Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 02:29:33.895003 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/17 02:29:33.900752 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 02:29:33.931345 GMT+0530

कवठ

कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रूटेसी कुलातील असून फेरोनिया एलेफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सामान्यपणे इंग्रजीत या वृक्षाला कर्ड फ्रूट किंवा मंकी फ्रूट असे म्हणतात.

कवक : वृक्ष व फळे कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रूटेसी कुलातील असून फेरोनिया एलेफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सामान्यपणे इंग्रजीत या वृक्षाला कर्ड फ्रूट किंवा मंकी फ्रूट असे म्हणतात. याचा प्रसार मुख्यत्वे आशियामध्ये पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार, जावा इ. प्रदेशांत आहे. ह्या काटेरी व पानझडी वृक्षाचे मूलस्थान दक्षिण भारत आहे. कवठाचे झाड ६-९ मी. उंच वाढते. खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते. पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. फुले लहान, फिकट लाल व आखूड देठांची असून फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर येतात. फुलांचा हंगाम फेब्रुवारी-एप्रिल असून फळे २-३ महिन्यांनंतर तयार होतात. घनकवची (कठिण सालीचे) मृदुफळ ५-७ सेंमी. व्यासाचे मोठे, गोल, कठिण व करड्या रंगाचे असते. मगजामध्ये भरपूर बिया असतात. बिया लांबट व दबलेल्या असतात.

फळातील मगज आंबटगोड व खाद्य असतो. मगज स्तंभक, उत्तेजक व दीपक असून पोटाच्या तक्रारींवर गुणकारी आहे. याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबत करतात. विषारी कीटकदंशावर बाहेरून लेप लावतात. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते; तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो.

झाडातून पाझरणारा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. त्यापासून चित्रकाराचे जलरंग व इतर रंग-रोगणे तयार करता येतात. बाभळीच्या डिंकाला पर्याय म्हणून त्याचा उपयोग होतो. लाकूड करडेपांढरे किंवा पिवळसर, कठिण, मजबूत आणि टिकाऊ आहे. त्याचा उपयोग घरबांधणी तसेच तेलाचे घाणे, चाकाचे आरे व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी होतो. फळाच्या कठिण कवचापासून शोभिवंत वस्तू बनवितात.

 

लेखक : राजा ढेपे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

3.09615384615
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 02:29:34.104817 GMT+0530

T24 2019/06/17 02:29:34.111693 GMT+0530
Back to top

T12019/06/17 02:29:33.815515 GMT+0530

T612019/06/17 02:29:33.834410 GMT+0530

T622019/06/17 02:29:33.884148 GMT+0530

T632019/06/17 02:29:33.885083 GMT+0530