অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीम उद्योगातील सूत्रे

महाराष्ट्र हे रेशीम उद्योगातील अपारंपरिक राज्य असून या उद्योगामध्ये दिवसेंदिवस संधी निर्माण होत आहेत. राज्यातील कोष उत्पादन १३१८.८ में.टन इतके आहे. यातील ५० टक्के उत्पादन औरंगाबाद विभागातील असून मनरेगा प्रकल्प लागू झाल्यामुळे औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतकरी सुखावला आहे. मात्र, राज्यातील इतर भागांमध्येही रेशीम उद्योगात वाढ होण्याची गरज आहे. रेशीम उद्योगात यशस्वी होण्यासाठी महत्त्चाची तीन सूत्रे आहेत. या तीन सूत्रांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्यास हा उद्योग १०० टक्के यशस्वी होऊ शकतो.


लागवड

पाण्याचा उत्तम निचरा होणारी कमीत कमी तीन फूट खोलीची काळी जमीन निवडावी. जी-४ अथवा व्ही-१ जातीची चार × दीड फूट अंतरावर लागवड़ करून एकरी (9 हजार २00 झाड़े तयार होतात.

शेड कसे असावे

२२ × ५० फूट लोखंडी कैचीचे रॅक कम शेड आणि ३५ × ५ फुटांचे चार टायरचे दोन रॅक तयार करावेत. वरील पत्रे व बाजूला शेड़नेट असे कुलूपबंद शेड़ असाचे.

खत व पाणी व्यवस्थापन

प्रति झाड़ प्रति दिक्स दोन लिटर मागणीसूत्र पाणी व्यवस्थापनात वापराचे. प्रति वर्षी दहा ट्रॉल्या शेणखत (किंवा धरणातील गाळ) व माती परीक्षणानुसार प्रति वर्षी रासायनिक खत व सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरल्यास एका झाडाला सहज वर जाणारे १५ फुटचे तयार होतील व सकस पाला तयार होईल.

शेडमधील वातावरण

तिन्ही ऋतूंमध्ये संगोपनकाळात शेङमधील आर्द्रता ८० ते ८५ टक्के व तापमान २६° ते ३०° से दरम्यान असावे. यासाठी रुम हीटर व ह्युमिडिटी फायर या म्हैसूर संशोधित उपकरणांचा वापर कराचा किंवा गोणपाट ओले करून नेटच्या आतमधून बांधावे.

बाग व्यवस्थापन

चंद्रिका टाकणे ते कोष वेचणे या चार दिवसांत वापरलेल्या बगिचातील जास्तीच्या शिल्लक राहिलेल्या फांद्या व संपूर्ण पाने काढून कटिंग करावे व फणकटून जारवा तोडून पाणी द्यावे. रासायनिक खते फुटचे अर्धा फुटाची असताना द्यावीत. बागेतील २ हजार ४२o झाडे या प्रमाणात तीन भाग करून पिकाचे टप्प्याटप्याने नियोजन करावे.


बागेतील ज्या टप्प्यातील फुटचे अडीच फुटांचे झाले त्या वेळी चॉकी सेंटरमध्ये अंडीपुंजांचे ब्राशिंग होईल, अशी मागणी नोंदवावी. यासाठी २५०० फुटचे बरोबर एक किंटल कोष हे सूत्र जेणेकरून कोषाच्या उत्पादनात सुसूत्रता येऊन उत्पन्नात वाढ होईल; अन्यथा नियोजन चुकल्यास शेवटच्या टप्प्यात पाला कमी पडून एकूण उत्पन्नात घट होईल.

वरील प्रमाणबद्धतेनुसार एकरी अंतिम पाला उत्पादकता वार्षिक २१ क्रॅिटल कोष उत्पादन घेण्यास उपयुक्त आहे, हे लक्षात येईल. त्याचे कोषात रुपांतर करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी वरील तक्त्याचा काळजीपूर्वक वापर करावा. यातील किमान ५० टक्के उत्पादन घेणा-या शैतक-यांसाठी रेशीम शैती मासिक चैतनाचे चांगले साधन होऊन होऊ शकते.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate