Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:49:11.669340 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / सोयाबीनचे बीजोत्पादन
शेअर करा

T3 2019/10/14 07:49:11.675184 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:49:11.705885 GMT+0530

सोयाबीनचे बीजोत्पादन

सांगली जिल्ह्यातील राडेवाडी (ता. पलूस) येथील तरुण शेतकरी प्रशांत भानुदास पाटील यांनी सोयाबीन शेतीत व त्यातही बीजोत्पादनात आपला हातखंडा तयार केला आहे.

सांगली जिल्ह्यातील राडेवाडी (ता. पलूस) येथील तरुण शेतकरी प्रशांत भानुदास पाटील यांनी सोयाबीन शेतीत व त्यातही बीजोत्पादनात आपला हातखंडा तयार केला आहे. चांगल्या उत्पादनात सातत्य ठेवताना यंदाच्या वर्षी 30 गुंठ्यांत त्यांनी केळीतील सोयाबीनच्या आंतरपिकातून 21 क्विंटल बीजोत्पादन घेतले आहे.

व्हायचे होते अधिकारी, बनले शेतकरी

सांगली जिल्ह्यात वाळवा- तासगाव रस्त्यावरून जाताना अंकलखोप गावच्या उत्तरेला राडेवाडी हे छोटेसे गाव लागते. येथील प्रशांत पाटील यांची वडिलोपार्जित साडेपाच एकर जमीन आहे. वडील सहकार खात्यात नोकरीस होते, त्यामुळे मुलांनी शिकून नोकरी करावी, अशी त्यांची मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे सरळ भावना होती. प्रशांत यांनी बी.एस्सी., बी.ए., जीडीसी ऍण्ड ए असे शिक्षण पूर्ण केले. काही काळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. कोल्हापूर येथे "आयएएस' परीक्षेचे प्रशिक्षणही घेतले; परंतु मूळ शेतीची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे नोकरी ही संकल्पना सोडून पूर्णवेळ शेतकरीच होण्याचे प्रशांत यांनी ठरवले.

पीक स्पर्धांमधून सहभाग

शेतीत पूर्णवेळ झोकून देऊन काम करताना प्रशांत यांनी उत्पादनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. जे काही करायचे ते मनापासून, असे ठरवल्यानंतर त्यात कोणतीही उणीव राखली नाही. 
सन 2004-05 - सोयाबीन पीक स्पर्धा - तालुक्‍यात दुसरा क्रमांक 
सन 2005-06 - गहू व 08-09 - हरभरा - तालुक्‍यात प्रथम क्रमांक 
सन 2007-08 - गहू - राज्य पीक स्पर्धेत सहभाग

शास्त्रज्ञ काय म्हणाले?

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कसबे डिग्रज संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. कटमाळे व सोयाबीन पैदासकार डॉ. एम. बी. देशमुख यांचे मार्गदर्शन प्रशांत पाटील यांना लाभले आहे. डॉ. देशमुख म्हणाले, की प्रशांत हे अभ्यासू शेतकरी आहेत. "फ्रंटलाइन डेमॉन्स्ट्रेशन'अंतर्गत त्यांच्याकडे आम्ही सोयाबीनचा प्रात्यक्षिक प्रयोग केला आहे. लागवडीचे विस्तृत अंतर, ठिबक सिंचन, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण आदी घटकांचा सक्षम वापर करीत पिकाची योग्य काळजी घेतली आहे. त्यामुळेच अधिक उत्पादनापर्यंत पोचणे त्यांना शक्‍य झाले आहे.

पीक उत्पादनातील आदर्श - प्रशांत पाटील

सन 2005 पासून बागायत पद्धतीत नेहमीच्या सोयाबीनचे व बीजोत्पादनासाठीच्या सोयाबीनचे उत्पादन प्रशांत घेतात. 
नेहमीच्या सोयाबीनचे पूर्वी एकरी 14 क्विंटल उत्पादन मिळायचे. आता ते 16 ते 18 क्विंटलपर्यंत मिळते. 
सन 2011 मध्ये जे. एस. 335 वाणाचे एकरी 21 क्विंटल उत्पादन मिळाले. 
सोयाबीनला दर चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळतो. उत्पादन खर्च एकरी 15 हजार रुपयांपर्यंत येतो. 
बीजोत्पादनासाठी काही कामे वाढत असल्याने मजुरी वाढून हाच खर्च 20 ते 25 हजार रुपयांपर्यंतही होतो. 
बियाणे कंपनीसाठी बीजोत्पादन असल्यास क्विंटलला पाच हजार रुपये दर मिळतो. 
केळीचे एकरी 60 टन उत्पादनाचे टार्गेट ठेवले आहे.

