অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळबागांची स्वच्छता

फळबागांची स्वच्छता

फळबागांची ठेवा स्वच्छता...

सोसाट्याचा वारा, गारपिटीमुळे फळझाडांच्या फांद्या तुटणे, झाडे वाकणे, पाने, फुले आणि फळांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फळगळ झालेली आहे. सध्याचे वातावरण रोग व किडीचा प्रार्दुभाव होण्यास अनुकूल आहे. अशा परिस्थितीमध्ये फळबागांची स्वच्छता ठेवावी.

  • बागेत अतिरिक्त पाणी साचू देऊ नये. आवश्‍यकतेनुसार अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या दिशेने चर काढावेत.
  • झाडांच्या तुटलेल्या फांद्या करवतीच्या साहाय्याने कापून, कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. (१ किलो कळीचा चुना, अधिक एक किलो मोरचुद आणि १० लिटर पाणी)
  • बागेतील खाली पडलेली फळे, पाने, फुले जमा करून बाग स्वच्छ करावी. बागेत पाने, फले, फळे तशीच पडून राहिली तर रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बागेची स्वच्छता करावी.
  • झाडावरील ज्या फळांना इजा झाली असेल अशी फळे तोडून घ्यावीत.
  • झाडे एका बाजूला झुकलेली असतील तर अशा झाडांना काठीचा आधार देऊन सरळ करावे.
  • फळकूज, देठकूज रोगांच्या नियंत्रणासाठी संपूर्ण झाडावर १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • संत्री, मोसंबी, डाळिंब पिकाला सध्या पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे फायटोप्थोरा आणि कोलोट्रोटिकम बुरशीच्या नियंत्रणासाठी २० ग्रॅम फोसेटील एएल प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • झाडांच्या खोडास बोर्डो मलम लावावी.( १ किलो कळीचा चुना अधिक एक किलो मोरचूद आणि १० लिटर पाणी)
  • झाडांच्या खोडापाशी आळ्यात तणीस, गवत, पालापाचोळा गवत आदींचे आच्छादन करावे.
  • झिंक, जस्त, लोह, मॅंगेनीज, तांबे हे एकत्रित घटक असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क - डॉ. विजय दोड - ९४२०६२६७९८.
(लेखक उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत)
----------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate