অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेती - अंदमान निकोबारची

शेतकरी बंधुनो दिनांक २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१६ दरम्यान पोर्टब्लेअर, अंदमान येथे एकात्मिक शेतीपध्दती बाबत प्रशिक्षणास जाण्याची संधी मला मिळाली. त्या निमीत्ताने तेथील शेती व इतर तदनुषंगीक बाबीची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. अंदमान-नेिकोबार सन १९५0 साली भारताचा भाग बनला. सन १९५६ मध्ये तो केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. ह्य प्रदेश बंगालच्या उपसागरात कोलकता पासून १२५५ कि.मी., विशाखापट्टणपासून ११९o किं.मी. तर चेन्नईपासून साधारणतः ११९० कि.मी. अंतरावर सुमारे ५७२ छोट्या-मोठ्या बेटांचा आहे. उत्तर अंदमान हा ब्रम्हदेशपासून १९० कि.मी. तर दक्षिणेतील निकोबार बेटावरील इंदिरा पाँईंट इंडोनेशियापासून सुमारे १५० कि.मी. अंतरावर आहे. उत्तर गोलार्धातील ६ ते १४ अंश अक्षांश व ९२ ते १४ अंश पूर्व रेखांशमध्ये जवळपास ७०० किं.मी. लांबीचा आणि २४ ते ५८ कि.मी. रुंदीचा ह्या द्वीपकल्प आहे. रामायणामध्ये संदर्भ सापडत असलेल्या या बेटांपैकी केवळ ३६ बेटांवर मानवी वस्ती आहे.

अंदमान व निकोबार बेटे समुद्राने विभागली असून त्यामधील भागास १o डिग्री चॅनेल असे म्हणतात. जवळपास १५o किं.मी. रुंदींचा हा चॅनेल असून यातून जहाजांची आवक-जावक होते. जैवविविधतेने नटलेला हा निसर्गरम्य भूभाग उत्तर व मध्य अंदमान, दक्षिण अंदमान व निकोबार या तीन जिल्ह्यांमध्ये विभागला आहे. मायाबंदर, पोर्टब्लेअर व कारनिकोबार या ठिकाणी या जिल्ह्यांची मुख्यालये आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या ट्दिपकल्पास अनन्यसाधारण महत्व आहे. पोर्टब्लेअर ही या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असून तेथे चेन्नई, कोलकता, विशाखापट्टणम व इतर ठिकाणाहूनही हवाई वाहतूक सुविधा आहेत. साधारणतः हवाई प्रवासासाठी २ तास लागतात तर चेन्नई व कोलकता येथून समुद्रमार्गे जहाजाने या ठिंकाणी जाता येते. मात्र यासाठी साधारणत: ५२ तासांचा कालावधी लागतो. ८.२५ लाख हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या भूभागावर ८६ टक्के जंगल आहे.

सन १९०१ मध्ये २४६४९ लोकसंख्या असलेल्या 2 या प्रदेशाची सन २०११ ची लोकसंख्या पुरुष - २.0२,३३g (५३ टक्के) तर स्त्रीया- १,७७,६१४ : (४७ टक्के) अशी आहे. ८६ टक्के साक्षरता असलेल्या : या भूभागावर जारवा, ग्रेट अंदमानीज अशा जवळपास ६ नीग्रेटो व मॅगोलियन वंशाच्या आदिम जमाती असून ` पूर्वी हजारात असलेली काही जमातीची लोकसंख्या ` आता शेकड्यात येऊन श्रांबली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानुसार आता त्यांची संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात येत असून सामान्य माणसांना त्यांना ' भेटण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. भारतीयांना अंदमानची खरी ओळख सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यापासून झाली. इंग्रजांनी वीर सावरकरांसहित अनेक स्वातंत्र्य योध्दयांना येथे दिर्घकाळ बंदिवासात ठेवले. समुद्राने वेढलेली ही छोटी-मोठी बेटे एका अर्थाने खुली कारागृहेच होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक वीरांच्या मरणप्राय यातना व अमानुष मृत्यू या भूमीने पाहिले आहेत. म्हणून सेल्युलर जेल हे आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.

इतिहासात येथील मुळ आदिवासी जमातीवर देखील खूप अत्याचार झाले. दुस-या महायुध्दाच्या दरम्यान मार्च १९४३ मध्ये जपानने येथील इंग्रजांचे मुख्यालय असलेल्या रॉस आयलंडवर ताबा मिळविल्यानंतर ३0 डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच भूमीवर भारताचा तिरंगा प्रथमतः फडकावला.

नंतर १९४५ मध्ये इंग्रजांनी या भूभागाचा पुनश्च: ताबा मिळविला. जगातील जैवविविधतेचा ठेवा असलेला हा भूभाग सुंदर समुद्रकिनारे, केरल, रंगबिरंगी मासे, फुलपाखरे, खारफुटीची जंगले, लाईमस्टोन गुफा, जागृत ज्वालामुखीचे ठिकाण, स्कुबा ड्रायव्हींग, समुद्र तळावर चालणे, इत्यादी अनेक जलक्रिडांसाठी जागतिक पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथील शेतीचा इतिहास केवळ २00 वर्षे जुना आहे.

मुळनिवासी शिकार व जंगलातील फळांच्या सहाय्याने उदरनिर्वाह करत असत. १७७९ साली चाटम या ठिकाणी आधुनिक पध्दतीने सुरु केलेला शेतीचा प्रकल्प स्थानिक आदिवासींच्या उपद्रवामुळे लवकरच बंद पडला. सन १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बंदींना अंदमानला आणल्यानंतर त्यांचे पुर्नवसनांतर्गत त्यांना २ हे भात क्षेत्र किंवा २ हे. जंगल उताराची जमीन व 0.४0 हे घर व तदनुषंगिक बाबींसाठी देण्यात आले.

बंगाल, तमिळनाडू व भारतातील अन्य ठिकाणावरुन आलेल्या हिंदू मुस्लीम, बौध्द, शीख समुहातील लोकांनी येथे शेती करण्यास सुरुवात केली. येथे हिंदू६९ टक्के, ख्रिश्चन-२२ टक्के तर मुस्लिमधर्मिय लोकसंख्या-९ टक्के आहे तर हिंदी, इंग्रजी, बंगाली, तेलगू, तामिळ, मल्याळम् व निकोबारी भाषा येथे बोलल्या जातात.

हवामान

उष्णकटिबंधीय वातावरण असून दैनंदिन सरासरी अधिकतम तापमान २९ ते ३२ अंश से. तर किंमान ` तापमान २२ ते २४ अंश से. दरम्यान असते. उष्ण व आर्दतयुक्त वातावरणात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान | सरासरी २९og मि.मी. पाऊस पडतो. सरासरी I १४३ दिवस पावसाचे असून जानेवारी ते एप्रिल दरम्यान उन्हाळा असतो. या कालावधीत पाऊस | पडत नसल्याने पाण्याची टंचाई भासते. जमिनीचा  उतार ५ ते ४५ टक्के दरम्यान असून जलसंधारणाला  मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत. शेततळी व छोट्या बंधान्यांच्या माध्यमातून जलसंधारणावर भर देण्यात येत आहे.

पिके

भात, मका, तूर, मूग, उडीद, भेंडी , टोमॅटो, कारले. भोपळा, कोबी, पिकांखाली सुमारे ४३,000 हे. क्षेत्र असून भात पिकाखाली ८००० हे. तर भाजीपाल्याखाली ६००० हे. तसेच नारळाखाली २२००० हे. आणि सुपारीखाली ४२oo हे. सर्वसाधारण क्षेत्र आहे. जगभरातील नारळाच्या जातींचे येथे संकलन असून जगातील ३० पैकी ६ प्रजातींचे उगमस्थान अंदमान-निकोबार बेटे आहेत.

येथे जवळपास २१,३३९ शेतकरी असून त्यांची सरासरी जमिनधारणा १.८९ हे आहे. मोठ्या प्रमाणावरील पाऊस, तीव्र उतार यामुळे जर्मनी आम्लधर्मी असून सामू ६ पेक्षा कमी असल्याने मातीत नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच तांबे, मंगल, जस्त, मॉलिब्डेनम, सल्फर इत्यादी अन्नद्रव्यांची कमतरता आहे. भाताचे सरासरी उत्पादन २९oo केिलो प्रतेि हेक्टर आहे. यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. मात्र नारळ येथे नैसर्गेिकरित्या वाढ्त असून शेतकरी फक्त पडलेले नारळ गोळा करुन विकतात. योग्य व्यवस्थापनाअभावी उत्पादकता खुप कमी आहे. विखुरलेली बेटे, संचार साधनांची कमतरता, बाजारपेठेचा अभाव, यंत्रसामुग्री, कृषेि नेिविष्ठांचा अभाव यामुळे शेती व्यवसायाला पुरेशी चालना मिळालेली नाही. कोलकता, चेन्नई येथून शेतीउत्पादनाच्या मोठ्या प्रमाणावर होणा-या आयातीवर येथील अन्नसुरक्षा निर्भर आहे. रासायनिक खतांचा वापर २५ केिली प्रति हेक्टर आहे.

आता या ठिकाणी हरितगृह, शेडनेटहाऊस, सुक्ष्म सिंचन, प्लॅस्टक आच्छादन, सेंद्रीय शेती, एकात्मिक शेती पध्दती अंतर्गत रुंद सरी वरंबे पध्दतीने भाजीपाल्याची लागवड यावर भर दिला जात आहे. याचबरोबर नारळ, सुपारी बागांच्या व्यवस्थापनाबरोबरच मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ या आंतरपीक पध्दतीसाठी येथील कृषि विभाग व संशोधन केंद्र मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. शेतमालावर प्रक्रिया अत्यंत कमी असून याबाबत देखील शासन प्रयत्न करत आहे. भातशेतीत कडेने चर खोदून त्यात मत्स्यपालन, बांधावर गिरीपुष्याची लागवड, शेततळयामध्ये रोहू, कष्टला, मृगल माशांचे उत्पादन घेण्याबरोबरच बांधावर केळीची लागवड करुन कोंबडीपालन, वराहपालनाच्या माध्यमातून शेतीस जोडधंदा विकसित होत आहे. शेतकरी कृषि पर्यटन सारख्या सुविधा निर्मितीबाबत उत्सुक असून त्यादृष्टीने देखील येथे नवनविन प्रकल्प हाती घेतले जात आहेत. या ठिकाणी पूर्वी सर्व क्षेत्र जंगलाखाली होते, पुनर्वसन योजनेंतर्गत लोकांना २ हे. जमीन ही जंगल साफ करुन देण्यात आली. मात्र आत्ता जंगल तोडण्यावर बंदी असल्याने नविन लागवडीलायक क्षेत्र निर्मितीवर मर्यादा असल्याने उपलब्ध क्षेत्रातूनच अधिकाधिक उत्पादन काढण्यावर येथील शासनाने भर दिला आहे.

वन्यजीव व हवामान बदल

८६ टक्क्याहून अधिक क्षेत्र वनांखाली असून देशातील १७ टक्क्यांहून अधिक खारफुटीचे जंगल येथे आहे. जंगली डुकर मोठ्याप्रमाणावर असून हरिण व इतर तृणभक्षी प्राणी आहेत. वाघ, सिंह, बिबट्यासारखी श्वापदे येथे नाहीत. लाकुड वाहतुकीसाठी आणलेले हती आता सर्वोच्च न्यायालयाने जंगलतोड प्रतिबंधीत केल्यामुळे मोकळे झाल्याने ते आता जंगली झाले आहेत. जपानी सैनिकांना खाण्यासाठी आणलेल्या गोगलगाईचा शेतीपेिकात आता मोठ्याप्रमाणावर उपद्रव होत आहे. डॉल्फन, शार्क, टूना, व्हेल, मगर, कासव यांसारखे असंख्य जलचर येथे विपुल प्रमाणात असून समुद्र कोरल, रंगबेरंगी माशांनी समृध्द आहे. २६ डिसेंबर २oo४ रोजीच्या सुनामीमुळे जवळपास ६000 ते ७000 हे क्षेत्र समुद्राच्या पाण्यामुळे नापीक झाले. समुद्रातील पाण्याच्या वाढत्या तापमानामुळे कोरल्सचे नुकसान होत असून निकोबार बेटे समुद्र सपाटीपासून अत्यंत कमी उंचीवर असल्याने हवामान बदलाचा मोठा परिणाम येथे जाणवत आहे. त्यादृष्टीने हा भूभाग अतिसंवेदनशील आहे.

कृषि संशोधन व विस्तार

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या अनेक संशोधन केंद्रापैकी कॅरीcCAR| (सेंट्रल कोस्टल अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट) हे एक अत्यंत महत्वाचे संशोधन केंद्र आहे.भारत देशातील जवळपास ९ राज्यांमधील ७२ जिल्ह्यांमध्ये ७५१७ कि.मी. लांबीचे समुद्रतटीय क्षेत्र असून तेथील शेतीविषयक संशोधन करणारी ही एकमेव संस्था आहे.

पोर्टब्लेअर या राजधानीच्या ठिकाणी दिनांक २३ जून १९४८ रोजी कॅरी संशोधन संस्थेची गाराचरमा या ठिकाणी ६२ हे. क्षेत्रावर स्थापना झाली. या संशोधन केंद्राच्या स्थापनेपूर्वी या दिपावर केंद्रीय समुद्रमत्स्य संशोधन संस्था, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, भारतीय कृषेि संशोधन संस्था, केंद्रीय लागवड पिके संशोधन संस्था अशा विविध संस्था स्वतंत्रप्रेित्या कार्यरत होत्या. कॅरी संस्थेच्या स्थापनेनंतर या सर्व संस्था बंद करून त्यांचे विषयातील संशोधन कार्य या संस्थेमार्फत पुढे चालू ठेवण्यात आले.

कॅरी संस्थेच्या पोर्टब्लेअर येथील मुख्यालयाव्यतिरिक्त सिप्पी घाट (३२ हे.), ब्ल्युमडेल (३.५ हे.) या ठिकाणी संशोधन उपकेंद्र कार्यरत आहेत. या शिवाय सिप्पी घाट, कारनिकोबार व निंबुडेरा या ठिकाणी कृषि विज्ञान केंद्र कार्यस्त असून संशोधन केंद्रीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न तें करत आहेत.

सन १९४५ मध्ये येथे कृषि विभागाची स्थापना झाली. येथील कृषि विभागात संचालक ते कृषेि सहाय्यकापर्यंत जवळपास १७५ ते २oo लोक काम करतात. मात्र भौगोलिक स्थितीमुळे येथे काम करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. कॅरी संस्थेने आतापर्यंत अंदमान-निकोबार या जैवविविधतेने नटलेल्या क्षेत्रातील विविध फळांच्या-५३, भाज्यांच्या-७७, फुलांच्या-३. कंदपिकांच्या- ३३ लागवड पिकांच्या -३६ आणि औषधी वनस्पतींच्या -३६ जातींचे जर्मप्लाझम संरक्षित करण्याचे महत्वाचे काम केले आहे.

कोरलच्या रांगा व खारफुर्टी जैवविविधतेच्या माहितीचे संकलन येथे असून अंदमान नारळ, निकोबारी बटाटा, खूनफळ, निळा आंबा, नोनी, सुवासिक तांदूळ, काळा बुर्मा, मुशेली, सफेद बुर्मा, निकोबारी बदक, निकोबारी डुकर, स्थानिक अंदमान मलबारी शेळी, तेरेसा शेळी या स्थानेिक प्रजातींची प्रथमतःच नोंदणी संस्थेने केली आहे तर काही जातींना भौगोलिक मानांकन देखील मिळाले आहे. कॅरी संस्थेने भाताच्या ९ जाती वेिकसित केल्या आहेत, वांग्याची काळी वांगी-१, नारळाच्या कारी अन्नपूर्णा, सुर्या, ओंकार, चंदन अशा ४ बुटक्या जाती, रताळ्याच्या २ जाती अशा अनेक नवीन जाती लागवडीसाठी प्रसारित केल्या असून नारळाची कारी अन्नपूर्णा ही बुटकी जात घन पध्दतीने लागवडीसाठी अतिशय उत्कृष्ट आहे. या व्यतिरिक्त ग्रीनऑर्किंडची लेिमका बूक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली. याम, कोर्थीबीर, पोई, तांदूळ्जा यासारख्या विविध जाती संशोधित केल्या असून दिर्पीका ही सफेद निकोबारी व वनराजा यांच्या संकरातून निर्माण केलेली कोंबडीची नवीन जात आहे. महत्वपूर्ण म्हणजे क्षारयुक्त जमिनीत चिंकूच्या लागवडीसाठी स्बर (c0|l0phyllum in0py|lum) मुळकांड म्हणून वापरण्याचे महत्वपूर्ण संशोधन केले आहे.

नोनी (Morinda cirifolia) हि अत्यंत उपयुक्त औषधी आहे. या फळझाडाच्या संजीवनी, संपदा, समृध्दी व रक्षक अशा चार जाती लागवडीसाठी प्रसारित केल्या आहेत. या व्यतिरिक्त भात, नारळ, सुपारी, औषधी सुगंधी वनस्पती, भाजीपाला, फुलशेती, मत्स्यशेती, पशुपालन, कुक्कुटपालन व एकात्मिक शेती पध्दतीवर संस्थेने महत्वपूर्ण संशोधन केले असून अंदमान निकोबारसह समुद्रतटीय क्षेत्रातील कृषि विकासाला महत्वाचे योगदान देत आहे.

कृषि क्षेत्राचा या प्रदेशाच्या सकल उत्पन्नातील वाटा जरी ९ ते १o टक्के दरम्यान असला तरी या ठिकाणची वाढणारी लोकसंख्या व पर्यटन व्यवसाच्या माध्यमातून येथे भेट देणारे लोक यांच्या गरजा भागविण्यासाठी येथे शेती उत्पादनांची मोठया प्रमाणावर मागणी आहे. स्थानेिक बाजारपेठेत मध्यम दजांची द्राक्ष, डाळींब, कलिंगड़ाची या ठिकाणी रु. २५0 तें रु.300 प्रतेि केिलों या दराने विक्री होत आहे. भाजीपाला देखील ८0 तें १00 रुपये केिलो दराने येथे विक्री होती. बिगर मॉसमाप्त या पेक्षाहीं अधिक किंमतीने या ठिकाणच्या रहिवाश्यांना शेतमाल खरेदी करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी नियंत्रित पध्दतीने शेती उत्पादनाबरोबरच निर्यातीच्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्याचा लाभ आपल्या राज्यातील शेतकरी देखील घेऊ शकतात.

 

संपर्क क्र. १४0४९६३८७0

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate