অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिंबूवर्गीय फळपिके : संशोधन, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

सध्या जगामध्ये लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात चौथा क्रमांक लागतो आणि कागदी लिंबू उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो. भारतात १० लाख हेक्टर जमिनीवर १00 लाख टन लिंबूर्गीय फळांचे उत्पादन होते. लिंबूर्गीय फळांच्या उत्पादनामध्ये सन १९६१ पासून ते २0१२-१३ या कालावधीत वार्षिक सरासरी २g टक्के वाढ झाली आहे. मध्य भारतामध्ये मुख्यत्वे: महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये आणि लगतच्या मध्यप्रदेशात नागपूर मॅन्डारीन (सिटूस रेटींक्यूलँटा) सहज सोलता येणारा ज्याला स्थानिक भाषेत संत्रा म्हणतात. हे पीक मागील १ug वर्षांपासून घेतले जात आहे.

कूर्ग मॅन्डारीन दक्षिण भारतात प्रसिद्ध असून डोंगर पायथ्याशी थंड हवामानातील ते पीक आहे. खासी आणि दार्जिलिंग मॅन्डारीन ज्याला उत्कृष्ट चव, सुगंध आणि रंग आहे हे भारताच्या उत्तर-पूर्व पर्वतीय भागात शतकांपासून घेतले जात आहे. स्वीट ऑरेंज हे आंध्र प्रदेश(साथ्गुडी), महाराष्ट्र(मोसंबी), पंजाब आणि राजस्थान(माल्टा) येथे नगदी पीक म्हणून घेतले जाते. कागदी लिंबू हे लिंबूर्गीय फळांमधील महत्वाचे नगदी पीक असून देशाच्या बहुतेक सर्व राज्यांमध्ये घेतले जाते. लिंबूर्गीय फळपिके ही देशामध्ये महत्वाची असून लाखो लोकांना यापासून रोजगार आणि उपजीविका उपलब्ध होते. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी दहा हजार कोटी रुपयाचा व्यवसाय या पिंकापासून होतो. फक्त महाराष्ट्रातच दरवर्षी १५00 कोटी रुपयांचा संत्रा व्यवसाय होतो. ज्यामध्ये नागपुरी संत्र्याचा वाटा सर्वाधिक आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर भारतीय उद्यानेिक संशोधन संस्था, बंगलुरुचे विभागीय केंद्र म्हणून संत्रा संशोधन केंद्राचा कोनशिला समारंभ दिनांक २८ जुलै, १९८५ रोजी नागपूर येथे भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री श्री. नरसिंह राव यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शिवाजीराव निलंगेकर आणि डॉ. के. एल. चडुा, निर्देशक, भारतीय उद्यानिकी संशोधन संस्था, बंगलुरू यांच्या उपस्थितीत पार पडला. लिंबूर्गीय फळांचे महत्व जाणून आणि त्याकाळी असलेल्या कोळशीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा संशोधन केंद्राला राष्ट्रीय लिंबूर्गीय फळ संशोधन केंद्र म्हणून एप्रिल १९८६ मध्ये मान्यता दिली गेली. सुरुवातीपासूनच विदर्भ व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात या केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. संस्थेचे उद्देश या लिंबूर्गीय फळांची उत्पादकता वाढविण्यासाठी मूलभूत आणि व्यवहारीक संशोधन करून तंत्रज्ञान विकसीत करणे. या लिंबूर्गीय फळांची आणि संबंधित वनस्पतींची जैवविविधता जपणे व संबंधित सर्व साहित्याचे संग्रहालय म्हणून कार्य करणे. या लिंबूर्गीय फळांचे स्थानिक बाजारपेठेत आणि निर्यातीतील योगदान लक्षात घेऊन साठवणुकीतील आयुष्य वाढविण्याचे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी संशोधन करणे.

या लिंबूवर्गीय फळातील उन्नत संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान प्रसारासाठीचे प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्य करणे.

या देशातील लिंबूर्गीय फळ उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करून व्यावसायेिक संशोधन कार्य करणे.

प्रक्षेत्र

केंद्राकडे सुमारे २५० एकर प्रक्षेत्र असून यातील १८g एकर जागेवर लिंबूर्गीय फळांच्या बागा आहेत आणि उरलेली जागा ग्रीन हाऊस, केंज हाऊस, रस्तें, शैततळी, घरे इत्यादींसाठी राखीव ठेवली आहे. आतापर्यंत राखीव असलेल्या सर्व जागेवर (७g एकर) रोपवाटिका, मातृक्ष संगोपन बाग, गांडूळ खतांचे शेड इत्यादी उभारले गेले आहे. ठिबक सिंचनासाठी जमिनींवर आणि जमिनीखाली पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये जमिनीखालील पाइपांमार्फत १.५ किलोमीटर दूर असलेल्या अंबाझरी तलावातून पाणी आणून संपूर्ण प्रक्षेत्रावर ठिबक सिंचनाची सोय उपलब्ध आहे.

संस्थेच्या संशोधनातील ठळक बाबी

  1. लिंबूर्गीय फळांच्या जणुकांचे देशातील अन्य भागांतून संकलन.
  2. रॉगविरहीत रॉपांच्या उत्पादन पध्दतींचे प्रमाणिकरण.
  3. प्रदेशपरत्नें अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन आणि पानामधील अन्नद्रव्यांचे नियमन.
  4. क्रायसोपा या स्सशोषक किंडींवरील परजीवींच्या उत्पादन प्रक्रियेंचे प्रमाणिकरण.
  5. विषाणू रोगांच्या व्यवस्थापनासाठी जैविक इंडेक्सींग आणि एलाइजा तंत्राचा विकास.
  6. मोसंबी आणि कागदी लिंबाची हाताळणी, पॅकिंग आणि साठवणूक प्रक्रियेचे प्रमाणिकरण.
  7. लिंबाच्या २ जातींचे (एनआरसीसी अॅसीड लाईम-७ आणि एनआरसीसी अंसीड लाईम-८) प्रसारण.
  8. उति संवर्धनाद्वारे रंगपूर लाईम, रफ लेमन आणि अॅलिमो यांच्या उत्पादनाचे प्रमाणिकरण.
  9. शाश्वत अधिक उत्पादनासाठी आणि मातीचा कस राखण्यासाठी गांडूळ खत, हिरवळीचे खत आणि जैविक खते (पॅनेबॅसीलस, सुडोमोनास, अॅझोटोबॅक्टर आणि ट्राइकोडर्मा) वापरून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केले. (यामुळे २५ टक्के खतांची बचत झाली.)
  10. डिक्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक हर्जीयानम स्ट्रेनचे पावडरमध्ये उत्पादन.
  11. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी झाडांच्या वाढीच्या काळातील अवस्थेप्रमाणे सिंचनाव्दारे खते देणे.
  12. क्लॉर्मकृष्ट क्लोराईड आणि छाटणी करून २० वर्षावरील अधिक
  13. रीयल टाइम पीसीआर वापरून विषाणू आणि ग्रीनींग रोगाच्या लवकर आणि योग्य ओळख पद्धतीचा विकास.
  14. डिक्या रोगाला बळी पडणा-या देशभरातील सर्व जाती आणि प्रजातींचा
  15. नागपुरी संत्रा, कागदी लिंबू आणि पूर्वोत्तर राज्यातील लेमन, कचाई विकास. (शीतपेय, कार्बोनेटेड पेय इत्यादी)
  16. एनआरसीसी नागपूर मॅन्डारीन सिडलेस-४, एनआरसीसी अॅसीड लाईम-७, एनआरसीसी अॅसीड लाईम-८ आणि अॅलिमो यांचे अधिक उत्पादन सुरू केले आणि संत्रा उत्पादकांना त्यांचे वितरण २०१५ साली सुरू केले.

सध्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल

शाश्वत लिंबूवर्गीय उत्पादनासाठी हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता, खुट, वाण, रोग-मुक्त लागवड साहित्य, लागवड पध्दत, मातीचे आरोग्य, कोड आणि रोग व्यवस्थापन तसेच कापणीपश्चात व्यवस्थापन, यांचा समावेश आहे. रोगमुक्त प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रोपे लावणी हे लिंबूवर्गीय रोपवाटिका उद्योग स्थापन करण्यासाठी वैज्ञानिक तंत्रावर आधारित अतिशय महत्वाचे पाऊल आहे. या तंत्रामध्ये रोपवाटिकेमध्ये वापरण्यात येणारी माती आणि खताचे मिश्रण निर्जन्तुकीकरण केले जाते आणि मातृवृक्षांची कोड आणि रोग जसे ट्रिस्टेझा, एक्झोकोर्टिस, रिंग स्पॉट इ, निर्मूलनासाठी नियमित तपासणी केली जाते. हे काम विदर्भात सुमारे १५ वर्षांपूर्वी प्रथमच सन २ooo-०१ या कालावधीत सी.सी.आर.आय. (पूर्वीचे एन.आर.सी.सी) येथे सुरू करण्यात आले. आता खासगी क्षेत्रातील आणि राज्य शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक रोपवाटिकांमध्ये याची सुरुवात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज ग्रीनिंग किंवा हुआंगलॉबिंग हा देशाच्या लिंबूवर्गीय उद्योगासमोर एक मुख्य धोका आहे. या रोगाचा संसर्ग सिलिड या किडीने आणि आधीच ग्रस्त असलेल्या रोपांमुळे होतो. याकरिता मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.

लिंबाच्या रोगांमध्ये खे-या हा रोग मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात पसरला आहे आणि रासायनिक उपाय हाच एक मार्ग याच्या निर्बधासाठी उपलब्ध आहे. यासाठी खे-या रोग प्रतिरोधक वाणाची निर्मिती महत्वाची आहे. वाणांची निर्मिती लिंबूवर्गीय फळांमध्ये बीजविरहीत वाणांची मागणी अधिक आहे यादृष्टीने या संस्थेमध्ये विविध संशोधन केले जात आहे. संत्राचे एन.आर.सी.सी. नागपूर बीजविरहित संत्रा-४ हे वाण यासाठी प्रसारित केले गेले. अशाचप्रकारे याप्रकारचे आणखी संशोधन कार्य संस्थेमध्ये सुरू आहे. खुट सध्या लिंबुवर्गीय फळांमध्ये ग्राफिंटगसाठी खुट (रूटस्टॉक) म्हणून जंभेरी आणि रंगपुर लाइम यांचा उपयोग संपूर्ण देशामध्ये केला जात आहे. परंतु डिक्या रोगासाठी हे दोनही खुट प्रतिरोधक नसल्यामुळे संस्थेने सध्या एलिमो या खुटाची शिफारस केली आहे. एलिमो हा खुट डिक्यारोगासाठी असल्यामुळे याचे व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिकाधारकांना वितरण केले गेले आहे. तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जैविक आणि अजैविक ताण लक्षात घेता वेगवेगळ्या प्रतीचे खुट विकसित करण्याचे संशोधन कार्य सुरू आहे. यामध्ये कॅरीझो, सी-३५ सीटूंज, व्होलकामेयर आणि काही संकर खुटांचे रोग, कीड, क्षारयुक्त जमीन यांच्या प्रतिरोधासाठी परीक्षण केले जात आहे. या परिक्षणामध्ये उत्पादनासोबतच झाडाची वाढ, फळांचे विविध गुणधर्म इत्यादीची माहिती घेतली जाते. प्रगत लिंबुवर्गीय फळ उत्पादन तंत्रासाठी कमी उंची असलेले, किमान सिंचनाची आवश्यकता असणारे खुट तयार करण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे.

लागवड पद्धती ठिबक सिंचन आणि त्यामार्फत खताचे नियोजन'ीही काळाची गरज आहे. सिंचनावर घेणे आवश्यक झाले आहे. यामुळे डोंगराळ भागात आणि हलक्या जमिनीत लिंबुवर्गीय फलोत्पादन घेतले जाऊ शकते व यामुळे क्षेत्र विस्तार होऊ शकतो. या तंत्रामुळे सिंचनाचा योग्य उपयोग होऊन उत्पादकता आणि गुणवत्ता वाढते. वाढत्या मजुरी खर्चावर आळा घालण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळाच्या अभावी यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे.

यांत्रिकीकरण

तोडणी इ. कामे सहज शक्य होतात. त्यामुळे फळ उत्पादनात यांत्रिकीकरणास फार महत्व आहे. छाटणी छाटणी गरजेची आहे. झाडाला फळधारणा सुरू झाल्यावर वाळलेल्या फांद्यांचे प्रमाण वाढत जाते आणि त्यामुळे उत्तरोत्तर छाटणी महत्वाची होत जाते. ट्रॅक्टर आणि छाटणीयंत्राच्या सहाय्याने ६ × ६ मी. आणि ६ × ३ मी. अंतरावरच्या लागवडीची यांत्रिकीकरणाने छाटणी सहज शक्य आहे. सघन लागवडी पद्धतीमध्ये आर्थिक स्थिरता काही काळातच येते आणि जर वाळलेल्या फांद्या काढल्या गेल्या नाहीत तर आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा लागवड पद्धतीमध्ये छाटणी फारच महत्वाची आहे. छाटणीमध्ये वापरत्वे बदल होऊ शकतात.

एकात्मिक रोग आणि कोड नियंत्रण

पूर्वी लिंबुवर्गीय फळांमध्ये ट्रिस्टेझा विषाणू आणि डाई-बॅक हे रोग आढळून यायचे. परंतु जंभेरी आणि रंगपुर लाईम हे खुट ट्रिस्टेझा विषाणूला प्रतिरोधक असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव कमी झाला. पण हे खुट डिक्यारोगाला संवेदनशील असल्यामुळे त्याच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पुढील उपाय सुचविलेले आहेत.

  1. डिक्या प्रतिरोधक खुष्ट जसे एलिमोचा वापर करणे.
  2. नवीन विकसित अशा उंच गादीवाफ्यावर लागवड करणे.

ग्रीनींग किंवा हुआंगलाग्बींग या रोगाचा धोका नव्याने येऊ लागला आहे. याच्या व्यवस्थापनासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

  1. रोग आणि कोडविरहित रोपवाटिकेतील निरोगी रोपे वापरणे.
  2. रोगग्रस्त झाडांचा नायनाट/उच्चाटन करणे.
  3. सीला/सीलीड या किड्यांचा कीटकनाशके वापरून नायनाट करणे.

याव्यतिरिक्त रस शोषणारे पतंग, फळकिडे, खोड पोखरणारी अळी, साल खाणारी अळी इ. महत्वाच्या कीटकांचा लिंबुवर्गीय फळझाडांवर प्रादुर्भाव होतो. रसायनांचे अवशेष कमी करण्यासाठी जैविक नियंत्रण पद्धती अंगीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी जैविक सापळे, योग्य कीटकनाशकांचा उपयोग, केमोस्टरीलायझेशन यासोबत एकात्मिक कोड नियंत्रण उपाय आवश्यक आहेत.

उत्तर पूर्व पर्वतीय भागामधील खोड पोखरणारी अळी आणि मध्य भारतातील साल पोखरणारी अळी तसेच पश्चिमोत्तर भारतातील सिला हा कीटक आणि भारतातील बहुतांश भागात आढळणारी फळकिड /फळमाशी, रस शोषणारी किड या देशातील लिंबुवर्गीय फळ उत्पादनासाठी मोठा धोका म्हणून समोर आल्या आहेत. एकात्मिक किड नियंत्रणासोबतच रासायनिक आणि जैविक कोड आणि रोग व्यवस्थापन पद्धती प्रभावी आणि स्थिर होण्याची गरज आहे.

वातावरणाशी समतोल राखणारे आणि प्रदेशनिहाय एकात्मिक कोड नियंत्रण पद्धती फळांवरील कीटकांच्या योग्य व्यवस्थापनासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. रासायनिक कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे कमी किमतीच्या रोग आणि कोड व्यवस्थापन पद्धती तयार करण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती पद्धती कमी खर्चामुळे तसेच विषमुक्ततेमुळे लोकप्रिय होत आहेत. प्रमाणिकरणाद्वारे स्थापित होणारी संत्रा शेती येणा-या काळात देशासाठी वरदान ठरेल.

काढणी पश्चात व्यवस्थापन सर्वप्रथम ताज्या फळांचे काढणीपश्चात वैज्ञानिक हाताळणी तंत्र बनविण्यास या केंद्रावर सन १९८९-९० साली सुरुवात झाली.

आता मोसंबी, संत्रा आणि लिंबू यांचे फळपक्रतेची मानके, फळे काढण्याची स्थिती, तांत्रिक आणि साधारण साठवण यांचे तंत्र सुध्दा उपलब्ध आहे. या केंद्राने व्यापारी सुद्धा दिला. सध्या विदर्भामध्ये खाजगी क्षेत्रातील संत्रा हाताळणी केंद्र सुरू झाली आहेत. शीतगृहामध्ये नागपुरी संत्र्याची मार्च, एप्रिल आणि मे मध्ये साठवण केली जाते. सन १९९०-९१ पासून याविषयीचे तंत्रज्ञान वेगवेगळ्या प्रशिक्षणामार्फत होतकरू लाभार्थीना पुरवले जात आहे.

पंजाब आणि राजस्थानमध्ये किन्नो चे पॅकींगहाऊस सन १९९५-९६ साली या संस्थेच्या यांत्रिक हाताळणीच्या प्रयोगांनी प्रेरित होऊन सुरू झाले आहे. आता पंजाब व राजस्थान मधील जवळपास ९५ टक्के केिन्नो फळांना प्रतवारी आधी मेणाचे लेपण केले जाते आणि पेट्यांमध्ये पॅक केले जाते. हाताळणी तंत्राच्या शिफारशीमुळे काढणीपश्चात होणारे नुकसान ब-याच प्रमाणात कमी झाले याचे मुख्य कारण असे की नागपुरी संत्री पकृतेच्या शेवटच्या कालावधीत पोला होतात. त्यामुळे पॅकिंगमध्ये त्यांची हाताळणी कठीण होते. तसेच या फळांचे साठवणुकीतील आयुष्य कमी असते.

तथापि संत्रा १.५ ते २ महिने सहज कोल्डस्टोअरमध्ये साठवता येतो. साठवणुकीतील नुकसान कमी करण्यासाठी उत्पादकांमध्ये निरोगी आणि जंतुविरहीत बागेची निगा राखण्यासंबंधी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. रोगांचा संसर्ग हा काढणीपूर्वी शेतातच संक्रमित होतो आणि काढणीपश्चात बुरशीनाशकांचा उपयोग काही फायद्याचा ठरत नाही.

म्हणून काढणीपुर्व शेतातील स्वच्छताविषयक व्यवस्थापन, निरोगी बाग आणि काढणीपूर्व बुरशीनाशकांचा उपयोग, बाजारपेठेतील काढणीपश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी महत्वाचे आहे. काळजीपूर्वक काढणीपश्चात हाताळणी हे सुद्धा वाहतूक आणि विक्रीच्या वेळेस होणा-या इजा आणि संसर्ग यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी महत्वाचे आहे. या सर्वांसाठी देशात पायाभूत सुविधा वाढवण्याची आणि जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate