Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/01/22 17:33:57.267707 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / मजगीमुळे शेती उत्पादन चौपट
शेअर करा

T3 2018/01/22 17:33:57.273038 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/01/22 17:33:57.301850 GMT+0530

मजगीमुळे शेती उत्पादन चौपट

कृषि विभागाचा सल्ला व मार्गदर्शन घेतल्याने शेती उत्पादनात भरीव वाढ होते. याची अनुभूती नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील शिवनी गावच्या सुरेश धोंडबाजी महल्ले या शेतकऱ्याला आले.

कृषि विभागाचा सल्ला व मार्गदर्शन घेतल्याने शेती उत्पादनात भरीव वाढ होते. याची अनुभूती नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील शिवनी गावच्या सुरेश धोंडबाजी महल्ले या शेतकऱ्याला आले. यापूर्वी सोयाबीन आणि हरबरा ही पिके तो घेत होता. शासनाच्या कृषि विभागाच्या गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम शिवनी, चिखली, निंबा गावच्या शिवारात राबविण्यात आला. आता हे शेतकरी धानाच्या पिकाबरोबर, भाजीपाला, गहू-हरबरा फूल शेतीचे नगदी पीक घेवू लागल्याने त्यांच्या शेती उत्पादनात चौपट वाढ झाल्याचे सुरेश महल्ले आत्म विश्वासाने सांगतात.

बदलत्या परिस्थितीनुसार शेतीमध्येही आता व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले आहे. योग्य व्यवस्थापन करुन पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पाणलोट संकल्पने अंतर्गत लाईव्ह चेक डॅम, लुज बोल्डर स्टॅचर, दगडी बांध, गॅबियम बंधारे, शेततळे, सिमेंट नाला बांध, मजगी ग्रेडेड बेडींग यासारखी मृदसंधारणाची कामे कृषि विभागाने हाती घेतली. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत अडविले व मुरविले यातून शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता आली.

या पाणलोटाचे एकूण भौगोलिक 889.58 हेक्टर असून पाणलोटाची 2010 मध्ये कामे पूर्ण झाली होती. त्याचा लाभ सुरेश महल्ले या शेतकऱ्याने अचूक उचलला. मजगीची कामे केल्यामुळे भूपिक जमीन वाहून जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीचा पोत उंचावला. सहाजिकच शेती उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत झाल्याचे सुरेश महल्ले आत्मविश्वासाने सांगतात.

निंबा गावचे नरेंद्र बोंबाळे यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला. त्यांच्याही शेती उत्पादनात भरीव वाढ झालेली ते सांगतात. बोंबळे यांनी उताराच्या दिशेला वाहून जाणारी माती व पाणी अडविले त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. यापूर्वीचे सोयाबीन हरबरा याचे केवळ 5/6 क्विंटल एवढे उत्पन्न मिळत होते. वर्षाचा शेतीचा खर्च वजा जाता शिल्लक काहीच पडत नव्हते. मृसंधारणाची कामे केल्यानंतर शेतामध्ये ते सोयाबीन इगल-11 व धान करिश्मा ही पिके आता घेत आहेत. सोयाबीनचे 8-9 क्विंटल हेक्टरी तर धानाचे 25-26 क्विंटल हेक्टरी घेत आहेत. त्याच्या जोडीला गहू लोकवण आणि हरभरा विजय या वाणाचे पिके, भाजीपाला ही खात्रीची शेती उत्पादन ते घेत आहेत. खर्च वजा जाता 50,000/- रुपयांचा निव्वळ फायदा होत असल्याचे बोंबळे अभिमानाने सांगतात.

लेखक : हंबीरराव देशमुख

स्त्रोत: महान्यूज

2.9387755102
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2018/01/22 17:33:57.873435 GMT+0530

T24 2018/01/22 17:33:57.880588 GMT+0530
Back to top

T12018/01/22 17:33:57.118915 GMT+0530

T612018/01/22 17:33:57.137471 GMT+0530

T622018/01/22 17:33:57.257356 GMT+0530

T632018/01/22 17:33:57.258199 GMT+0530