Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 01:55:13.610917 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / साखळी, आंतरपीक पद्धती
शेअर करा

T3 2019/06/17 01:55:13.616544 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 01:55:13.647201 GMT+0530

साखळी, आंतरपीक पद्धती

मध्यम प्रतीच्या शेतीत कमी कालावधीची पिके साखळी पद्धतीने घेऊन तसेच आंतरपीक पद्धती राबवून किफायतशीर उत्पादन व उत्पन्नाचे तंत्र साधले आहे.

पुणे ते बंगळूर महामार्गावर काशीळपासून पश्‍चिमेस सहा किलोमीटरवर पाल गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री खंडोबा देवस्थान याच गावात आहे. गावच्या शेतीचे संपूर्ण क्षेत्र मध्यम प्रतीचे आहे. शेतीत ऊस, आले, झेंडू या मुख्य पिकांबरोबर भाजीपाला पीक पद्धत आहे. तारळी नदीवरील सिंचन व विहिरीद्वारा समप्रमाणात गावच्या शेतीला पाणी मिळते. गावातील संजय बाबासाहेब गोरे अलीकडील दहा वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीतच प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे आले आहेत.

गोरे यांची पीक पद्धती

गोरे यांची वडिलोपार्जित 12 एकर शेती. खरेदी आठ एकर व खंड स्वरूपाने 10 एकर अशा एकूण 30 एकर शेतीचे ते व्यवस्थापन सांभाळतात. थोरले बंधू दयानंद सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात प्रशासन विभागात नोकरीस आहेत. ते रविवारी संजय यांना शेतीत मदत करतात. गोरे यांच्याकडे 10 महिला व दोन मजूर बारमाही कार्यरत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत त्यांनी आले, पपई पिकात झेंडू व पपईच्या आंतरपिकावर भर दिला आहे. शेतीत साखळी पद्धती राबवल्याने आर्थिक नफा कमावणे शक्‍य झाले आहे. सध्या त्यांच्याकडे आडसाली ऊस, आले, कलिंगड, सोयाबीन, पपई व झेंडू अशी पीक पद्धत आहे.

आल्यात पपई व झेंडू तसेच पपईतही झेंडू आहे. पपईतील झेंडूची सध्या काढणी सुरू आहे. पपई व झेंडू पिकाची साखळी पद्धतीने लागवडी करून त्याद्वारा मुख्य पीक ऊस व आल्याचे निव्वळ उत्पन्न हाती घेण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. झेंडूचे पीक फेरपालट म्हणून घेतले जाते. ऊस व आले पिकातून उत्पादन मिळेपर्यंत झेंडू व पपईतून टप्प्याटप्प्याने उत्पन्न सुरू ठेवण्याचा गोरे यांचा प्रयत्न राहिला आहे. झेंडू व पपईच्या उत्पन्नातून बियाणे, खते व आंतरमशागतीचा खर्च पेलला जातो. यंदा 5 मे, 10 मे व 25 मे अशी पाण्याच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने आले लागवड केली आहे. आल्यात झेंडूची लागवड आहे. त्याच प्लॉटमध्ये दोन ओळींमधील अंतर नऊ फूट ठेवून पपई लागवड केली आहेपीक पद्धतीच्या बदलास सुरवातसन 1995 मध्ये बीए झाल्यानंतर नोकरी न करता गोरे शेतीकडे वळले.

सुरवातीला प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. प्रायोगिक तत्त्वावर थोडक्‍या क्षेत्रात आले घेतले. उत्पन्न वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीला बगल देत 2002 मध्ये सूक्ष्म सिंचनाद्वारा आले पिकाची बेडवर (गादीवाफा) लागवड केली. एक एकर क्षेत्रात 20 गाड्यांचे (प्रति गाडी 500 किलो) उत्पादन मिळाले. अडीच लाख रुपयांचा नफा मिळाला. तेथून शेतीत नवे तंत्रज्ञान व पीकबदल या बाबींचा अवलंब सुरू केला. शेताला नदीवरील सिंचन व विहिरीचे पाणी मिळते. नदीपासून वडिलोपार्जित क्षेत्र आठ हजार फूट अंतरावर असल्यामुळे पाइपलाइन करताना सुरवातीला तीन हजार फुटांपर्यंत पाइपलाइन करून त्याशेजारील चार एकर क्षेत्र खंडस्वरूपाने घेतले. त्यात टोमॅटो, वांगी, आले व ऊस ही पिके घेतली. मिळालेल्या उत्पन्नातून पुढे दोन हजार फूट पाइपलाइन केली. त्या टप्प्यात वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र पिकाखाली आले. पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर कमी कालावधीची पीक पद्धत सुरू केली.

श्री. गोरे यांच्या शेतीच्या ठळक बाबी

 • पूर्णतः कुजलेल्या शेणखताचा अधिक वापर.
 • आले पीक लागवडीपूर्वी एकरी 15 ट्रेलर शेणखत, दहा टन साखर कारखान्यातील मळी, एक टन निंबोळी व करंजी पेंड एकत्रित मिश्रण करून बेसल डोस
 • बीजप्रक्रियेद्वारा आले लागवड.
 • कंदमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर
 • आल्यात झेंडू घेतल्याने किडींचे प्रमाण कमी राहते. झेंडूची सापळा पद्धतीनेही लागवड.
 • झेंडू व पपईतील उत्पन्नातून काही प्रमाणात आले व ऊस या पिकांतील आंतरमशागतीचा खर्च पेलला जातो. यामुळे आले व ऊस शेती किफायतशीर होते.
 • आल्यात ठिबक व तुषार सिंचनाचा दुहेरी वापर. सप्टेंबर-ऑक्‍टोबरमधील वाढत्या उष्णतामानात आले पीक तग धरत नाही. अशा वेळी तुषार सिंचनाद्वारा जमिनीतील ओलावा टिकवतात.
 • करपा व कंदमाशीचा प्रादुर्भाव टाळण्याचे प्रयत्न.
 • सर्व क्षेत्रांत ठिबक सिंचनाचा अवलंब
 • किडींच्या नियंत्रणासाठी फवारणीसह ड्रेंचिंगचाही वापर

  श्री. गोरे यांच्याकडून शिकण्यासारखे

  • शेतीच्या कामांबाबत वेळेला अधिक महत्त्व
  • सेंद्रिय खतांचा अधिक वापर. रासायनिक खतांचा संतुलित वापर
  • हल्ली तरुणवर्ग नोकरीकडे झुकत आहे. नोकरीएवढा वेळ शेतीसाठी दिला तर शेतीतून तेवढे उत्पन्न मिळणे शक्‍य आहे. ही बाब शिकायला मिळते.
  • सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मार्गावर गावालगत तसेच इंजाई देवी मंदिर मार्गावर भाविकांसाठी मोफत पाणपोई उभारल्या.

  शेतीचे सुधारले अर्थशास्त्र

   गेल्या वर्षी सात एकरांत आले पिकातून पहिल्या टप्प्यात 55 टन उत्पादन मिळाले. उत्पादित मालाची मुंबई बाजारपेठेत विक्री केली. त्यास प्रतिटन 60 हजार रुपये दर मिळाला. आंतरपिक झेंडूतून एकरी सव्वादोन टन उत्पादन मिळाले. त्यास प्रति किलो सरासरी 35 रुपये दर मिळाला. पाच लाख 51 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. बारा एकर लागवड व खोडवा उसाचे एकूण 750 टन उत्पादन मिळाले.

   दर वर्षी तीन टप्प्यांत झेंडू लागवड होते. सध्या चार एकर पपईतील झेंडूच्या दोन तोड्यांपासून 92 क्रेट (प्रति क्रेट 12 किलो) माल उत्पादित झाला. त्यास दादर (मुंबई) येथील मार्केटला प्रति किलो सरासरी 60 रुपये दर मिळाला. दीड एकरात मार्च 2014 मध्ये कोलकता वाणाच्या झेंडूची लागवड केली. आतापर्यंत 15 टन माल उत्पादित झाला. त्यास प्रति किलो 30 रुपये दर मिळाला. गोरे यांना

    

  संजय गोरे - 9657719915.

  स्त्रोत: अग्रोवन

   

  3.16949152542
  आपल्या सूचना पोस्ट करा

  (वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

  Enter the word
  नेवीगेशन

  T5 2019/06/17 01:55:14.290164 GMT+0530

  T24 2019/06/17 01:55:14.296558 GMT+0530
  Back to top

  T12019/06/17 01:55:13.421893 GMT+0530

  T612019/06/17 01:55:13.441382 GMT+0530

  T622019/06/17 01:55:13.600039 GMT+0530

  T632019/06/17 01:55:13.601040 GMT+0530