Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:50:18.953338 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / कारल्याची गोड कहाणी
शेअर करा

T3 2019/10/14 06:50:18.958806 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:50:18.990087 GMT+0530

कारल्याची गोड कहाणी

पंजाबातील एका अभ्यासूवृत्तीच्या शेतकऱ्याने निवड पद्धतीने कारल्याची जात विकसित केली आहे. या जातीचे विपणन तो स्वतःच करतो.

पंजाबातील एका अभ्यासूवृत्तीच्या शेतकऱ्याने निवड पद्धतीने कारल्याची जात विकसित केली आहे. या जातीचे विपणन तो स्वतःच करतो. ही जात लोकप्रिय करताना हेक्‍टरी दोन लाखांचा निव्वळ नफाही त्याने घेतला आहे. शेतकऱ्यांमध्येही संशोधक वृत्ती दडलेली असतेच. गरज असते ती योग्य वेळी त्याची दखल घ्यायची व जगासमोर ते संशोधन आणण्याची. भारतीय कृषी संशोधन परिषदेने अशाच काही होतकरू शेतकऱ्यांचे प्रयोग वा संशोधनकौशल्य जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

कारल्याच्या वन्य जातीचा शोध

दलिप सिंग हे त्यातील एका पंजाबी शेतकऱ्याचे नाव आहे. फरिदकोट जिल्ह्यातील कोथे रामसर या गावचे ते रहिवासी आहेत. दलिप सिंग यांचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे, त्यांची यशस्वी कारले शेती. कारल्याची एक स्थानिक जात या भागात आढळते. वालुकामय भागात असलेल्या या वन्य जातीचा शोध दलिप सिंग यांना लागला. मधुमेह विकारासाठी ही जात गुणकारी म्हणून ओळखली जाते. या जातीचे व्यावसायिक मूल्य वाढवण्याचे दलिप सिंग यांनी ठरवले.

पंजाबातील दक्षिण-पश्‍चिम भागात आढळणाऱ्या वन्य जातीचे बियाणे त्यांनी गोळा करायला सुरवात केली. बियाण्यासाठी ते अगदी राजस्थानातही भटकले. त्यानंतर निवड पद्धतीने कारल्याची एक जातच दलिप सिंग यांनी विकसित केली. "झार केरला' या नावाने ओळखली जाणारी ही जात दलिप सिंग आता पाच वर्षांपासून घेऊ लागले आहेत. या जातीच्या वेलांना आधार देण्यासाठी बांबूच्या काठ्यांचा उपयोग करण्यात आला आहे.

कारल्याचे विपणन

विशेष म्हणजे झार केरला या जातीपासून प्रति हेक्‍टरी 75 क्विंटल उत्पादन ते घेतात. या कारल्याचे विपणन (मार्केटिंग) स्वतः दलिप सिंग करतात. त्यांनी एक, दोन व पाच किलो अशा पॅकिंगमधून हे कारले उपलब्ध केले असून, परिसरातील बाजारपेठांमधून त्याची विक्री होते. सन 2009-10 मध्ये या कारल्याला प्रति क्विंटल पाच हजार रुपये दर मिळाला. एक हेक्‍टर क्षेत्रात त्यांनी पावणेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. खर्च वजा जाता त्यांना हेक्‍टरी दोन लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. आपण स्वतः विकसित केलेल्या जातीला दलिप सिंग यांनी अशा रीतीने लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केलाच, शिवाय आपली आर्थिक प्रगतीही त्यातून साधली.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

2.84482758621
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:50:19.624099 GMT+0530

T24 2019/10/14 06:50:19.630471 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:50:18.792274 GMT+0530

T612019/10/14 06:50:18.812773 GMT+0530

T622019/10/14 06:50:18.942990 GMT+0530

T632019/10/14 06:50:18.943849 GMT+0530