प्रशांत यांनी दिल्या सोयाबीन पिकातील टिप्स

बीजोत्पादनातून नफा चांगला मिळतो; परंतु जोखीम महत्त्वाची असते. सुरवातीपासून काळजीपूर्वक कामे करावी लागतात. 
बीजप्रक्रिया महत्त्वाची. पीएसबी व रायझोबियम जिवाणुसंवर्धकांचा वापर महत्त्वाचा. 
जमिनीची उत्तम मशागत हवी. 
पाण्याचे उत्तम नियोजन हवे. सरी भिजवून ओलावा ठेवूनच टोकण. 
कीड नियंत्रण काळजीपूर्वक हवे. 
विद्राव्य खतांचा वापर केला. 
दाणेदार गंधकाचा वापर गरजेचा. 
बेसल डोस - एकरी चार पोती एसएसपी, पाच किलो दाणेदार गंधक, एक पोते निंबोळी पेंड 
शंका येतील तेथे तज्ज्ञांचे तत्काळ मार्गदर्शन घेणे 
यंदाच्या प्रयोगात केळीला बसवलेले ड्रीप सोयाबीनसाठीही वापरले, त्याचा फायदा झाल्याचे प्रशांत म्हणाले. 
किडी- रोगांपासून बियाणे वाचवायला लागते, वाळवून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे. विकण्याआधी उगवण क्षमता तपासावी. 
दर तीन वर्षांनी माती परीक्षण केले जाते. 
संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन. 
गांडूळ खताची तीन युनिट. 
पाच ते सहा घरची जनावरे, त्यामुळे वर्षाला शेणखत उपलब्ध. त्यांचे मूत्र ठिबकद्वारे पिकांना दिले जाते. 
शेतीतील उत्पन्नातून 70 गुंठे जमिनीची खरेदी. पाइपलाइन, गोठा बांधणी ही कामे पूर्ण.

शास्त्रज्ञांनी केली वाहवा!

प्रशांत यांच्या शेतीस 100 हून अधिकांनी भेटी दिल्या आहेत. शास्त्रज्ञ- अधिकाऱ्यांत भारतीय कृषी संशोधन केंद्राचे (पुसा- नवी दिल्ली) डॉ. हनचंददास, डॉ. एस. के. लाल, जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ. आर. के. वर्मा, डॉ. एम. पी. देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, आत्मा प्रकल्पाचे शिवाजीराव शेळके, तालुका कृषी अधिकारी ए. वाय. पठाण, अस्लम शेख आदींचा समावेश आहे. 
पुरस्काराने सन्मानित
सन 2011 मध्ये नेहमीच्या सोयाबीनचे एकरी 21 क्विंटल उत्पादन घेतल्याबद्दल मुंबई येथील प्रसिद्ध "दि सॉल्वंट एक्‍स्ट्रॅक्‍टर्स असोसिएशन ऑफ इंडिया' संस्थेने रोख 25 हजार व सन्मानचिन्ह देऊन प्रशांत यांना गौरवले आहे. भारतातून दोन शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला गेला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री थॉमस यांच्या हस्ते त्यांनी तो स्वीकारला.


माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

3.07692307692
पुरुषोत्तम गोळे May 06, 2017 07:15 PM

सोयाबीन फुले अग्रणी वाना बाबत माहीती

शिनदे Nov 09, 2015 07:00 PM

सोयाबीनचे नवीन वान सुचवा जे, स.३३५ सोडुन

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:49:12.515759 GMT+0530

T24 2019/10/14 07:49:12.521759 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:49:11.509331 GMT+0530

T612019/10/14 07:49:11.528411 GMT+0530

T622019/10/14 07:49:11.658434 GMT+0530

T632019/10/14 07:49:11.659328 GMT+0530