অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोयाबीन पिक - खोडमाशी

विदर्भामध्ये सध्या सोयाबीन पिकावर काही प्रमाणात प्रौढ खोडमाशी आढळून येते आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोयाबीन पिकाचे वेळीच सर्वेक्षण करून, या किडींचे त्वरीत नियंत्रण करणे गरजेचे आहे.

किडीची ओळख व नुकसान


या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोप अवस्थेत झाल्यास झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे पिकाची पुनर्पेरणी करावी लागते. अन्यथा उत्पादनात घट येण्याची शक्‍यता असते.
  • प्रौढ माशी ः लहान, चमकदार काळ्या रंगाची. लांबी 3 मिमी.
  • अळी ः अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मिमी लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. नंतर अळी पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढुरक्‍या रंगाची अळी किंवा लालसर कोष नागमोडी भागात दिसते.
  • खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
  • मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही. मात्र, मोठ्या झाडावर प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो.
  • अशा कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट येते.

नियंत्रणाची उपाययोजना


  • प्रौढ खोडमाशीला पिकावर अंडी घालण्यास प्रतिबंध करण्यासाठी कडूनिंबावर आधारित कीटकनाशकाची (किंवा निंबोळी अर्क पाच टक्के) पाच मिली प्रतिलिटर प्रमाणात फवारणी करावी.
  • खोडमाशी कीडग्रस्त वाळलेल्या पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
  • फोरेट (10 टक्के दाणेदार) 15 किलो प्रतिहेक्‍टर जमिनीत मिसळून द्यावे.
  • नियमित प्रादुर्भाव क्षेत्रात फोरेट (10 टक्के 15 किलो प्रतिहेक्‍टर जमिनीत मिसळून द्यावे.
  • खोडमाशीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर (सरासरी 2-3 कीडग्रस्त झाडे प्रती मीटर ओळीत) खालीलपैकी एका कीटकनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • इथियॉन (50 टक्के) - 30 मिली
  • किंवा इंडोक्‍झाकार्ब (15.8 टक्के) - 6.7 मिली
  • किंवा क्‍लोरॅंट्रॅनिप्रोल (18.5 टक्के) - 3.0 मिली.


संपर्क :

डॉ. ए. व्ही. कोल्हे, 9922922294
(लेखक कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate