অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गूळनिर्मितीसाठी उसाच्या जाती

गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. निरनिराळ्या ऊस जातींच्या रसामधील रासायनिक गुणधर्मांमध्ये फरक आढळून येतो. म्हणून शिफारस केलेल्या ऊस जातीची निवड करावी.

लवकर पक्व होणाऱ्या जाती

  • कोसी ६७१
  • को ८०१४
  • को ७२१९
  • को 92005

मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती

  • कोएम ७१२५ 
  • को ८६०३२ 
  • को ७५२७ 
  • को ९४०१२

उत्तम गूळ तयार करण्यासाठी ऊस पिकास सेंद्रिय, रासायनिक व जैविक अशा एकात्मिक अन्नद्रव्ययुक्त संतुलित खतांचा पिकाच्या अवस्थेनुसार वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो व पोषक अन्नांशाची उपलब्धता वाढते आणि उसाची वाढ चांगली होते, त्यामुळे रसाची प्रत सुधारून चांगला गूळ तयार होतो.

संपर्क - 1) 02169-265335 मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा.
2) 0231- 2551445 प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर.

--------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate