Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:03:1.346315 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:03:1.351923 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:03:1.380592 GMT+0530

औषधी वनस्पती रोपवाटिका

भारतात वनस्पतिजन्य औषधी व औषधी वनस्पतीच्या कच्च्या मालांची वार्षिक सुमारे ३००० कोटींचा उलाढाल आहे.

भारतात वनस्पतिजन्य औषधी व औषधी वनस्पतीच्या कच्च्या मालांची वार्षिक सुमारे ३००० कोटींचा उलाढाल आहे. जंगल हे औषधी वनस्पतीचे नैसर्गिक भांडार आहे. औषधी वनस्पतीपैकी ९o टक्के वनस्पती ह्या जंगलातूनच गोळा केल्या जातात. त्यापैकी सुमारे ४८ टक्के वनस्पती औषधी निर्मितीसाठी समूळ उपटल्या जातात. त्यामुळे सर्पगंधा, सफेद मुसळी, अनंतमुळ, शतावरी, खाजकुहिली, स्तचंदन आदी वनस्पती दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे येणा-या काळात या औषधी वनस्पतींचे महत्व वाढत जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांना या औषधी वनस्पती रोपवाटीका लागवडीतून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

रोपवाटिका लागवड

वनौषधीची लागवड करण्यासाठी रोपांची, बियाण्याची अथवा लागवड योग्य वनस्पतीच्या भागांची रोपवाटिकेमध्ये निर्मिती करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रजातीची निवड, त्याची मागणी, दर इत्यादी माहिती असणे गरजेचे आहे. औषधी वनौषधीची वेगळी रोपवाटिका स्थापन करणे आवश्यक आहे.

आवश्यक गोष्टी

  1. ठिकाण: या भागात मोठ्या प्रमाणावर वनौषधी लागवड होत आहे. अशा ठिकाणापासून मध्यवर्ती ठिकाणी रोपवाटिका असावी. रोपवाटिकेत त्या भागातील मागणीनुसार वेगवेगळ्या प्रजातीची रोपे तयार करावी.
  2. क्षेत्र : निच-याची जमीन निवडावी, उतार १ ते ३ टक्के असावा.
  3. पाणी व्यवस्थापण : रोपवाटीकेच्या ठिकाणी बारमाही पाणी पुरवठा असावा. तसेच पाण्याची टाकी, तुषार सिंचन इत्यादी असावे.
  4. कुशल मजूर : बिजप्रक्रीया, कलम बांधणे, कंदाचे विभाजन करणे, पिशव्या भरणे, पाणी देणे ही कामे कुशल मजुरांकडून करावी.
  5. संसाधने : रोपवाटिकेसाठी या साधनांची गरज भासते. त्यामध्ये चांगली पोयटामाती, वाळू, खते, बियाणे, मातृवृक्ष, ट्रॅक्टर, असणे आवश्यक आहे.
  6. प्रजातीची निवड : प्रजातीची निवड करतेवेळी स्थानिक मागणी असलेल्या जातीची निवड करावी. रोपवाटिकेमध्ये त्या हवामानात होणा-या प्रजातीची निवड करणे गरजेचे आहे. सध्या वनौषधीची लागवड व्यापारी तत्त्वावर होत आहे त्याचप्रमाणे रोपवाटिका व्यवसायसुद्धा व्यापारी तत्वावर करणे गरजेचे आहे. या वनस्पतीची मुळे औषधात वापरली जातात. त्या वनस्पती वारंवार लावल्या जातात, तसेच हंगामी वनस्पतीसुद्धा वारंवार लावल्या लागतात अशा वनस्पतीची मागणी जास्त आहे.परंतु बहुवार्षिक वृक्षांची पाने औषधात वापरली जातात अशा वनस्पतीची मागणी कमी असते.
अ.नं.प्रजातीचे नाव वाढीचा प्रकार औषधी भाग पुनरुत्पादन आवश्यक बीजप्रक्रिया रोपवाटिका तंत्र
बेल वृक्ष फळे/पाने बिया व कलमापासून ताजे बिया पेराव्यात पिशवीतील रोपे
अर्जुन वृक्ष झाडाची साल बियांपासून बिया २४ तास थंड पाण्यात ठेवणे पिशवीतील रोपे
बहावा वृक्ष शेंगा बियांपासून बिया उकळल्या पाण्यात ५ मिनिट व थंड पाण्यात बुडविणे पिशवीतील रोपे
हिरडा वृक्ष फळे बियांपासून बिया ३६ तास थंड पाण्यात बुडविणे पिशवीतील रोपे
आश्वगंधा हंगामी वनस्पती मूळ बियांपासून डायथेन एम -४५ पावडर ३ ग्रॅम प्रती किलो बियास चोळावे गादी वाफ्यावर रोपे करणे
काळमेघ हंगामी वनस्पती पंचांग बियांपासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
वेखंड हंगामी वनस्पती मूळ कंदाने प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे

तुळस हंगामी वनस्पती पंचांग बियांपासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
ब्राह्मी हंगामी वनस्पती पंचांग/पाने बिया व खोडापासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
१० सफेद मुसळी हंगामी वनस्पती मूळ कंद विभाजनाने गादी वाफ्यावर रोपे
११ काटे रिंगणी हंगामी वनस्पती पंचांग बियांपासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही गादी वाफ्यावर रोपे
१२ कोरफड बहुवार्षिक वनस्पती पाने मुळापासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही गादी वाफ्यावर रोपे
१३ शतावरी शतावरी कंद बी व कंदाद्वारे प्रक्रिया करणे आवश्यक नाही गादी वाफ्यावर रोपे
१४ पुनर्नवा हंगामी वनस्पती मूळ बियांपासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
१५ अनंतमूळ बहुवार्षिक वेल मूळ बियांपासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही गादी वाफ्यावर रोपे
१६ खाजकुहिली हंगामी वेल बिया बियांपासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही गादी वाफ्यावर रोपे
१७ गुळवेल बहुवार्षिक वेल खोड बिया व छाट कलम प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
१८ पिंपळी बहुवार्षिक वेल मूळ मूळखोडाद्वारे प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
१९ गुडमार बहुवार्षिक वेल खोड,पाने बियांपासून प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
२० जेष्ठमध क्षुप खोड,मूळ
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
२१ मालकांगणी बहुवार्षिक वेल बिया
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे

 

२२

मंजिष्ठा हंगामी वेल खोड
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
२३ सोनामुखी क्षुप बी /पाने
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
२४ बकुळ वृक्ष साल/बियांचे तेल
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही गादी वाफ्यावर रोपे
करणे २५ बिबळा वृक्ष साल,फुले
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
२६ शिवन वृक्ष मुल,फुले
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
२७ सोनचाफा वृक्ष फुले बियांपासून तेल
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे

२८

टेटू वृक्ष मूळ
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे
२९ सर्पगंधा वृक्ष मुळ
बियांपासून
प्रक्रिया करणे आवश्यक नाही पिशवीतील रोपे

रोपनीर्मित व रोपांची उपलब्धता

वृक्ष वेली व झुडपे एकाच क्षेत्रात लावण्यायोग्य प्रजाती शेतकरयाना एकाच ठिकाणी मिळू शकतील.राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पात वर नमूद केलेल्या औषधी वनस्पतींची रोपे उपलब्ध आहेत.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

3.05555555556
मिलिंद चिंतामण रोकडे May 10, 2019 01:38 AM

पिवळ्या फूलांच्या बहावाची बियांपासून लागवड कशी करावी ?
कृपया सविस्तर कळवावे.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:03:1.565677 GMT+0530

T24 2019/10/18 04:03:1.572405 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:03:1.290074 GMT+0530

T612019/10/18 04:03:1.307905 GMT+0530

T622019/10/18 04:03:1.335735 GMT+0530

T632019/10/18 04:03:1.336551 GMT+0530