Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 17:35:0.133817 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / शेतकऱ्याने घेतले भाजीपाल्‍याचे उत्‍पादन
शेअर करा

T3 2019/06/24 17:35:0.139892 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 17:35:0.172899 GMT+0530

शेतकऱ्याने घेतले भाजीपाल्‍याचे उत्‍पादन

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्‍त महाराष्‍ट्र’ करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्‍यात जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्‍यास सुरवात केली.

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्‍त महाराष्‍ट्र’ करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्‍यात जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्‍यास सुरवात केली. या अभियानांतर्गत झालेल्‍या कामामुळे वर्धा जिल्‍ह्यात 37 हजार 559 द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण झाला असून या पाण्‍याचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी भाजीपाल्‍याचे उत्‍पादन घेऊन दोन ते तीन लाख रुपये अधिक नफा कमावला आहे.

वर्धा जिल्‍ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत 212 गावाची निवड करण्‍यात आली होती. शेताशिवारात नवीन बंधाऱ्‍यांची निर्मिती, जुन्‍या बंधाऱ्यांचे खोलीकरण व दुरुस्‍ती, शेततळे, नाला खोलीकरण, रिचार्ज शाप्‍ट यासारख्‍या कामामुळे ठिकठिकाणी जलसाठे निर्माण झाले.

यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पाण्‍याचा उपयोग झाला. त्‍याचबरोबर काही शेतकऱ्यांनी पर ड्राप मोअर क्रॉप या म्‍हणीप्रमाणे ठिबक सिंचनाचा वापर करून भाजीपाल्‍याचे उत्‍पादन घेणे सुरु केले. समुद्रपूर तालुक्‍यातील वायगाव (हळदया) या गावातील वासुदेव घुं‍बळे या शेतकऱ्याने शेतालगतच्‍या बंधाऱ्यातील पाणी वापरुन फुलकोबी, टोमॅटो आणि हळदीचे पीक घेतले.

यापूर्वी ते केवळ पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून शेती करायचे. परिणामी, उत्‍पादन मर्यादित होते. आता मात्र जलयुक्‍त शिवारमुळे रब्‍बी सोबतच घुंबळे भाजीपाल्‍याचेही पीक घेत आहे. यामुळे वर्षाकाठी दोन ते तीन लाख रुपयाचे उत्‍पन्‍न वाढले असल्‍याचे घुंबळे सांगतात. वर्धा जिल्‍ह्यात जलयुक्‍त शिवार अभियान ही आता लोक चळवळ झाली असून या अभियानामुळे रब्‍बी पिकाच्‍या लागवडीमध्‍येही 23 ते 25 टक्‍के वाढ झाल्‍याचे जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

 

माहिती संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा

स्त्रोत - महान्युज

2.80769230769
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 17:35:1.038462 GMT+0530

T24 2019/06/24 17:35:1.045544 GMT+0530
Back to top

T12019/06/24 17:34:59.926409 GMT+0530

T612019/06/24 17:34:59.957069 GMT+0530

T622019/06/24 17:35:0.121623 GMT+0530

T632019/06/24 17:35:0.122584 GMT+0530