंटुंबाच्या गरजेसाठी ठेवले. सन 2012 मध्ये ज्या शेतक-यांनी भाजीपाला व नकदी पिके घेतली ती सुध्दा प्रथम कुटुंबासाठी प्रथम  ठेवले तागाच्या बीजाच्या विक्रीतून काही आवक झाली ज्या शेतकऱ्यांनी कापुस लावला होता त्यानं जवळजवळ 4000 रु. प्रती क्विंटल  असा फायदा झाला. म्हणुनच हया दुष्काळ काळातही पिकांची जैवविविधता कायम ठेवल्याने अन्न व पोषण सुरक्षा साधता आली. तसेच गावामध्ये काही आवक पण साधता आली. (खालील टेबल 1 पहावा)

पिकेशेतकरी क्षेत्र(हे) एकूण उत्पादन कुटुंबासाठी बाजारपेठ
बाजरा 13 1.58 5800 5800 0
ज्वारी 14 2.04 440 440 0
गहू 5 0.88 400 400 0
डाळवर्गीय व तेल बिया पिके
सोयाबीन 4 0.60 25 25 0
मुग 5 0.50 400 200 200
सोयाबीन 1 0.10 80 0 80
तूर 18 3.63 3370 860 2500
भुईमुग 3 1.45 200 200 0
चना 5 1.09 175 175 0
नगदी पिके ब भाजी पिके
पत्ताकोबी 1 0.29 100 10 90
भेंडी 4 0.10 200 5 195
कांदा 11 1.83 2100 340 1760
टमाटर 10 2.33 44400 100 44300
वाटणा 3 0.40 125 0 125
मिरची 9 0.90 310 60 250

कापूस

 

5 0.89 1280 0 1280
सन हिम्प 1 0.19 400 25 375

अनुमान

पाणलोटक्षेत्र विकास प्रकल्पाने शेतक-यांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांच्या विविध गरजा पुर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या उगमांचा योग्य वापर करुन शेतात प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळाले. दूष्काळी परिस्थितीत देखील शेतक-यांचा पांरपारीक पिकांकडे कल होता. स्वतःच्या कुंटुंबाच्या साठी अन्न सुरक्षा व चाच्यांची गरज हयांना प्रथम महत्व देऊन आर्थिक आवकेकडे ही लक्ष दिले गेले. पाणलोट प्रकल्पाने गावामध्ये पाण्याची उपलब्धता वाढवलीच जमिनीची उत्पादकता वाढवली तसेच शेतकरयांची हिम्मत देखील वाढवली दुष्काळ परिस्थितीतही कुंभार वाडीच्या शेतकरयाची प्रयोग करण्याची व शिकण्याची उत्सुकता यावरून त्यांची योग्य निर्णय क्षमता दिसून आली . जर शाश्वत शेती पध्दतीत कूषितंत्राचा सल्ला योग्य रीतीने पुरविला तर हवामानाच्या बदलत्या स्वरुपात व प्रतिकुल परिस्थतीतही शेतकरी विश्वासाने आत्मनिर्भर राहू शकतो.

 

स्त्रोत - लीजा इंडिया

2.95
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:57:32.679962 GMT+0530

T24 2019/10/14 06:57:32.686461 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:57:31.831609 GMT+0530

T612019/10/14 06:57:31.850349 GMT+0530

T622019/10/14 06:57:31.985150 GMT+0530

T632019/10/14 06:57:31.986176 GMT+0530